प्रीत नव्याने बहरली...भाग 70 अंतिम
"याची लायकी तरी आहे का तुझ्या समोर उभं राहण्याची."
"डॅड प्लिज."
सानिका सौरभच्या बाजूला उभी झाली आणि त्याचा हात हातात घेतला.
"डॅड मी सौरभसोबत लग्न करायला तयार आहे."
"पण सानू.."
"डॅड प्लिज."
सानिका तिच्या सासू सासऱ्यांजवळ गेली.
"आई बाबा तुम्हाला काय वाटतं मला जाणून घ्यायचं आहे. प्लिज तुम्ही बोला."
"सानिका तुझी हीच इच्छा असेल तर आमची काहीच हरकत नाही." अंशुमनच्या आईने तिला आशीर्वाद दिला.
ती तिच्या डॅडजवळ गेली.
"डॅड आता तरी तुमची काहीच हरकत नसेल ना."
"नो बेटा."
सगळे आनंदी झाले,
"पण मला हे लग्न मान्य नाही." सौरभची आई दारात उभी होती.
"आई तू." सौरभ तिच्या जवळ गेला.
"आई तू हे काय बोलतीयेस, तुला माहीत आहे ना मला सानिकाशीच लग्न करायचं आहे आणि तू परवानगी दिलेली ना मग आता काय झालं."
काही क्षण सगळीकडे शांतता पसरली.
त्यानंतर ती जोरजोरात हसायला लागली.
"अरे मी तयारच आहे. तुमचे चेहरे बघण्यासारखे झालेत."
"आई तू पण ना."
सगळे हसायला लागले.
"कुठे आहे माझी नातं?" त्याच्या आईने विचारलं.
सानिका लगेच आत गेली आणि तिच्या मुलीला घेऊन आली.
सौरभच्या आईने नातीचे लाड केले.
"मग सानिका यायचंय ना घरी."
तिने होकारार्थी मान हलवली.
लग्नाची तारीख ठरली.
अगदी साध्या पध्दतीने घरीच लग्नविधी पार पडला.
सानिका आणि सौरभ लग्न बंधनात अडकले.
सौरभ खूप आनंदात होता त्याचं प्रेम त्याला मिळालं होतं.
त्याची प्रीत नव्याने बहरली आणि सुखाचा संसार सुरू झाला...
त्याची प्रीत नव्याने बहरली आणि सुखाचा संसार सुरू झाला...
समाप्त:
नमस्कार वाचक मंडळी आज कथेचा शेवट झाला. तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. खरं तर मला पोस्ट करायला खूप उशीर होत होता त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. यापुढे कॉन्टिनुए लिहिण्याचा प्रयत्न असेल. नवीन कथा वाचायला आवडेल का नक्की सांगा. वाचत रहा, प्रतिसाद देत रहा.
धन्यवाद
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर