Login

प्रीत नव्याने बहरली...भाग 67 बोनस पार्ट

Love story
प्रीत नव्याने बहरली...भाग 67 बोनस पार्ट

6 महिन्यानंतर,

अंशुभन आणि सानिकाच्या आयुष्यात नव्या पाहुण्यांच आगमन झालं, सानिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता.


बाळाचा रडण्याचा आवाज सुरू होता,

"सानिका अग ये सानिका काय झालंय सुरभी का रडतेय? काय झालं?" अनुराधाताई सानिकाच्या बेडरूम मध्ये आल्या.

तिच्याकडे बघून पुन्हा म्हणाल्या.

"काय झालं सानिका? सुरभी का रडते आहे?"

"आई काही कळतच नाहीये, बघा ना काय होतंय? पोट दुखतंय कि काही अजून होतंय मला काहीच कळत नाहीये."

"तू पॅनिक होऊ नकोस, मी बघते."

अनुराधाताईने सुरभीला हातात घेतलं, अंगाई गीत गायला  सुरुवात केली, तिला थोडं हलवलं. काही वेळाने सुरभी शांत झाली आणि अनुराधा ताई जवळ झोपली.

सानिका बराच वेळ त्या दोघींना बघत बसली होती.

दोघीही एकमेकींकडे बघून हसल्या,

"आई तुमच्याकडे आल्यानंतर कशी पटकन शांत झाली आणि माझ्याकडे नुसती रडत होती."

"काळजी करू नको  सगळं ठीक होईल, तुला जमेल हळूहळू."

अनुराधाताईच्या मदतीने सानिका सगळं शिकत होती.
अंशुमनही तिला मदत करत होता. तिला हवं नको ते सगळं बघत होता. खूप छान आणि आनंदात दिवस जात होते.


*****************

सौरभने त्याच्या स्वतःचा बिजनेस सुरू केलेला होता, तो त्याच्या आयुष्यात सेटल झालेला होता. आई आणि तो दोघेही आनंदाने राहत होते.


"सौरभ आता सगळं नीट चाललय, आता तरी लग्नाचा विचार कर रे. आता माझ्याने जास्त काम होत नाही मला मदतीला सुनबाई तरी घेऊन ये."


"आई अजून एक दोन वर्ष थांब ग, मला नीट सगळं करू दे. आपण एक छान नवीन घर घेऊया एक गाडी घेऊ या मग लग्नाचा विचार करू."

"नवीन घर आणि गाडी होईल रे आधी घरात एक सून घेऊन ये ती महत्त्वाची आहे. माझ्या तब्बेतीच काही सांगता येत का? मला काही झालं तर?"


"आई तू ना.... तू अशीच राहणार आहेस. मला फक्त ब्लॅकमेल करत रहा." असं म्हणून तो हसायला लागला.


******************

"सानिकाsss सानिका ssss"


सानिका धावतपळत खाली आली.

"अरे सौरभ तू इथे? आज इकडे कसा काय? ये ना आत ये."


तो आत येऊन बसला.

"तुझ्या पिल्लुला बघायला आलो होतो."

"अरे वा, पण तू थोडा उशीर केला."

तो दचकून उभा झाला.

"अरे घाबरू नको, ती झोपली आहे आधी आला असता तर तिच्या सोबत तुला वेळ घालवता आला असता असं म्हणायचं होतं मला."

"घाबरलो ना मी."

दोघेही हसले.

काही वेळाने अंशुमन घरी आला, त्यांच्यामध्ये गप्पा रंगल्या. काही वेळ बाळासोबत खेळून सौरभ तिथून निघून गेला.

अंशुमन, सानिका आणि सुरभी तिघांचं त्रिकोणी कुटुंब बहरत होतं.

पण म्हणतात ना नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं, आपण जसा विचार करतो तसं काही घडतच नाही.

नशिबाचे फासे पलटले आणि नको ते घडलं. त्या एका घटनेमुळे सानिकाच्या आयुष्यात वादळ आलं. तिच्या आयुष्याची घडी विस्कटली.


काय घडलं असेल सानिकाच्या आयुष्यात? कोणत्या वादळामुळे तीच आयुष्य विखरलंय?
जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.