Login

प्रीत नव्याने बहरली...भाग 64

Prit Navyane Baharali
प्रीत नव्याने बहरली...भाग 64

सानिका बराच वेळ अंशुमनची वाट बघत बसलेली होती.

अंशूमन आला,  हातातला मोबाईल ठेवला. शूज काढले आणि तसाच बेडवर झोपला.

सानिका बाल्कनीत उभी होती, तो आलेला तिला कळलंच नव्हतं.

काही वेळाने तिचं लक्ष गेलं, तशी ती आत आली.


"अरे अंशुमन कुठे होतास दिवसभर? किती वाट बघायची तुझी? फोनही लागत नव्हता. आणि लागला तर तू उचलत नव्हता. कुठे होता दिवसभर? थकलेला दिसतोय."


सानिकाचं बोलणं सुरू होत पण अंशुमन काहीच बोलत नव्हता.

सानिकाने त्याला पाणी दिलं, अंशुमन पाणी प्यायला.

"तू फ्रेश हो तुला जेवायला देते."


"नको, आता काही खायची इच्छा नाहीये मला, आराम करायचा आहे थकलोय मी."

तो तसाच झोपला.

सानिकाला वाईट वाटलं.

'सानू जेवलीस का? की माझ्यासाठी वाट बघत होतीस? मिटींग होती, मिटींगच काय झालं? काहीच विचारलं नाही. नाही पण त्याला तर कळलंच नसेल ना काय झालं ऑफिसमध्ये. माझ्याशी नीट बोललाही नाही. कदाचित दिवसभराच्या कामाने थकला असेल.' सानिका तिच्यात विचारात होती.

काही वेळाने ती झोपली.


सकाळी उठली तेव्हा अंशुमन ऑफिसला जायला तयार झालेला होता.

"अंशुमन आज लवकर निघालास ऑफिसला?"

"अग हो काही मिटींग लँडअप आहेत त्या करीन म्हणतोय आज."


"काल रात्री जेवला नाहीस तू?"

"अगं जेवायची खरंच इच्छा नव्हती आणि खूप थकलेलो होतो त्यामुळे मग."

"अंशुमन तू माझ्याशी नीट बोलले नाहीस."


"असं काही नाहीये ग."

"मग कसं आहे, तू जेवलीस का? असा साधा प्रश्नही विचारला नाहीस तू? आधी किती काळजी करत होतास आणि आता काय झालं तुला?"


"सॉरी सानू अग माझ्या डोक्यात दुसरेच विचार सुरू होते आणि त्या विचारातच मला तुला विचारायचं राहून गेलं, सॉरी खरच सॉरी. बरं तू फ्रेश हो मला आज लवकर निघायचं मी खाली जातो." त्याने तिच्या गालाला हात लावून तिला समजावलं.


अंशुमन खाली गेला,

"गुड मॉर्निंग आई."

"गुड मॉर्निंग, काय रे रात्री खूप उशीरा आलास ना?"

"हो गं."


"जेवलास की नाही रात्री?"


"नाही ग."

"सानू पण जेवली नसणार, तुझी वाट बघत बसलेली होती. ती बिचारी जेवली नसेल."

"काय सानू जेवली नव्हती?"

"नाही, दिवसभर तू नव्हता, तुझा फोन लागत नव्हता. तुझं तिच्याशी काही बोलणं झालेलं नव्हतं. त्यामुळे ती अपसेट होती. रात्री तू आल्यावर सोबत जेवण करू असा विचार करून ती जेवली नव्हती.

"काय हे मी कितीदा सांगून ठेवलंय सानूला की माझी वाट बघत जाऊ नकोस, पण हिला कळतच नाही."


"कळतं तिला सगळं कळतं."

"म्हणजे?"

"म्हणजे काय तुझ्या ऑफिस मध्ये मिटींग होती ना? ती मीटिंग तिने सक्सेस करून दाखवली. तिने खूप मोठ डील क्रॅक केलंय."

"पण ती काही बोलली नाही मला.".

"कशी बोलणार तू तिला बोलायला वेळच दिला नसशील. काय बोलणार ती बिचारी. पण खरंच काल खूप छान पद्धतीने तिने सगळं हँडल केलं. जितकं कौतुक करावं तितकंच कमी."


"आई मी आलोच." तो उठला.

"अरे खाऊन तरी घे आधी. कुठे चाललायस?"


"आई आलोच." असं म्हणत तो धावत पळत खोलीत गेला.

सानिका बाल्कनीत उभी होती.

तो हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिला. तिच्या कमरेतून हात घातला, त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवली.

"सानू डिअर सॉरी ना, सॉरी मी काल रात्री तुला विचारलं सुद्धा नाही."


त्याने तिला स्वतःकडे वळवलं.

"थँक्यू सो मच."

"कशाबद्दल?" तिनेही नाक मुरडत विचारलं.


"तू काल खूप मोठा काम केलस, आईने सांगितलं मला आता आणि त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच अँड प्राऊड ऑफ यू डिअर."


"मी तुझी कुणीच नाही आहे ना म्हणून मला थँक्यू बोलतोयस तू."


"असं नाहीये ग पण कदाचित काल तू नसतीस तर खूप मोठ नुकसान झालं असतं."


"माहितीये मला म्हणूनच मी गेले होते."


"आता राग सोड ना प्लिज, प्लिज प्लिज राग सोड ना जानू प्लिज."


ती हसली आणि त्याच्या मिठीत गेली. त्याने तिला घट्ट कवटाळलं.


"कालचा पूर्ण दिवस खूप टेन्शन मध्ये गेला ग, मी तुला कॉल करू शकलो नाही, काही वेळाने मोबाईलला रेंज नव्हती आणि मी बिझी होतो, ऑफसेट होतो. त्यामुळे मी तुझ्याशी बोलू शकलो नाही. त्याबद्दल खरंच खरंच सॉरी ग.


"इट्स ओके मी समजू शकते पण तू कुठे होतास काल दिवसभर?"


"हॉस्पिटलमध्ये."

"हॉस्पिटलमध्ये? पण का? सौरभचं काही झालंय का? तो सिरीयस आहे का? काही त्रास होतोय का त्याला? कसा आहे तो बरा आहे ना?"


"सानू रिलॅक्स, शांत हो मी सगळं सांगतो."