Login

प्रीत नव्याने बहरली...भाग 58

Love story

प्रीत नव्याने बहरली...भाग 58

सानिकाने आजीला सौरभबद्दल सगळं सांगितलं.
तिला बाबांना सांगायला सांगितलं.

"हो बाळा मी प्रयत्न नक्की करेन." असं म्हणून तिने तिच्या गालावरून हात फिरवला.

ती आजीला बिलगली, काहीतरी नक्की चांगलं घडणार हा विश्वास वाटत होता.

आज अंशूमन प्रतापच्या ऑफिसमध्ये गेला.

"हॅलो अंकल."

"अरे अंशुमन तू इकडे? ये ना ये. प्लिज हॅव अ सीट."

तो बसला.

"काय मग आज इकडे कसे येण केलं."

"सानिकाला घरी सोडलं, तुम्ही नव्हतात तर विचार केला की ऑफिसमध्ये जाऊन भेटावं. तुम्ही सांगा कसं चाललंय सगळं?"

"बेस्ट.. सगळं छान चाललंय, तू सांग तुझं कसं चाललंय?"

"हम्म ठीक चाललंय."

"काय घेणार थंड की कॉफी."

"नाही नको.."

"घेऊया, मी आत्ताच आलो तर मी कॉफी बोलवतो."

प्रतापने दोन कॉफी सांगितली.

दोघेही कॉफी प्यायले.

अंशुमन काहीतरी विचार करताना दिसला म्हणून प्रतापने त्याला विचारलं.

"काय विचार सुरू आहे?"

"काही नाही, विचार करतोय की ज्या माणसांवर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला तीच माणसं माझ्यापासून काहीतरी लपवतायेत."

"काय झालं अंशुमन? कुणी काय लपवलं? कुणाबद्दल बोलतोयस?"

"नाही काही नाही." तो तिथून निघून गेला.

"हा काय आणि कुणाबद्दल बोलत होता." प्रताप विचार करू लागले.

.....................................

गायत्री तिच्या खोलीतून बाहेर निघाली, तिला सानिकाचा बोलण्याचा आवाज आला म्हणून ती आजीच्या रूमकडे गेली. तिला सानू आणि आजी गप्पा मारताना दिसल्या.

"अग सानू तू कधी आलीस?"

"बराच वेळ झाला."

"अगं मग मला आवाज द्यायचा ना."

"अग मला आजीशी बोलायचं होतं म्हणून मी आधी आजीच्या रूममध्ये आली, तू येना बस इथे. आपण तिघी छान गप्पा मारूयात."

"अग नाही आता नाही, आता जेवणाचे पान घेते आपण तिघी जेवण करूया आणि मग छान गप्पा मारत बसूया."

त्यांचं बोलणं सुरू होतंच की तितक्यात प्रताप आले.

"अहो तुम्ही यावेळी घरी? या ना बसा तुम्ही पण आमच्या सोबत जेवायला."

"सानू तू कधी आलीस बाळा?"

"बाबा सकाळीच आले, अंशुमनने इकडे सोडलं आणि तो ऑफिसला गेला आणि संध्याकाळी तो मला घ्यायला येणार आहे."

प्रताप त्याच्या खोलीत जायला निघाला, जाताना सानूला सांगून गेला,

"सानू माझ्या खोलीत ये."

"यांना काय झालं? असे का खोलीत निघून गेले. आणि सानूला का बोलावलं असेल?" गायत्री एकटीच बडबडली.

"सानू जा बाळा, काय म्हणतायेत बघ."

सानिका प्रतापच्या खोलीत गेली.

"आधी तिला जेवण करू द्यायचं होतं मग बोलवायला हवं होतं ना, एवढं काय अर्जंट त्यांना बोलायचं होतं. इतक्या दिवसानंतर मुलगी घरी आली आहे त्याचं काहीच कौतुक नाही, पटकन खोलीत बोलावलं तिला. दोन घास खाऊ तरी द्यायचे होते." गायत्री एकटीच पुटपुटली

"येईल ग ती तू उगाच काही बोलू नको." रमा आजीने तिला समजावलं.

"बाबा आत येऊ."

"हम्म ये बस."

"बोला ना बाबा, काही काम होतं?"
 

"तू अंशुमनला काय बोललीस?"

"मी काहीच बोलले नाही बाबा. तुम्ही कशाबद्दल बोलताय?"

"तू अंशूमनला सौरभ बद्दल काय सांगितलं?"

"नाही मी अजूनतरी काही सांगितलेलं नाहीये, तुम्ही मला असं का विचारताय आणि मी त्याला का सांगेल? आता लग्न झालंय आमच्या दोघांचं, आम्ही एकमेकांसोबत खुश आहोत, आनंदात आहोत. सो मी सौरभच्या विषयी त्याला कशाला काय सांगेल?"

"मग तो आज का बोलला की ज्या माणसांवर मी सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच माझ्याशी खोटं बोलतायेत, तो मला असा म्हणाला आणि निघून गेला, याचा अर्थ काय आहे?"

"तुम्ही डायरेक्ट त्याला विचारायला हवं होतं, तसं स्पष्टपणे बोलायला हवं होतं कारण मी तरी त्याला काहीही बोललेले नाहीये. पण बाबा अंशुमन तुम्हाला कुठे भेटला?"

"ऑफिसमध्ये आला होता."

"अच्छा."

"हे बघ सानिका तुला मी शेवटचं बजावतो
मला तुझ्या लाईफमध्ये आणि माझ्या बिझनेसमध्ये काहीही  गडबड नकोय."

"पण बाबा मी असं काही केलेले नाहीये, मी त्याला कधीच काही सांगितलेलं नाहीये किंवा मी असं दाखवलेले नाहीये की माझं त्याच्यावर प्रेम नाहीये दुसऱ्या कुणावर आहे."

"सांगायचे नाही त्याला कधीही, त्याला कधीही कळता कामा नये."

"बाबा मी तुम्हाला प्रॉमिस करते माझ्याकडून मी त्याला कधीही काही सांगणार नाही पण बाबा मला तुमच्याशी सौरभ बद्दल काय बोलायचं होतं."

"बोल."

"बाबा तुम्ही त्याला इकडे परत आणा हो, तो शरीराने खूप थकलाय, इथे त्याची आई त्याची काळजी घेऊ शकेल, त्याची मनस्थिती बिघडलेली आहे, शरीर साथ देत नाहीये.
बाबा प्लिज नाही म्हणू नका, एवढं तरी करा हो. मी तुम्हाला प्रॉमिस करते मी कधीही त्याला भेटणार नाही की त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार नाही."

प्रतापने हाताच्या इशाऱ्याने तिला थांबवलं.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all