❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 9
आधीच्या भागात आपण पाहिले की,
समीरने मीराला त्याच्या लग्नाबद्दल सगळं सांगितलं आणि त्याच्या घरी ही माहिती नाही हे ही सांगितलं. मीराला खूप आश्चर्य वाटलं. मीराने हे सगळं तिच्या घरी सांगायला सांगितलं. जर ते हे सगळं सांगतील तरच मी लग्नाला तयार होईल असं सांगितलं.
आता पुढे,
समीरने मीराच्या घरी काही सांगितलेलं नव्हतं, मीराने सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला ते जमलंच नव्हतं. राधे काही कामानिमित्त शहरात गेलेला होता. दोन दिवस गेले.
दोन दिवसानंतर समीर त्याच्या आईला घेऊन मीराच्या घरी आला. तिथे मीराचा पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि मीराचं लग्न पक्क झालं.
दोन दिवसानंतर मीराचा साखरपुडा झाला आणि आठ दिवसानंतर मीरा आणि समीरचं लग्न झालं. मीराच्या लग्नाचे सर्व विधी पार पडले.
मीराची पाठवणी होणार होती, त्याचवेळी राधे शहरातून परत आला. त्याला कुठल्याच गोष्टीची काहीच कल्पना नव्हती, मीराचं लग्न पक्क झालं हेही त्याला माहित नव्हतं. तो तेथे पोहोचला तेव्हा मीराची पाठवणी सुरू होती. तिला लग्नाच्या वेशात बघून आणि तिचं लग्न झालेलं बघून राधेला धक्काच बसला.
कसातरी सावरत तो तिथे उभा राहिला. मीरा गाडीत बसणार तेच तिचं लक्ष राधेकडे गेलं. तिच्या डोळ्यातून खळखळ अश्रू व्हायला लागले.
दोघांची नजरा नजर झाली. मीरा गाडीत बसली आणि मीराची गाडी तिथून निघाली.
राधे तसाच स्तब्ध तिथे उभा राहिला.
मीरा लग्न होऊन सासरी गेली, मीराचा गृहप्रवेश झाला. सासूबाईंनी मीराला घराची संपूर्ण जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीतून मुक्त झाल्या.
घरात मीराचा पहिला दिवस होता मीरा तयार होऊन किचनमध्ये गेली, तिने समीर आणि तिच्या सासूबाई साठी चहा बनवला. सासूबाईला चहा त्यांच्या रूममध्ये नेऊन दिला.
“सासुबाई चहा आणलाय तुमच्यासाठी, आत येऊ का?”
“अगं हो ये ना मीरा.”
मीरा आत आली. तिच्याकडे बघत सासुबाई बोलल्या.
“असं सासूबाई म्हणत जाऊ नकोस ग, आई म्हटलं ना तर मला आवडेल. आई म्हणत जा मला. समीर आई म्हणतो मला, समीरची आई म्हणजे तुझीच आहे ना?”
मीराने होकारार्थी मान हलवली आणि चहाचा कप त्यांच्या हाती दिला.
“आई येते मी, यांना चहा देते.”
“हो हो निघ.”
मीरा तिथून निघाली त्यांच्या बेडरूम मध्ये गेली, समीर ऑफिसला जायला तयार होत होता.
“अहो चहा आणलाय तुमच्यासाठी.”
“हो, कप तिथे ठेव, घेतोय मी. आणि हो माझा डबा रेडी आहे का?”
“हो हो मी करून ठेवलाय आणि हो नाश्त्याला खाली येताय की इथेच आणून देऊ?”
“नाश्त्याला मी खाली येतोय आई सोबत बसून नाश्ता करेन मी. तू आईला आवाज दे जा.”
“हो..”
मीराने सासुबाईला नाश्त्यासाठी आवाज दिला. दोघेही आले, नाश्ता करायला बसले.
मीराने नाश्त्याच्या प्लेट तयार केल्या. दोघांना दिल्या.
“मीरा तू पण ये आमच्यासोबत बस.” सासुबाई बोलल्या.
“नाही, आई मी नंतर करते.”
त्यांनी सांगितलं पण मीरा तयार नव्हती, त्या दोघांना नाश्ता दिल्यानंतर मीरा बसली, नंतर तिने नाश्ता केला.
मीरा किचनमध्ये गेली, सासुबाई पण मागे मागे आल्या.
“मीरा नाश्ता छान झाला, चहा छान केलास तू.” मीराच्या सासूने तिचं कौतुक केलं. तिने फक्त छोटीशी स्माईल दिली.
सासुबाईच्या थोड थोड लक्षात येत होतं, तिने समीरला ऑफिसला जाऊ दिलं आणि नंतर ती तिच्या खोलीत गेली.
“येऊ का आत?”
“आई असं विचारताय काय? या ना या.”
“काय सुरू आहे?”
“काही नाही, कपडे आवरत होती. बसा ना आई.”
“हो हो.”
सासुबाई तिच्या बाजूला बसल्या.
“मीरा मला माहितीये बेटा आज तुझा पहिला दिवस आहे त्यामुळे तुला थोडा अवघडल्यासारखा वाटत असेल, नवीन घर नवीन माणसं नवीन शहर पण तू असं स्वतःला एकटा समजू नकोस. मी आणि समीर आहोत तुझ्यासोबत. मला माहिती आहे तुझ्यासाठी हे वातावरण वेगळ आहे, सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी नवीन आहेत. तुला ऍडजेस्ट करायला थोडा वेळ लागेल पण तू काळजी करू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुला जसं वाटतंय तसं तू राहू शकतेस. तुला कुठल्या गोष्टीच बंधन नाही. तुला साडी नसेल नेसायची घरी तुला जे नेसायचे ते नेसू शकतेस. सलवार घातला तरी चालेल. तू स्वतःवर काही बर्डन आणू नकोस, तुझ्या मनात येईल ते कर. हे घर आता तुझही आहे, जितका आमचा दोघांचा हक्क आहे , घरावर तितकाच तुझाही हक्क आहे. त्यामुळे तू इथे हक्काने राहू शकतेस, वागू शकतेस. मनात कुठलाही संकोच आणू नकोस. मी सकाळपासून बघते तुझ्या चेहऱ्यावर अवघडलेपणा दिसतोय मला म्हणूनच मी तुझ्याशी बोलायला आले. हे बघ माझ्याबद्दल मनात गैरसमज करू नकोस ही माझी सासू आहे मला काही बोलेल का माझं काही चुकलं तर रागवेल का असं काही समजू नकोस. चुकलं ना तर मी तुला समजावून सांगेन. मला माहिती आहे तिथल्या वातावरणात आणि इथल्या वातावरणात खूप फरक आहे त्यामुळे तू कुठल्या गोष्टीचा गैरसमज करून घेऊ नकोस.”
सासुबाईचं बोलणं ऐकून आता मीराला थोडं बरं वाटत होतं पण तरीही ती आनंदात नव्हती, कारण तिचं मन या लग्नाला तयारच होत नव्हतं. तिच्या मनात सतत राधेचे विचार होते. एक तर राधे न सांगता शहरात गेला तो का गेला कशासाठी गेला हेही तिला सांगून गेलेला नव्हता. तिच्या मनात राधे विषय अनेक प्रश्न निर्माण झाले आणि अचानक तिचे डोळे पाणावले. डोळे भरून आलं मन भरून आलं.
सासुबाई बाजूलाच बसलेल्या होत्या त्यांच्या लक्षात आलं.
“काय झालं मीरा घरची आठवण येत आहे का?” तिने फक्त मान हलवली.
“अगं मग बोलून घे ना, फोन कर त्यांना.”
“माझ्याकडे फोन नाहीये.”
“अरे हो तू एक काम कर माझ्या फोनवरून फोन कर. समीर आला ना संध्याकाळी मी त्याला सांगते तुला नवीन फोन द्यायला. थांब तू बस मी माझा फोन घेऊन येते.” सासुबाई उठून बाहेर गेल्या, तस मीराने दाटून ठेवलेल्या अश्रूंना बाहेर मोकळी वाट करून दिली. पटकन डोळे पुसले आणि काही न झाल्यासारखं दाखवलं. सासुबाई फोन घेऊन आल्या. तिच्या हातात दिला आणि म्हणाल्या
“तू बोल मी येतेच.” आणि त्या निघून गेल्या.
मीराने घरी फोन लावला, फोन तिच्या बहिणीने शामाने उचलला होता.
“हॅलो.”
“मीरा बोलते.”
“हॅलो मीराताई अगं शामा बोलते, कशी आहेस तू?”
“मी बरी आहे तू कशी आहेस.”
“मी पण बरी आहे.”
“आई बापू कशे आहेत?”
“सगळे बरे आहेत तू सांग तुझा गृहप्रवेश कसा झाला?”
“छान झाला. एक मिनिट माझं ऐकतेस का?”
“हा बोल ना.”
“हे बघ हा नंबर आहे ना माझ्या सासूबाईंचा आहे तू तुझ्या मोबाईल मध्ये सेव करून ठेव. मी तुला याच नंबर वरून फोन करत जाईल आणि हो माझं अजून एक काम करतेस.”
“बोल ना.”
“आई नसेल तर आधी राधेकडे जा.”
“राधेकडे त्याच्याकडे कशाला?”
“ओरडू नकोस, कुणी ऐकेल शांतपणे जा आणि बघ त्याची अवस्था कशी आहे? बरा आहे की नाही. मी त्याला शेवटचं डोळे भरून बघू शकले नाही ग. त्याच्याशी बोलू शकले नाही. त्याला धक्का बसला असेल तू माझे एवढे काम करशील फक्त जाऊन बघ की तो कसा आहे आणि तेवढं मला सांगशील.”
“हो सांगते मी ताई ठेवते फोन.” मीराचं बोलून झालं आणि सासूबाई रूम मध्ये आल्या.
“काय, झालं का बोलणं?”
“हो शामा सोबत बोलणं झालं आई आणि बापू कामावर गेले असतील ते यावेळी घरी राहत नाहीत ना. आईने फोन घरीच ठेवला होता म्हणून श्यामशी बोलणं झालं.”
“ठीक आहे तू थोडा वेळ बस आराम कर आणि सामान आवर, मी आहे माझ्या रूममध्ये. काही लागलं तर मला आवाज दे.” असं म्हणत तिच्या सासूबाई रूम मधून बाहेर गेल्या. मीरा मात्र राधेच्या आठवणीत गुंतून गेली.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा