प्रीत नव्याने बहरली...भाग 63
काही वेळ आराम करून अंशुमन जेवण करून झोपला पण सानिकाला झोप येत नव्हती.
अंशुमन टेन्शनमध्ये आहे आणि आपण त्याची काहीच मदत करू शकत नाही याचा तिला वाईट वाटत होतं.
या विचारातच रात्र उलटून गेली, पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. जाग आली तेव्हा अंशुमन बाजूला नव्हता.
'अरे सकाळी सकाळी हा कुठे गेला? हॉस्पिटलला गेला असेल का? आईला विचारते आईला माहिती असेल.' ती स्वतःशीच पुटपुटली आणि खाली आली.
"आई आई."
"उठलीस का बाळा."
"आई अंशुमन गेला का?"
"तो सकाळीच गेला."
"पण मला सांगून गेला नाही, म्हणजे मी शोधत होते त्याला."
"तू झोपली होतीस म्हणून तुला नाही सांगितलं त्याने, मला सांगून गेला. हॉस्पिटलला गेलाय आज कदाचित सौरभला डिस्चार्ज मिळेल."
"हो का?"
सानिका विचारात पडली.
"काय विचार करतीयेस?"
"तो मला काहीच सांगत नाही, सगळं तुम्हाला सांगून जातो."
त्याची आई हसली.
"अगं तुला उगाच टेन्शन नको ना म्हणून तो तुला काही सांगत नाही. चल फ्रेश हो मी तुझ्यासाठी तुझी आवडती कॉफी बनवते."
"ओके मी फ्रेश होऊन येते."
दोघीही बोलत होत्या तितक्यात घरच्या लँडलाईन वर फोन आला.
"आई मी फोन घेते." असं म्हणत सानिका उठली.
तिने फोन रिसीव केला,
"हॅलो."
"हॅलो मॅडम मी ऑफिसमधून बोलतोय."
"हा बोला."
"सर आहेत का?"
"नाही का? बोला ना."
"मॅडम त्यांचा फोन लागत नाही आणि आज एक खूप महत्वाची मिटिंग आहे. अवघ्या दहा मिनिटात मिटींगला सुरुवात होणार आहे आणि सरांचं असणं खूप गरजेचं आहे. खूप मोठी डील आहे मिस व्हायला नको प्लिज तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा ना, सर कुठे आहेत काहीच कळत नाहीये त्यांच्या सकाळी मला एकदा कॉल येऊन गेलेला होता की मी महत्त्वाच्या कामाला जातोय मीटिंग पर्यंत पोहोचेल पण अजून पर्यंत पोहोचलेलेच नाहीयेत."
"ओके ओके मी बघते, कळवते तुम्हाला."
"ओके."
सानिकाने फोन ठेवला.
"काय ग कुणाचा फोन होता." मागेहून त्याच्या आईने विचारलं.
"आई ऑफिस मधून फोन होता आज अंशुमनची महत्त्वाची मीटिंग आहे पण तो अजूनही ऑफिसला पोहोचलेला नाहीये. काय करायचं काही कळत नाहीये. आई तुमची काही हरकत नसेल तर मी जाऊ ऑफिसला? प्लिज नाही म्हणू नका. डील खूप महत्त्वाची आहे. अंशूमन मीटिंग पर्यंत पोहोचला तर मी परत येईल नाहीतर मग मीटिंग अटेंड करून येईल. प्लिज आई नाही म्हणू नका प्लिज प्लिज."
"ओके तू जा पण सांभाळून जा आणि गाडी आहे घरी ती घेऊन जा."
"ओके थँक यू आई, मी पटकन रेडी होते."
सानिका रेडी झाली, ऑफिसला जायला निघाली. अंशुमनच्या आईने तिच्यासाठी टिफिन पॅक केला.
"सानिका थांब अग अशी उपाशी जाऊ नकोस हा डब्बा घे आणि वाटेत खा."
"थँक्यू आई थँक्यू सो मच."
सानिका ऑफिसला पोहोचली.
"थँक्यू मॅडम तुम्ही आलात सर अजूनही पोहोचलेले नाहीत."
"इट्स ओके आपण मीटिंग सुरू करूया."
"आर यू शुअर मॅडम."
"एस प्लीज स्टार्ट द मीटिंग."
"ओके प्लिज कम मॅडम."
मीटिंगला सुरुवात झाली.
****************
अंशूंमनची आई विचार करत बसलेली होती, तिने त्याला फोन केला पण तो फोन उचलत नव्हता.
'काय झालं असेल हा फोन का उचलत नाहीये, सानिका मिटींगला गेली पण होईल ना सगळं नीट. हे देवा भगवंता सगळं व्यवस्थित कर.' त्या मनातल्या मनात विचार करत होत्या. त्यांना सानिकाची पण काळजी वाटत होती.
काही वेळानंतर मीटिंग संपली
डील क्रॅक झाली त्यामुळे सगळे हॅपी होते.
"थँक्यू मॅडम आज तुम्ही आलात म्हणून ही डील फायनल झाली नाहीतर आपलं करोडोच नुकसान झालं असतं. पण मॅडम सर कुठे गेलेत?"
"कुठेतरी कामात अडकला असेल येईल तो. बर आता काही मिटींग नाही आहेत ना? मी जाते."
"हो मॅडम आता तुम्ही गेलात तरी चालेल."
सानिका घरी आली,
"आई आई आई आई.."
तिने तिच्या सासूचे हात पकडले आणि गोल गोल फिरायला लागली.
"काय करतेस सानिका? अग हळू जरा शांत हो, काय? काय झालं?"
"डील क्रॅक झाली आहे, मीटिंग सक्सेसफुल. मला खूप खूप खूप आनंद होतोय."
"खूप छान ग आज अंशुमन नव्हता म्हणून तू त्याचं काम केलं, आणि यशस्वी सुद्धा केलंस. त्यालाही तुझ्यावर प्राउड फील होईल."
"कालच आमचं बोलणं झालं मी म्हटलं अंशुमनला बाबा नाहीये तोवर मी तुझ्या मदतीला येते तर तो नाही बोलला. तुम्हाला आवडणार नाही असं म्हणत होता. पण आज बघा मी एक मीटिंग केली आणि ते खूप महत्वपूर्ण मीटिंग."
"हो गं आहेच माझी सून गुणाची."
असं म्हणून त्याच्या आईने तिला जवळ घेतलं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा