प्रीत नव्याने बहरली...भाग 59
"बाबा तुम्ही त्याला इकडे परत आणा हो, तो शरीराने खूप थकलाय, इथे त्याची आई त्याची काळजी घेऊ शकेल, त्याची मनस्थिती बिघडलेली आहे, शरीर साथ देत नाहीये.
बाबा प्लिज नाही म्हणू नका, एवढं तरी करा हो. मी तुम्हाला प्रॉमिस करते मी कधीही त्याला भेटणार नाही की त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार नाही."
बाबा प्लिज नाही म्हणू नका, एवढं तरी करा हो. मी तुम्हाला प्रॉमिस करते मी कधीही त्याला भेटणार नाही की त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार नाही."
प्रतापने हाताच्या इशाऱ्याने तिला थांबवलं.
सानिकाचे डोळे पाणावले, ती त्यांच्यासमोर गुडग्यावर खाली बसली आणि त्यांच्यासमोर हात जोडून विनंती करू लागली.
"बाबा मी आयुष्यात तुम्हाला कधीही काही मागणार नाही. फक्त एकदा त्याला जीवनदान द्या." सानिका रडायला लागली.
"मी बघतो काय करायचं ते." असं म्हणून प्रताप खोलीच्या बाहेर गेले.
काही क्षणात गायत्री आत आली, तिने सानिकाला सावरलं. तिला उठवून बाहेर हॉलमध्ये आणलं.
"सानू शांत बाळा, बस इथे."
प्रताप जेवण न करता तसेच निघून गेले. काही वेळाने सानिका शांत झाली. तिघांनीही जेवण केली, सानिकाने आराम केला.
संध्याकाळी अंशुमन तिला घ्यायला आला.
"हाय अंशुमन, बस मी तुझ्यासाठी स्ट्रॉंग कॉफी बनवून आणते."
"नाही मी घरी जाऊन घेईल, तुझं झालं असेल तर निघुया."
"अरे पण.." ती काही बोलायच्या आता तो उठून निघून गेला.
त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते.
"हा असा का वागतोय?" तिने स्वतःलाच प्रश्न केला.
"आई मी येते ग."
सानूचा आवाज ऐकून गायत्री लगेच आली,
"काय ग एकटीच निघालीस का? अंशुमन येणार होता ना तुला न्यायला?"
"आई तो आलाय, बाहेर उभा आहे."
"अग आत बोलावं ना त्याला आणि आज तुम्ही जेवणच करून जा."
"आई त्याचा मूड नसेल, तो कॉफीला पण नाही म्हणाला. आई तो बाहेर जाऊन उभा आहे, मी जाते."
"काय ग काही बिनसलं का तुमच्या दोघांचं?"
"नाही ग, सकाळपर्यंत चांगलाच होता. ऑफिसमध्ये काही झालंय? की अजून काही मला माहिती नाही. मी घरी जाऊन बोलते त्याच्याशी. तू काळजी करू नकोस आणि उद्या कळते तुला फोन करून काय झालं ते. मी येते आता."
"हो, नीट जा ग."
"हो, बाय."
सानिका बाहेर गेली, अंशुमन गाडीत बसलेला होता. ती गाडीत बसली. गाडीमध्ये दोघेही गप्प होते. अंशुमन तिच्याशी एकही शब्द बोललेला नव्हता. रोज तो खूप बोलायचा, जाताना येताना गाडीमध्ये दोघांमध्ये खूप बोलणं व्हायचं पण आज अंशुमन अगदी शांत बसलेला होता.
सानिकाला त्याला विचारायची खूप इच्छा झाली पण तो काय म्हणेल तो चिडेल का या विचाराने तिने त्याला काहीच विचारले नव्हते. ती पण शांत बसलेली होती. थोड्यावेळाने दोघेही घरी पोहोचले. घरी गेल्या गेल्या अंशुमनच्या आईने विचारले.
"अरे वा आला तुम्ही दोघे." तिने हसून स्वागत केलं.
अंशुमनने त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला.
"काय ग याला काय झालं?"
"माहित नाही घरी न्यायला आला तेव्हाही गप्पच होता, बसला देखील नाही. कॉफी घे विचारलं त्यालाही नाही म्हणाला आणि आता गाडी तर अगदी गप्प बसला होता. रोज खूप बोलतो तो पण आज काहीच बोलला नाही. सकाळी मला नेऊन दिले तेव्हा तो चांगलाच होता मग दिवसभरात काय झालं असेल कुणास ठाऊक."
"बरं मी त्याच्या आवडीची कॉफी बनवते तू तोवर बघ त्याला बोलतोय का तुझ्याशी, मूड व्यवस्थित होतोय का त्याचा?"
तिने होकारार्थी मान हलवली आणि ती त्याच्या खोलीत गेली.
तो चेंज करून लॅपटॉप वर काहीतरी करत बसलेला होता, ती हळूच त्याच्या बाजूला जाऊन बसली.
"अंशुमन काय झालं? तू माझ्यावर रागावला आहेस का? ऑफिसमध्ये काही झालंय का?"
"तू चेंज कर आताच आलीस ना फ्रेश हो मग बोलू आपण."
"अंशुमन तू असा गप्प आहेस तर मला काहीच चांगलं वाटत नाहीये, तू काहीतरी बोल ना माझं काही चुकलं असेल तर मला रागाव पण बोल माझ्याशी असं गप्प राहू नकोस."
"सानिका तू चेंज कर आधी." त्याचा आवाज थोडा वाढला, तशी ती त्याच्या बाजूने उठून उभी झाली आणि पटकन चेंज करायला गेली.
चेंज करून आली,
अंशुमनची आई दोघांसाठीही कॉफी घेऊन आली,
"अंशुमन तो लॅपटॉप बाजूला ठेव, तुझं कामही बाजूला ठेव आणि कॉफी घे. तुझ्या आवडीची कॉफी आणली आहे, चला दोघांनी कॉफी घ्या."
त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि कॉफीचा मग उचलला.
"सानिका तू ही घे बाळा." सानिकाने एक मग उचलला.
"आई तुम्ही तुमच्यासाठी नाही बनवलं."
"अग मी आत्ताच घेतली, तुम्ही दोघे घ्या."
अंशुमनची आई अंशुमच्या चेहऱ्याकडे बघतच होती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा