Login

प्रीत नव्याने बहरली...भाग 62

Love story
प्रीत नव्याने बहरली...भाग 62

अंशुमनने त्याच्या ओळखीच्या प्रख्यात डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतली.

दोन दिवसानंतरची वेळ फिक्स झाली, सौरभच्या आईला समजावून त्यांना घरी पाठवलं.

दोन दिवसांनंतर सौरभला तिथे नेणार होते.


सानिका तिच्या खोलीत बसलेली होती, अंशुमन ऑफिस मधून आला.

"हाय सानू."

"हाय."

"काय मग कसा जातो दिवस?"

"नुसतं बोरिंग, दिवसभर काय करणार बसून बसून कंटाळा येतो मला तू ही नसतोस आणि आईंशी पण किती वेळ बोलणार ना मी. मला कधी कधी खूप कंटाळा येतो.".

"काहीच महिने मग बाळ आलं ना की तुझा दिवस कसा जाईल तुला ही कळणार नाही. सौरभच्या आईचा काही फोन वगैरे आलेला होता का?"

"नाही, असा का विचारतोस?"

"काही नाही ग उद्या त्याला हॉस्पिटलला न्यायचं आहे ना म्हणून, उद्याच्या सगळ्या मिटींग लँडअप केल्यात मी.
एकदाचं सौरभच्या हॉस्पिटलचं काम झालं ना मग मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकेल. त्याचा आईचा तो चेहरा बघून मलाच कसतरी व्हायला लागलं, माझंही कामात मन लागत नव्हतं."

"तू फ्रेश हो, मी जेवायला घेते."

"तू जेवलीस का?"

"नाही रे मी तुझ्यासाठी थांबले होते."

"अगं कितीदा सांगायचं जेवून घेत जा. तुझ्यासोबत हा इवलासा जीव आहे मग त्याच्यासाठी तुला जेवायला नको."

अंशुमनने तिच्या पोटाला त्याचे कान लावले, तशी सानिका हसायला लागली.


"तू हसतेस का?"

"हसणार नाही तर काय करणार? कान कशाला लावतोय?"

"बाळाचा आवाज ऐकतोय."

ती पुन्हा जोरात हसायला लागली.

"आत्ताच बाळाचा आवाज येणार नाही तुला, जेव्हा हालचाल सुरू होईल त्याची तेव्हा त्याची हलचल तुला जाणवेल. मी तुला सांगेल,ओके."

त्याने तिच्या पोटाची एक पप्पी घेतली आणि उठला.

"मी फ्रेश होऊन येतो."


सानिका किचन मध्ये गेली, तिने ताट बनवून डायनिंग वर आणून ठेवलं, अंशुमन फ्रेश होऊन आला, दोघांनीही एकाच ताटात जेवण केलं.


दुसऱ्या दिवशी सकाळी अंशुमन तयार झाला.


"आज लवकर तयार झाला, मिटींगला जायचे का तुला?" त्याच्या आईने त्याला विचारलं.

"नाही आई सौरभला हॉस्पिटलला न्यायचं आहे ना, तिथे चाललोय मी."

"बरं नाश्ता कर आणि मग जा."


"नको आई मला हॉस्पिटलला लवकर जायचंय. सकाळी भेटायला बोलावलं आहे, डॉक्टर निघून गेले तर उगाच सौरभचं राहून जाईल."

अंशुमन घाईघाईने निघून गेला.

काही वेळाने सानिका खाली आली.


"आई अंशुमन दिसलाय का तुम्हाला?"

"अग तो सकाळीच निघून गेला आणि तुला काही बोलला नाही."


"काल बोलला होता जाणार आहे पण इतक्या सकाळी जाईल वाटलं नव्हतं."

"बर तू फ्रेश हो, त्याची काळजी करू नको. तुला आता तुझी काळजी घ्यायची आहे."

तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

सानिका फ्रेश झाली, त्याच्या आईने तिच्या आवडीचा नाश्ता बनवलेला होता, दोघींनी गप्पा मारत नाश्ता केला.

अंशुमन सौरभला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, तिथे त्याची ट्रीटमेंट सुरू झाली.

डॉक्टरांनी ऑब्झरवेशन साठी त्याला तिथे ऍडमिट करून घेतलं.

दोन दिवस सौरभ हॉस्पिटलमध्ये होता.
अंशुमन सकाळी आणि संध्याकाळी त्याला बघायला जायचा.
हवं नको ते सगळं बघून घरी यायचा.

हॉस्पिटलचा खर्च, मेडिसिनचा खर्च सगळं अंशुमनच करत होता.

रात्री अंशुमन घरी गेला.

शूज काढून बेडवर बसला आणि पाठ टेकवली.

"अंशुमन खूप थकला दिसतोयस."

"आज खूप धावपळ झाली, हॉस्पिटलला दोन तीनदा गेलो आणि ऑफिसची मीटिंग. दिवसभर इकडे तिकडे करावं लागलं. त्यामुळे दमल्या सारखं झालंय."

"तू आधी जेवणार आहेस की ज्यूस वगैरे आणू."

"आता ज्यूस दे, थोड्यावेळ आराम करतो त्याच्यानंतरच जेवण करेल."

"ओके मी ज्यूस घेऊन येते."

सायली त्याच्यासाठी ज्यूस घेऊन आली.


"कसा आहे सौरभ आता?"

"ट्रीटमेंट सुरू केली आहे, ऑब्झर्वेशन मध्ये ठेवले आहे दोन दिवस आणि बघू म्हणाले त्यानंतर देतील त्याला सुट्टी."

"अंशुमन तू इतका स्ट्रेसमध्ये का दिसतोयस? काही सिरीयस मॅटर आहे का?"


"नाही ग असं काही नाही, ऑफिसचं काम होत. डॅड नाहीत त्यामुळे कामाचं प्रेशर आहे. डॅड असते तर काही टेन्शनच नव्हतं. हॉस्पिटल मुळे कामाकडे दुर्लक्ष होतंय बाकी काही नाही."

"डॅड नाहीयेत तोवर मी तुझी मदत केली तर चालेल का? जास्त वेळ नाही थोडा वेळच बसेल आणि काळजी घेईन मी स्वतःची, चालेल का तुला?"


"नाही ग आईला नाही चालणार, असू दे मी करेल मॅनेज."

काही वेळ आराम करून अंशुमन जेवण करून झोपला पण सानिकाला झोप येत नव्हती. अंशुमन टेन्शनमध्ये आहे आणि आपण त्याची काहीच मदत करू शकत नाही याचा तिला वाईट वाटत होतं.

या विचारातच रात्र उलटून गेली, पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. जाग आली तेव्हा अंशुमन बाजूला नव्हता.