Login

प्रीत नव्याने बहरली...भाग 66

Love story

प्रीत नव्याने बहरली...भाग 66

हॉस्पिटलमधून अंशुमन आणि सानिका दोघेही घरी आले,

"चल मी निघतो बाय." अंशुमनने तिच्या माथ्यावर चुंबन घेतलं.

"बाय." तिने स्मितहास्य केलं.

अंशुमन दारातूनच निघून गेला.

सानिका आत आली, तिची सासू वाट बघत बसलेली होती.

"काय म्हणतात डॉक्टर?"

"आई सगळं ठीक आहे."

"अंशुमन कुठे आहे ग?"

"आई अंशुमन दारातूनच गेला. ऑफिसला जायला उशीर होत होता ना म्हणून."

"अच्छा तू काही खाल्लसं का? काही खातेस का?"

"आई सकाळी नाश्ता केला होता मी आता नको मी जरा फ्रेश होऊन येते मग बघते. काही खाण्याचा विचार करते आता सध्या नको मला."

"ओके जा मग तू आराम कर."

सानिका तिच्या खोलीत गेली, फ्रेश झाली त्यानंतर ती तिच्या बाळाशी गप्पा मारायला लागली.

"बाळा आज तुला असं बघून मला खूप आनंद झाला. आज तुझ्यावरची नजर हटतच नव्हती, फक्त तुला बघत राहावं असंच वाटत होतं. तुझ्या बाबाची पण इच्छा होती तुला भेटायची पण बिचारा काही बोललाच नाही. पण तू आलास की मग छान गट्टी जमेल तुझी आणि तुझ्या बाबांची. तो खूप प्रेमळ आहे. तू आलास की सगळं जीवन आनंदाने उजळून निघणार आहे."

सानिका स्वतःच्याच विचारात गुंग झाली.

काही वेळाने तिच्या मोबाईलवर रिंग आली.


अनोळखी नंबर होता, उचलू की नको या विचारातच तिने फोन रिसिव्ह केला.


"हॅलो." सानिका

"हॅलो."

समोरचा हळुवार आवाज ऐकून सानिकाने विचारलं,

"कोण बोलतंय?"

"सा सा सा सानिका मी मी मी बोलतोय."

त्याचा आवाज ऐकून तिचे भावुक झाली, तिचे डोळे पाणावले. नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

"सौरभ.."

तिच्या तोंडून स्वतःच नाव ऐकून तो ही रडायलाच लागला.

"ओळ्खलंस मला?" सौरभ

"का ओळखणार नाही?" सानिका

"विसरलीस ना मला?" सौरभ

"नाही, मी तुला कधीच विसरू शकत नाही." सानिका

"मग इतक्या महिन्यात एकदाही भेटायला का आली नाहीस?"

"आले होते, पण त्यावेळी तू बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतास. तुझी ती अवस्था बघवत नव्हती. आता कसा आहेस सौरभ?"

"बरा आहे, आता बर वाटतंय. पण आता राहवत नाहीये."

"म्हणजे?"

"तुला बघावं वाटतंय, एकदा तुला डोळे भरून बघावं वाटतंय ग, खूप खूप बोलावं वाटतंय. पण ते शक्य नाहीये मला माहिती आहे. खरं तर मी तुला थँक्यू म्हणायला फोन केला, तू नसती तर कदाचित आज मी बरा झालो नसतो, मी कदाचित जिवंतही नसतो."

"थँक्स म्हणायचं असेल तर अंशूमनला बोल कारण मी काहीच केलेले नाहीये जे काही केलंय ते अंशुमनने केलंय. त्याची धडपड आणि त्याची मेहनत आहे."

"तू बोलशील त्याला थँक्स?"

"नाही तू स्वतः ये इकडे आणि बोल त्याच्याशी, त्यालाही बरं वाटेल. त्यानिमित्ताने तुझ माझ्या घरी येणं होईल तुलाही बरं वाटेल आणि हो येताना काकूंनाही घेऊन ये, मला त्यांना भेटायचय, त्यांच्याशी बोलायचंय."

सौरभने फक्त होकारार्थी मान लावली आणि फोन तसाच ठेवून दिला. त्याला तिच्याशी बरंच काही बोलायचं होतं पण सगळं मनातलं मनातच राहून गेलं. डोळ्यातून अश्रू ढाळण्याशिवाय तो काहीच करू शकला नव्हता.

ती जुन्या आठवणीत रमली.

दोघाचं एकमेकांना भेटणं, तासनतास गप्पा मारणं. एकमेकांना आणाभाका देणं सगळं डोळ्यासमोरून गेलं.
त्यांचं ते पाण्यात चिंब होणं, एकमेकांशी डोळ्यांनी बोलणं.

सावन ने आज तो मुझको भिगो दिया
हाय मेरी लाज ने मुझको डुबो दिया

सावन ने आज तो मुझको भिगो दिया
हाय मेरी लाज ने मुझको डुबो दिया

ऐसी लगी झडी
सोचू मै ये खडी

कुछ मैने खो दिया
क्या मैने खो दिया...

चूप क्यू है बोल तू
संग मेरे डोल तू

चाल से चाल मिला आ आ
ताल से ताल मिला

"सानिका बाळा कोणत्या विचारात गुंतलीस?"

सासुबाईंच्या आवाजाने ती भानावर आली, पाणवलेले डोळे तिने लगेच पुसले.

त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी लगेच विचारलं.

"सानिका अगं तू रडते आहेस? काय झालं? कुणी काही बोललं का तुला? तुला पोटात दुखतंय का? काय झालं मला सांग, आपण डॉक्टरकडे जायचं का? तू बोल ना काय झालं तुला का रडतेस?"

"आई आई मी बरी आहे, प्लिज तुम्ही शांत व्हा ना. मी खरच बरी आहे."

"काय झालं काय रडत होतीस?"

"मी रडत नव्हते असंच थोडी भावुक झाले होते, बाळाशी गप्पा मारत होते ना म्हणून."

"असं होय, मला वाटलं रडत होतीस की काय. मी घाबरले  मला वाटलं रडत असेशील तर मी आता अंशुमनला काय सांगणार होते?"

"आई का घाबरता एवढं? कुणीही तुम्हाला काहीही बोलणार नाही. मी व्यवस्थित आहे, माझं बाळही व्यवस्थित आहे. उगाच काळजी करत बसत जाऊ नका."

सानिकाने त्यांची समजूत घातली.

क्रमशः

 

🎭 Series Post

View all