प्रीत नव्याने बहरली...भाग 68
नशिबाचे फासे पलटले आणि नको ते घडलं. त्या एका घटनेमुळे सानिकाच्या आयुष्यात वादळ आलं. तिच्या आयुष्याची घडी विस्कटली.
युरोपला जाणार विमान क्रॅश झालं होतं आणि त्यात अंशुमन होता.
अंशुमनची युरोपला बिझनेस मिटिंग होती आणि त्यासाठी तो पहाटे घरून निघाला होता.
बातमी कानावर पडली आणि सानिकाच्या पायाखालची जमीनच सरकली.
आई बाबांना कसं सांगावं या विचारात ती खाली गेली बघते तर काय दोघेही स्तब्ध बसून होते.
"आई."
तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.
तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.
"सानिका.."
दोघीही एकमेकींच्या गळ्यात हात घालून ढसाढसा रडायला लागल्या.
"सानिका बाळ सांभाळ स्वतःला, तुला यातून बाहेर पडून सुरभीचा सांभाळ करायचा आहे. तुला स्ट्रॉंग राहावं लागेल."
"आई का असं झालं? माझ्याच आयुष्यात हे सगळं का? आता कुठे सुरभीच्या येण्याने आनंदाचे दिवस आले होते. सगळं छान चाललेलं होतं आणि हे आता असं.."
ती पुन्हा रडायला लागली.
ती पुन्हा रडायला लागली.
अंशुमनची बॉडी ताब्यात मिळालेली नव्हती, कारण काही बॉडी पूर्णतः डॅमेज झाल्या होत्या.
अंशुमनच्या बाबांनी सगळे विधी केले.
हळूहळू दिवस जात होते.
तिघेही एकमेकांना सांभाळून घेत होते.
सानिका काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली होती. तिथे सौरभ तिला भेटायला आला.
त्याला बघून तिचे बाबा चिडले पण सानिकाने इशारा केल्यानंतर ते शांत झाले आणि तिथून निघून गेले.
दोघांचं नॉर्मल बोलणं झालं, त्याने तिला सांत्वना दिली आणि तिथून निघून गेला.
**********************
सौरभ त्याच्या घरी गेला.
"आई तू नेहमी म्हणतेस ना लग्न कर, या घरात एक सून घेऊन ये."
"हो तर पण तू मनावर घेशील तर ना."
"मी मनावर घेतलंय."
"मग मुलगी शोधायला सुरुवात करते."
"आई मी माझा जोडीदार शोधलाय."
"काय? कोण आहे ती मुलगी? बोलला नाहीस कधी."
"आई तू ओळखते तिला."
"कोण अशी मुलगी आहे जीला मी ओळखते."
"आई ती मुलगी नाही एका मुलीची आई आहे."
"सौरभ काय बोलतोस जरा नीट सांग."
त्याने दीर्घ श्वास घेतला.
"आई मी सानिका बद्दल बोलतोय."
"काय?" ती जोरात किंचाळली.
"तुला कळतंय का तू काय बोलतोस?"
"आई प्लिज तू शांत हो, बस इथे."
त्याने तिला बसवलं.
"तू मला काय शांत बसायला सांगतोस. विसरलास का सगळं? तिच्यामुळे तुला किती त्रास झाला. काय काय सहन केलं ते.?"
"आई आई जरा शांत हो, मी काहीही विसरलो नाही पण आई आता सानिकाची जी परिस्थिती आहे, त्यात मला तिची साथ द्यायची आहे आता ती एकटी आहे. आई थोडं समजून घे ना."
"ठीक आहे मी समजून घेते आणि मी तुझ्या लग्नाला परवानगी पण देते पण.."
"पण काय?"
"सानिकाचे सासू सासरे परवानगी देतील, एकवेळ ते तयार होतील पण तिचे बाबा.. ते तयार होतील का याचा विचार केलायेस तू?"
"आई तुझी परवानगी मिळाली बस झालं आता पुढचं मी बघतो."
असं म्हणून तो तिथून निघून गेला.
*********************
दुसऱ्या दिवशी सौरभ सानिकाच्या घरी गेला.
"सानिका मला तुझ्याशी बोलायचंय."
"बोल ना सौरभ काही अर्जंट आहे का?"
"हो मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं, तू बस आधी इथे."
"काय झालं सौरभ."
"सानिका बस ना, मला खूप महत्त्वाच्या आणि नाजूक विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे."
सानिका बसली, तो ही तिच्या बाजूला बसला.
"हे बघ सानिका मी जे काही बोलणार आहे ते शांतपणे ऐकून घे, त्यानंतर तू रिऍक्ट हो आणि तुला काय वाटतंय ते सांग पण माझं बोलणं नीट शांतपणे ऐकून घे प्लिज."
"असं काय बोलणार आहेस तू आणि किती टेन्शन घेतोयस रे मी शांतच आहे आणि शांतच राहणार आहे बोल तू."
"सानिका आधी तुझं आणि माझं नातं काय होतं हे तुलाही माहिती आहे त्यानंतर तुझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात जे काही घडलं तो नशिबाचा खेळ होता. सानिका मी जरा तुझ्याशी स्पष्टच बोलतोय मला तुझ्याशी लग्न करायचंय.
माझी जीवनसंगिनी होशील?"
सानिका ऐकून स्तब्ध झाली आणि तशीच उभी झाली.
"पण सौरभ तुला तर माहिती आहे ना माझं.."
ती समोर काही बोलणार सौरभ बोलला.
"सानिका समोरचं मी सगळं बघेल. तुझे सासू-सासरे, तुझे आई बाबा. सगळ्यांना तयार कसं करायचं कसं बोलायचं हे सगळं मी बघेन. मला फक्त तुझ्याकडून होकार हवाय. तुझा काय विचार आहे ते तू मला सांग."
"सौरभ मला विचार करायला वेळ हवाय."
"ठीक आहे तू घे तुझा वेळ."
असं बोलून सौरभ तिथे निघून गेला.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा