प्रीत नव्याने बहरली...भाग 69
"सौरभ मला विचार करायला वेळ हवाय."
"ठीक आहे तू घे तुझा वेळ."
असं बोलून सौरभ तिथे निघून गेला.
एक आठवडा खूप विचार करून सानिकाने होकार द्यायचं असं ठरवलं.
तिने सौरभला फोन केला.
"बोल सानिका."
"माझ्याकडून होकार आहे. पुढचं तू बघ." असं म्हणून तिने फोन ठेवला.
"हॅलो सानिका..सानिका."
फोन कट झालेला त्याला कळलंच नव्हतं.
'अशी काय वागली, माझं बोलणंही ऐकून घेतलं नाही.'
तो दुसऱ्या दिवशी सानिकाच्या सासरी गेला.
अंशुमनचे आई बाबा हॉलमध्ये बसलेले होते, त्यांनी त्याला आत बोलवून बसायला सांगितलं.
"बोल सौरभ आज इकडे कस काय येणं केलं?"
"मला तुमच्या दोघांशी काही बोलायचं होतं."
"बोल ना."
"मी कुठून सुरुवात करू आणि कशी करू मला कळत नाहीये पण बोलणं खूप गरजेचे आहे. तुम्ही काय रिऍक्ट कराल मला माहिती नाही पण माझ्या मनात विचार आला तो मी तुम्हाला बोलून दाखवतोय म्हणजे माझं ठरलंय मला तुमचा निर्णय हवाय."
"सौरभ जे काही आहे ते स्पष्टपणे बोल."
"काका अंशुमन गेल्यानंतर आता सानिका एकटी पडली आणि माझ्या मनात एक विचार आला की जर मी सानिकाला साथ दिली तर.. म्हणजे मी स्पष्ट सांगतो तुम्हाला मला सानिकाशी लग्न करायचं आहे आणि मला यासाठी तुमची परमिशन हवी आहे, तुमचर आशीर्वाद हवेत."
"पण सौरभ सानिका तयार होईल का?"
"सानिकाचं मी बघतो मला आधी तुमची परवानगी हवी आहे तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायचं आहे.
मला सानिकाला असं एकटं बघवंत नाही, संपूर्ण आयुष्य तिने एकटीने घालवावं अशी माझी इच्छा नाही. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले तर आमचंही आयुष्य चांगल जाईल. तुम्हाला विचार करायला वेळ हवा असेल तर तुम्ही नक्की घ्या मी तुमच्या उत्तराची वाट बघेल." असं म्हणून सौरभ तिथून निघून गेला.
त्यांनी सानिकाच्या बाबांना फोन केला.
"नमस्कार मुजुमदार साहेब आर्यमान बोलतोय."
"हा बोला बोला आज कसं काय फोन केला.
"तुम्ही त्या सानिकाच्या मित्राला ओळखता का सौरभला?"
"हो चांगलाच ओळखतो, त्याचं काय?"
"आज आमच्याकडे आलेला होता, त्याला सानिकाशी लग्न करायचं आहे, प्रस्ताव घेऊन आलेला होता."
"मग तुम्ही काय बोललात?"
"नाही अजून आम्ही काही बोललेलो नाही आहोत, याच संदर्भात मला तुमच्याशी चर्चा करायची होती आपण भेटू शकतो का?"
"हो हो नक्की तुम्ही या ना संध्याकाळी घरी."
"ठीक आहे, ठेवतोय."
संध्याकाळी सानिकाचे सासू सासरे तिच्या माहेरी गेले.
"या आर्यमन साहेब."
"नमस्कार."
"नमस्कार."
"या या बसा."
सगळे बसले, चहा नाश्ता झाला.
थोड्यावेळाने सौरभ तिथे आला.
त्याला बघून आर्यमनला आश्चर्य वाटलं.
"सौरभ तू इथे?"
"हो मीच बोलावून घेतलं त्याला. आता आपण जी चर्चा करणार आहोत त्यात याच असणं गरजेचं आहे म्हणून आपलं ठरल्यानंतर मी त्याला फोन करून इथे यायला सांगितलं.
सौरभ एका साईडला बसला.
"सानिका दिसत नाही आहे." आर्यमनने चहू दिशेने बघत बोलला.
"ती तिच्या खोलीत आहे."
"तर मग सौरभ बोल काय आहे तुझा विचार."
"मला सानिकाशी लग्न करायचं आहे."
"एकदा हिंमत केलीस आणि हरलास आता पुन्हा तुला तेच करायचं आहे. खरं तर तुझ्या हिंमतीची दाद द्यायला हवी तू अजूनही सानिकासोबत लग्न करण्याचा विचार करतोयस."
"सर फक्त विचार करत नाही आहे यावेळी मी लग्न करणार आहे."
"तुझी लायकी तरी आहे का तिच्या समोर उभी राहण्याची."
"डॅड.."मागेहून मोठा आवाज आला.
सगळ्यांनी त्या दिशेकडे वळून बघितलं.
"डॅड प्लिज आधीही तुम्ही तेच केलंत आणि आताही तेच करताय."
"पण सानू बाळा.."
"डॅड प्लिज तुम्हाला तुमचं स्टेटस, तुमची इज्जत, तुमचा मान हेच महत्वाच असतं ना मुलीचं सुख नकोय तुम्हाला."
"सानू बाळा असं नाही आहे."
"असंच आहे."
"सानिका तू नीट विचार कर हा मुलगा तुला सुखी तरी ठेऊ शकेल काय?"
"माझं सुख कशात आहे तुम्हाला कधी कळलंच नाही."
"याची लायकी तरी आहे का तुझ्या समोर उभं राहण्याची."
"डॅड प्लिज."
सानिका सौरभच्या बाजूला उभी झाली आणि त्याचा हात हातात घेतला.
क्रमशः