Login

प्रीत नव्याने बहरली...भाग 61

Love story
प्रीत नव्याने बहरली...भाग 61


"अंशुमन प्लिज माझं ऐकून घे ना, अरे तू ऐकलंस ते तेवढंच खरं नाही आहे, पूर्ण ऐकून तरी घे ना."

सानिका जमिनीवर बसून रडायला लागली.

अंशुमन टेरिस वर जाऊन बसला, आज अंशुमन खूप दुखावलेला होता. सानिकाचं सौरभवर प्रेम होतं या गोष्टीमुळे त्याला जेवढा त्रास झाला नाही तेवढा सानिकाने त्याच्यापासून लपवलं या गोष्टीचा जास्त त्रास झाला.

तो आतून खूप दुखावलेला होता

काही वेळाने सानिका ही टेरीसवर गेली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने तिचा हात झटकला.

ती त्याच्यासमोर समोर जाऊन उभी राहिली,

"अंशुमन एकदा तरी ऐक रे माझं, मला तुला सगळं खरं खरं सांगायचं होतं पण ती वेळच कधी आली नाही. मला तुला हे सगळं सांगून दुखवायचं नव्हतं. तुला त्रास द्यायचा नव्हता."


तो वळला, त्याला तिचं काहीच ऐकून घ्यायचं नव्हतं. ती पुन्हा त्याच्या समोर जाऊन उभी राहिली.


"ऐकना रे आज तुला माझं सगळं ऐकून घ्यावंच लागेल. खरं तर आज तो दिवस यायलाच नको होता कारण आज मी तुला खूप आनंदाची बातमी सांगणार होते. अजून पर्यंत मी कुणालाही सांगितलेले नाहीये. सगळ्यात आधी मी तुला सांगणार होते पण अचानक सौरभची आई आली आणि सगळा गोंधळ उडाला.

तिने तिच्या पोटावर हात ठेवला,

"अंशुमन हे बघ पोटावर हात ठेवलाय मी आता तरी मी खोटं बोलणार नाही तुझ्याशी. खरच मला तुला त्रास द्यायचा नव्हता रे, एकदा तरी ऐक रे. तो चिमुकला जीव ही तुला सांगतोय की मम्मीचं एकदा ऐक बाबा."


"तू काय बोलतेस? काय.. काय म्हणायचे तुला.
मी मी तू तू तू आई आणि मी बाबा.." तो अडखळत बोलत होता.


तिने होकारार्थी मान हलवली.
तसा तो रडायला लागला, तिचे दोन्ही हात हातात घेतले, दोन्ही हाताचे चुंबन घ्यायला लागला.

"तू खरं सांगतेस?"

"हो आपलं बाळ सौरभ.. आपलं बाळ."

आनंदाच्या भरात अंशुमन सगळं विसरला आणि तिला मिठीत घेतलं

एकमेकांना बिलगून दोघेही रडायला लागले.

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी अंशुमन आणि सानिकाने सगळ्यांना ही गोड बातमी दिली.


सानिकाची प्रेग्नेंसीची बातमी ऐकून घरातल्या सगळ्यांना खूप आनंद झाला.


अंशुमनच्या आईने सानिकाच्या डोक्यावरून हात फिरवला,

"अंशुमन सानिकाला आजच हॉस्पिटलला घेऊन जा, डॉक्टरकडून नीट चेकअप करून घ्या."

"आई आज ऑफिसमध्ये खूप महत्वाची मिटिंग आहे सो आज जमेल की नाही माहीत नाही."

"जमवावं लागेल. मिटिंग संपल्यावर जा."

"ओके.."

"आणि सानिका तू आजपासून ऑफिसला जायचं नाहीस, उगाच दगदग करायची नाही, फक्त आराम करायचा."


"पण आई आतापासून आराम कशाला? शरीराची हालचाल तर असायला हवी ना? तुम्ही मला घरातही काहीच काम करू देणार नाही आहात सो प्लिज मला काही दिवस तरी ऑफिसला जाऊ द्या ना."

"अग नाही, सुरुवातीचे तीन महिने तू कुठेही जायचं नाही."

"ओके ओके."

"मी जस म्हणते तसं आपण करूया."

"चालेल."

अंशुमन ऑफिसला गेला, तो संध्याकाळी ऑफिस वरून आला. त्यानंतर दोघेही हॉस्पिटलला गेले. सगळे छान होतं डॉक्टरांनी तीन महिने सानिकाला आराम करायला सांगितला.
घरात आनंदाची बातमी आली म्हणून सगळ्यांनी
घरात एक छोटीशी पार्टी अरेंज केलेली होती.


पार्टीमध्ये फक्त घरातच मंडळी होते, सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं आणि सगळे खुश होते. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं.

सानिका ऑफिसला जायची नाही ती घरातच आराम करायची, म्युझिक ऐकायची, काही पुस्तक वाचायची.

दिवस सरत गेले, सानिकाला तीन महिने पूर्ण झाले.
............................

सौरभच्या वागण्यात काही फरक पडत नव्हता. तो मेंटली डिस्टर्बचं होता. वेड्यासारखा वागत होता. सौरभच्या आईने सानिकाच्या मदतीने त्याला एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. काही दिवस त्याच्यावरती ट्रीटमेंट झाली. त्यानंतर सौरभला घरी एका खोलीत ठेवण्यात आलं. त्याच्यात काहीतरी फरक पडेल असं वाटत होतं पण त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली.

एक दिवस सौरभची आई सानिकाच्या घरी गेली. तिचा असा रडवेला चेहरा बघून अंशुमनने विचारलं.

"काय झालं काकू? तुम्ही अशा अस्वस्थ का दिसताय?"

"सौरभ मध्ये काहीच फरक पडत नाहीये, मला त्याची खूप चिंता वाटते."

"काकू त्याची ट्रीटमेंट सुरू आहे, प्लिज तुम्ही काळजी करू नका, वाटलं तर आपण पुन्हा एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवूया. बेस्ट डॉक्टर कडे घेऊन जाऊया आपण त्याला पण तुम्ही हार मानू नका सौरभ खरच बरा होईल."

अंशुमनने त्याच्या ओळखीच्या प्रख्यात डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतली

दोन दिवसानंतरची वेळ फिक्स झाली, सौरभच्या आईला समजावून त्यांना घरी पाठवलं.

दोन दिवसांनंतर सौरभला तिथे नेणार होते.