Login

प्रीत नव्याने बहरली...भाग 57

Love story
प्रीत नव्याने बहरली...भाग 57


साक्षीने सानूला जवळ घेतलं, तिचं डोकं स्वतःच्या खांद्यावर ठेवलं आणि तिच्या डोक्यावर हात फिरवला.


"नको करू इतकी काळजी, सगळ ठीक होईल. खरच सगळ नीट होईल."

दारामागे उभे असलेल्या त्या व्यक्तीच्या कानावर हे सगळं गेलं, हे सगळ ऐकून त्याला धक्काच बसला.

साक्षी उठली, ती तिथून जायला निघाली. तिने दारात त्याला बघितलं आणि ती बघतच राहिली. काही क्षणात ती तिथून निघून गेली.

तो आत आला,

"काय झालं सानू तू रडतेस का आणि साक्षी का आलेली होती?"

"नाही नाही मी रडत नाहीये, कचरा गेला ना माझ्या डोळ्यात म्हणून ते पाणी येतंय."

"सानू का खोटं बोलतीयेस? अग सांग मला, सांग की तुझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. तुला जर त्याच्याजवळ जायचं असेल ना मी आजही तुला नेऊन द्यायला तयार आहे पण एकदा बोल ग माझ्याशी. तुझ्या मनातलं तू बोलली नाहीस तर मला कसं कळणार? आता तर मला अर्धवट गोष्टी कळल्यात मला पूर्ण गोष्टी माहिती व्हायला हवाय. सानू बोल ग." तो तिच्या चेहऱ्याकडे बघत मनातल्या मनात बोलत होता.


"तू असा काय बघतोस माझ्याकडे?"

"काही नाही सहजच."

तो तिच्या बाजूला बसला,


"मला असं वाटलं की तू अपसेट आहेस म्हणून मी तुला विचारायला आलो आणि साक्षी अशीच निघून गेली ना. निघताना माझ्याकडे फक्त बघितलं तिने, काही बोलली नाही. चेहऱ्यावरून टेन्स वाटत होती सो म्हणून मला असं वाटलं की काही टेन्शन आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर तू मला सांगू शकतेस, मी सॉलव्ह करेल तुझा प्रॉब्लेम."


"नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये."


दुसऱ्या दिवशी सकाळी सानिकाने माहेरी जाण्याचा विषय काढला,

"आई मला माझ्या घरी जायचं होतं म्हणजे मला थोडं काम आहे तुमची परवानगी असेल तर मी जाऊ?"

"अग का विचारतेस असं? जा ना.. ते तुझं घर आहे तुला जेव्हा वाटलं तेव्हा तू जा आणि प्रत्येक वेळी विचारलंच पाहिजे असं नाहीये. अंशुमनशी बोलत जा, तू आम्हाला नाही सांगितलं तरी चालेल आणि आज ऑफिसला जाणार आहेस की परस्पर तिकडे चालली आहे."


"नाही मी विचार करत होते की परस्पर आईकडे जाते म्हणजे मला दिवसभर तिथे वेळ घालवता येईल आणि मग संध्याकाळी मी अंशुमन सोबत रिटर्न येते."

"चालेल अंशुमनसोबतच जा."

अंशुमनने तिला तिच्या घरी सोडून दिलं, सानिका आत गेली अंशुमन बाहेरूनच ऑफिसला गेला.


"आजी.. आजी.." ती आजीला आवाज देत आजीच्या खोलीत गेली.

"अग सानू काय ग आज सकाळी सकाळी, काही फोन बिन काही केला नाहीस."


"मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी आणि मी फक्त तुझ्याशी बोलू शकते म्हणून मी आता आली. बाबा नसतील ना घरी?"

"नाही ग तो केव्हाचा ऑफिसला गेलाय."

"आणि आई?"


"ती असेल, किचनमध्ये असेल नाहीतर तिच्या रूममध्ये असेल."


"आर्यन?"

"आर्यन कॉलेजला गेला आहे."

"ओके.."

"बोल काय बोलायचं तुला?"

"आजी मला सौरभ बद्दल तुझ्याशी बोलायचंय. आजी तू बाबांना सांग ना त्याला इकडे परत आणायला."

"का? त्याला का परत आणायचं?"

"त्याची तब्येत खालावत चालली आहे ग, वेडा होत चाललाय तो, तिथे त्याची परिस्थिती गंभीर आहे. त्याची मानसिक स्थिती, त्याची आर्थिक स्थिती, त्याची शारीरिक स्थिती काहीच काहीच बरं नाहीये. आजी सांग ना बाबांना. तो इथे आल्यानंतर मी असं काही वागणार नाही त्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास होईल, मी त्याला भेटणारही नाही, त्याच्याशी बोलणारी नाही. पण तो इथे आला तर त्याची आई त्याची काळजी घेऊ शकेल. तो इथे त्याच्या घरी त्याच्या लोकांसोबत राहू शकतो एवढेच मला वाटतं. तिथे त्याची काळजी घेणारे कोणी नाहीये ग, आता ऍडमिट होता तेव्हा त्याच्याजवळ त्याची काळजी घेणार, त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवणार कोणीच नव्हतं."
सानिकाने आजीला सगळं सांगितलं.


"आजी आता तू सांग काय करायला हवं?"

"मी प्रतापशी बोलून बघते पण मला नाही वाटत तो या सगळ्याला तयार होईल."


"आजी बाबा माझं नाही ऐकणार मला माहिती आहे पण बाबा तुझं ऐकेल. तू बोलून बघ एकदा प्लिज. तूच माझी शेवटची आशा आहेस ग, तुझ्याशी बोलल्यावर माझा प्रॉब्लेम   सुटेल या विश्वासाने मी तुझ्याजवळ आली आहे."


"हो बाळा मी प्रयत्न नक्की करेन." असं म्हणून तिने तिच्या गालावरून हात फिरवला.

ती आजीला बिलगली, काहीतरी नक्की चांगलं घडणार हा विश्वास वाटत होता.