Login

प्रीत परी तुजवरती

Prit Pari Tujvarti
परी ©®विवेक चंद्रकांत........कॉलेजच्या फायनल year ला होतो.
क्लासमध्ये नवीनच मुलगी आलेली.
धारदार नाक, गोरीपान, सडपातळ.
सगळ्या मुलांच्या नजरा तिच्याकडे.
तरीही ती अप्राप्य वाटतं होती.
तिच्यासोबत एक मुलगी सतत असायची.
कदाचित तिची एकमेव मैत्रीण.

मी तिच्या भानगडीत पडलो नाही.
पण कधीतरी....
तिच्याकडे पहिले तर ती माझ्याकडे
बघत असायची.
नजरानजर व्हायची.
डोळ्यांची भाषा कळायची.
माझ्यात तिने काय बघितले कोण जाणे?
कदाचित माझा निरागस चेहरा.
माझे सिन्सिअर वागणे.
तिच्यामागे न लागणे.

एकदा मी मोटरसायकल काढत होतो पार्किंग मधून.
तिही त्याचवेळी आली.
माझ्याजवळ येतं हळू आवाजात म्हणाली.
"आपसे मिलना हैं,... बाते करनी हैं."
हा स्पष्ट इशारा होता.
" कल saturday हैं. एक्सट्रा class चार बजे होगी.
बंक करके पार्क मे मिलेंगे कॉलेज के पीछे. "
माझा आवाज शांत होता. पण हात थरथरत होते.
हृदयाची गती एक्सप्रेस सारखी होती.
"अकेली नहीं आ सकती. परी आयेगी साथमे."
परी तिच्या मैत्रीणीचे नाव असावे.
माझ्या चेहऱ्यावर नकळत "ही कशाला कबाबमे हड्डी " असे भाव आले असावे.
तिला उमगले.
"घरवाले अकेलीको नही छोडते."
"ठीक हैं. मोबाईल no. देदो."
"मोबाईल नही हैं."
मी तिच्याकडे अठराव्या शतकातल्या वास्तुकडे पाहावे तसे पहिले.
"मै कल मिलती हू." ती घाईघाईत म्हणून निघून गेली.


दुसऱ्या दिवशी मी पार्कात.
पौणे चारशीच.
बरोबर चार वाजून पाच मिनिटांनी ती आली.
परी सोबत होती. पण ती मागे थांबली.
एका कोपऱ्यात गेलो.
बेंचवर बसलो.
जवळ जवळ खेटूनच.
गुलाबाचा सुगंध धुंद करत होता.
तिने खास आज काढला असावा.
"क्या बात करनी हैं?"
मी चाचरत विचारले.
तिने उत्तर दिले नाही.
त्याऐवजी माझ्या हातावर हात ठेवला.
शरीरात विद्युप्रवाह सुरु झाला.
मी तिचा हात घट्ट धरला तेव्हढ्यात.....


परी धावत आमच्याकडे आली.
धपापत.. जेमतेम बोलली.
"तेरा भाई दिखा मुझे
शायद तुझेही धुंड रहा हैं.."
ती athelit च्या फुर्तीने उठली.
"बादमे मिलती हूं "
ती मागच्या गेटने पसार.
मी सुन्न बधीर.
मग लक्षात येते परी तिथेच उभी.
"तू नही जाती?" मी विचारतो
"नही.अब मै बोलती वैसा कर"
ती माझ्या अगदी जवळ बसते.
हातात हात घेते.
"मेरी आखोंमे देख."
मी तिच्या डोळ्यात पाहतो.
तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करतो.
सुंदर नाही पण गोड चेहरा.
चेहऱ्यावर समंजस भाव.
डोळ्यात माझ्याविषयी काळजी.
मला अगदी छान वाटते तिच्याकडे बघतांना.

तिचा भाऊ येतो.
उंचपुरा धीप्पाड. इकडेतीकडे पाहत.
आमच्याकडे पाहतो संतापात.
परीला पाहून काहीतरी तोंडात बोलतो.
थुकतो.
परीचा हात थरथरतो.
मी तिचा हात घट्ट धरतो.
आश्वासक थोपटतो.
भाऊ निघून जातो.

परी हात सोडते.
ओढणीने चेहऱ्यावरचा घाम पुसते.
"बच गये, तूमभी, वो भी "
ती म्हणते.
"आपका क्या?"
ती बोलत नाही. निघते.
मला काहीतरी बोलायचं असते.
पण त्याआधीच ती घाईने निघून जाते.

दुसऱ्या दिवसापासून ती कॉलेजला येतं नाही.
तिसऱ्या चवथ्या दिवशीही नाही.
महिना उलटून गेलेला.
परी दिसते. पण मला टाळते.
परी एकटीही सापडत नाही.
मी अस्वस्थ...

एकदा लायब्ररीतून निघतांना परी दिसते.
एकटीच.
मी त्वरित गाठतो तिला.
मी काही बोलण्याच्या आधीच ती म्हणते
"मुझसे बात मत करो.
मुझे नहीं पता वो कहा हैं?"
मी तिचा रस्ता अडवतो.
"मुझे तुमसेही बात करनी हैं"
ती बावरते. "मुझसे?"
"हा. क्या तुम वोही पार्क मे मुझे मिलोगी कल?"
" क्यो? " तिच्या चेहऱ्यावर समजत नसल्याचे भाव.

"उसदिन तुमने मेरा हाथ थामा थां.
कल मै तुम्हारा हात पकडना चाहता हूं."

ती आश्चर्याने माझ्याकडे बघते.

"क्या तुम्हे मंजूर हैं?" मी विचारतो.

ती लाजून मान खाली घालते.
काही न बोलता धावत सुटते...

मी उद्या पार्कमध्ये कोणता ड्रेस घालून जाऊ याचा विचार करतोय....
©®विवेक चंद्रकांत....