मागच्या भागात आपण पाहिलं की स्वप्नाली विकासच्या घरी त्याला भेटायला गेली होती. तिथं गेल्यावर तिला विकासची अंथरुणाला खिळून असलेली त्याची आई दिसली. आणि आता पुढे....
"स्वप्नाली खरंतर मी आता जसा आहे तसा अलिप्त, खडूस एकलकोंडा नव्हतो. मी एकदम मनमोकळा माणसांमध्ये रमणारा आत्मविश्वासाने भरलेला मुलगा होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईने माझी आणि माझ्या दोन लहान बहिणींची जबाबदारी घेतली. शहरात लहानाचे मोठे झालेलो आम्ही भाऊ बहीण वडिलांच्या मृत्यूनंतर गावी परतलो. गावी आमची बरीच शेती होती. माझ्या आईने तिचे शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वडील गेले असले तरी आईने कष्ट करून मला आणि माझ्या दोन्ही बहिणींना काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली होती. त्यामुळे आम्ही अतिशय चांगल्या तर्हेने आमचं आयुष्य जगत होतो. मी अभ्यासात हुशार असल्यामुळे आईच्या इच्छेनुसार इंजिनिअर झालो. आणि माझ्या बहीणीदेखील चांगलं शिक्षण घेऊन पदवीधर झाल्या होत्या. मी कॉलेजमध्ये शिकत असतानाच माझ्या दोन्ही बहिणींची लग्न झाली होती. घरची शेती आणि वडिलांनी जमवून ठेवलेल्या पैशांमुळे आम्हाला कशाचीच कमतरता जाणवली नाही. अगदी सुखवस्तू आयुष्य आम्ही जगत होतो. माझ्या बहिणीपण त्यांच्या सासरी सुखी होत्या.
अशातच माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मला इथं पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. मी मुळातच हुशार, हसरा आणि मनमिळावू असल्यामुळे ऑफिसमध्ये माझी प्रतिमा अगदी चांगली होती. माझ्या सिनिअर आणि माझ्या सोबत काम करणार्यांमध्ये मी चांगलाच मिसळून गेलो होतो. त्यावेळी मला पगार पण खूप चांगला होता. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे मला कुणालाही पैसे द्यावे लागत नव्हते. त्यामुळे ऑफिसच्या मित्र मैत्रिणींसोबत फिरणे मजा मस्ती करणे यातच माझे दिवस जात होते. तेव्हाच माझ्या आयुष्यात आली मधुरा. मधुरा ही पुण्यातल्या चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअर झाली होती. मला कंपनीत एक वर्ष झाले होते. तेव्हा मधुरा आमच्या कंपनीत जॉईन झाली होती. तिला आमच्याच टीममध्ये काम मिळालं होत. मग कामाच्या निमित्ताने हळू हळू आमच्यात बोलणं होऊ लागलं. आणि आम्ही हळू हळू जवळ येत होतो. मधुरा हुशार, देखणी आणि मनमोकळी होती. पण तिच्या घरची परिस्थिती मात्र तितकीशी चांगली नव्हती. त्यामुळे तिला पैशाची कायमच चणचण असायची. जसजसे आम्ही एकमेकांच्या जवळ येत होतो तसतसं मी तिच्यात आणखीनच गुंतत जात होतो. "
हे बोलून विकास जरासा थांबला. त्याचे डोळे त्या जुन्या आठवणींनी भरून गेले होते. त्याच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू त्याची मधुरसोबाबत असलेली भावनिक गुंतवणूक स्पष्ट दाखवत होते. त्याची ती अवस्था पाहून स्वप्नालीने विकासाचा हात घट्ट दाबला. त्या स्पर्शाने विकास भानावर आला आणि त्याने त्याच्या दुसऱ्या हाताने डोळ्यात आलेलं पाणी टिपलं. आणि तो पुढे बोलू लागला.
"मी मधुरामध्ये पूर्णपणे गुंतून गेलो होतो. आम्ही दोघांनी मिळून भविष्यकाळाची अनेक स्वप्ने बघितली होती. नेमकं त्याचवेळी मधुराच्या आईवडिलांनी तिच्या लग्नासाठी मुलं बघायला सुरुवात केली. आणि हि गोष्ट मधुराने मला सांगताच मी गावी आलो आणि आईला माझ्या आणि मधुराविषयी सगळं सांगितलं. आईला मधुराच्या फोटो दाखवला. आईलादेखील मधुरा आवडली आणि तिने दुसऱ्याच दिवशी माझ्या बहिणींना बोलावून सगळं सांगितलं. आणि त्यांच्या होकारानंतर आम्ही सर्वजण मधुराच्या घरी जाऊन तिला मागणी घातली. आमची परिस्थिती पाहून मधुराच्या घरच्यांनाही काहीच अडचण नव्हती. तेव्हा त्यांनी पण आमच्या लग्नाला परवानगी दिली. आणि एका महिन्यानंतर आमच्या लग्नाची तारीख ठरली. सगळं कसं सुरळीत चालू होत. माझ्या लग्नाची तयारी करण्यात आई आणि दोन्ही बहिणी गुंतूंन गेल्या होत्या.
आणि तो काळाकुट्ट दिवस माझ्या आयुष्यात आला. लग्नाच्या खरेदीसाठी आई माझ्या दोन्ही बहिणी आणि दाजी असं सगळं कुटुंब एकत्र एका गाडीने मुंबईला आलो होतो. सर्व खरेदी करता करता रात्र केव्हा झाली हेच समजलं नाही. आम्ही साताऱ्याला माघारी निघालो. माझे छोटे दाजी गाडी चालवत होते. आणि खंडाळ्याच्या घाटात अचानक समोरच्या ट्रकने ब्रेक मारून ट्र्क थांबवला. माझ्या दाजींना मात्र अचानक गाडी थांबवणं जमलं नाही आणि आमची गाडी त्या ट्रकवर जाऊन आदळली. तो अपघात इतका भयानक होता की गाडीत समोरच्या सीटवर बसलेली माझी छोटी बहीण आणि छोटे दाजी जागीच हे जग सोडून गेले. मधल्या सीटवर बसलेल्या माझ्या मोठ्या बहिणीला आणि मोठ्या दाजींना देखील बराच मार लागला होता. आणि आमच्या नशिबाने म्हणा आम्ही गाडीत एकदम मागे बसलो होतो त्यामुळे आईला आणि मला जास्त काही झालं नाही. पण स्वतःच्या डोळ्यादेखत झालेल्या भीषण अपघाताने माझ्या आईला जबर मानसिक धक्का बसला. आणि ती बोलणं चालणं विसरून गेली. जिवंत असून पण ती एखाद्या मृतदेहासारखी होऊन गेली."
बोलता बोलता विकास थांबला. त्याच्या डोळ्यातून आता अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. त्याची अवस्था पाहून स्वप्नालीचे डोळे देखील भरून आले होते. तरीदेखील स्वप्नाली उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन तिने विकासला पाण्याचा एक ग्लास आणून दिला. दोन घोट पाणी पिल्यानंतर विकास थोडासा भानावर आला होता. तो काही वेळ तसाच शांत राहिला. स्वप्नाली विकासाच्या अगदी जवळ बसली होती. तिने अतिशय प्रेमाने विकासाचा एक हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने विकासाच्या डोळ्यातील अश्रू पुसले. विकासाच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते. काही वेळानंतर विकास पुढे सांगू लागला.
"अपघातात जबर जखमी झालेल्या माझ्या मोठ्या बहिणीला आणि दाजींना आम्ही पुण्यातल्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आणि अक्षरशः पाण्यासारखा पैसे खर्च करून त्या दोघांना वाचवले. त्यासाठी आम्हाला आमचं गावाकडचं घर आणि जमीन विकावी लागली. माझे ताई आणि दाजी जरी बरे झाले तरी आई मात्र तिच्या जबदस्त मानसीक धक्यातून बाहेर येऊ शकली नाही. डॉक्टरांनी आम्हाला सांगितले कदाचित आई कधीच बरी होणार नाही. सुरुवातीला मधुरा रोज हॉस्पिटलमध्ये येत असायची. पण ती जेव्हापण यायची तेव्हा तिला माझ्या कुटुंबाच्या काळजीपेक्षा त्यांच्यावर खर्च होणाऱ्या पैशाची काळजी असायची. आणि ज्या दिवशी तिला समजलं की मला माझं गावाकडचं घर आणि जमीन विकावी लागली आहे तेव्हा मात्र तिच्या संयमाचा आणि रागाचा स्फोट झाला. आणि तिचं खरं रूप माझ्या समोर आलं. मी ज्या मधुरावर प्रेम केलं होतं ती हि मधुराच नव्हती. हि होती पैश्याला आणि छानछोकी आयुष्याला महत्व देणारी एक सामान्य मुलगी." विकास थांबला आणि काही वेळाने म्हणाला " तुला माहितीये का स्वप्ना ती मला शेवटचं भेटली तेव्हा काय म्हणाली? ती म्हणाली विकास मी खूप विचार केला आपल्या दोघांबद्दल आणि मला वाटतंय आपल्या आयुष्याचा आणि भविष्याचा निर्णय घेताना फक्त भावनिक न होता प्रॅक्टिकल होणं पण गरजेचं आहे. मी लहानपणापासून गरिबीतच वाढले. माझ्या प्रत्येक इच्छा आकांक्षा मारतच जगत आले होते. पण जेव्हा तुला भेटले तेव्हा मला वाटलं तुझ्यासोबत मी सुखाने माझं आयुष्य जगेन माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकेन. पण आता सगळी परिस्थिती बदलून गेली आहे. आता तुझ्याकडे काहीच राहील नाही. आणि भविष्यात तुझ्या आईची जबाबदारी घेऊन मी नाही जगू शकणार. तेव्हा आपण वेगळं होणं हेच चांगलं आहे. ती एवढंच बोलली आणि माझं उत्तरही न ऐकता माझ्याकडे पाठ फिरवून निघून गेली. "
"त्या जीवघेण्या अपघातात वाचलेला विकास त्यादिवशी मात्र मनातून मरून गेला. आयुष्यात येणारी सगळी लोकं ही काहींना काही हेतू मानत ठेऊन येतात आणि ती पूर्ण होत नसतील तर समोरच्याचा विचारही न करता पाठ फिरवून निघून जातात असं माझ्या मनाने पक्के समजून घेतले. हसरा, मनमिळावू, सतत लोकांमध्ये राहणार विकास मारून गेला आणि जन्म झाला अलिप्त आणि तुसड्या विकासाचा." असं बोलून विकास थांबला. त्याच्या डोळ्यातून पुन्हा पाण्याची धार लागली होती. तो त्याचे डोकं दोन्ही हातात घेऊन मान खाली घालून बसून होता. त्याची ती अवस्था मात्र आता स्वप्नालीला बघवत नव्हती. ती विकासजवळ सरकली आणि तिने विकासला आपल्या मिठीत घेतले. स्वप्नालीच्या मिठीत जाताच विकासने आतापर्यंत त्याच्या भावनांना घातलेला बांध फुटला. आणि विकास एखाद्या लहान मुलासारखा रडू लागला. रडणाऱ्या विकासला मिठीत घेऊन स्वप्नाली त्याच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवत होती आणि तेव्हाच तिची नजर बेडरूममध्ये पडलेल्या विकासाच्या आईकडे गेली. आणि तिला विकासाच्या आईच्या डोळ्यात एक चमक दिसली होती.
तर कसा वाटला आजचा भाग नक्की कमेंट करून सांगा. विकास आणि स्वप्नालीच नात आता कोणत वळण घेणार? ते जाणून घेण्यासाठी वाचत रहा प्रीत उमलताना.....
धन्यवाद.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा