मागच्या भागात आपण पाहिलं की विकास आणि स्वप्नाली यांच्या मधला अबोला संपवण्यासाठी विकासने पुढाकार घेतला. पण स्वप्नालीने त्याला थंड प्रतिसाद दिला होता. आता पुढे काय होणार चला जाणून घेऊ.....
दुसऱ्या दिवशी स्वप्नाली नेहमीप्रमाणे ऑफिसला आली. तेव्हा विकास आधीपासूनच त्याच्या जागेवर बसून काम करत होता. विकासाकडे पाहताच स्वप्नालीला कालचा सगळं प्रसंग आठवला. अतिशय उदासपणे हसून बसमधून उतरणारा विकास तिला आठवला आणि चार महिन्यानंतर पहिल्यांदाच स्वप्नाली विकासजवळ जाऊन त्याला गुड मॉर्निंग असं म्हणाली. त्यावर विकासने चमकून वर पहिले तर समोर पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये स्वप्नाली उभी होती. विकास तिच्याकडे पाहतच राहिला. ते पाहून स्वप्नाली हसून पुन्हा एकदा त्याला म्हणाली "विकास सर गुड मॉर्निंग." तस एकदम भानावर येत विकास देखील तिला छानसं स्माईल देत गुड मॉर्निंग म्हणाला. स्वप्नाली छानसं हसत तिच्या जागेवर येऊन बसली आणि काम सुरु केला. त्याचवेळी मयुरी तिच्याजवळ जात म्हणाली "काय मॅडम आज सूर्य कुठल्या बाजूला उगवला कि त्यामुळे त्या खडूस माणसाने चक्क हसत हसत तुला गुड मॉर्निंग म्हटलं." त्यावर स्वप्नाली म्हणाली "काय माहित यार." पण हे बोलत असतानाच स्वप्नालीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव उमटला होता. आणि मयुरीने नेमका तोच भाव पकडला आणि तिच्याकडे डोळे मोठे करत विचारले, "काय मॅडम एकदम ब्लश करताय. जरा जपून हा तुझी लक्षण काही ठीक नाही वाटत मला." ते ऐकताच स्वप्नालीने हसत मयुरीकडे दुर्लक्ष केलं आणि ती तिच्या कामाकडे वळली.
स्वप्नाली तिच्या कामात एकदम मग्न झाली होती. अचानक तिने मान वर करून समोर पहिले तर विकास तिच्याकडेच पहात होता. तिने अचानक पाहिल्यामुळे तो गडबडून गेला आणि त्याने पटकन मान लॅपटॉपकडे वळवली. त्याची झालेली गडबड पाहून स्वप्नाली स्वतःशीच हसली. आणि तिने देखील लॅपटॉपकडे मोर्चा वळवला. पण आता मात्र तीच कामातलं मन उडून गेलं होतं. आणि तिच्या मनात विकासाचा विचार सुरु झाला होता. विकास जरी ३६-३७ वर्षाचा असला तरी तो दिसायला अगदी देखणा होता. त्याचं व्यक्तिमत्व हे कोणालाही आकर्षित करून टाकणारं होतं. त्यातच भर म्हणून तो त्याच्या कामात अगदी परिपूर्णदेखील होता. असे सगळे विचार स्वप्नालीच्या मनात येत होते. तेव्हाच अजून एक विचार तिच्या मनात आला कि इतके सगळे चांगले गुण आहेत तर मग विकास नक्कीच मॅरीड असला पाहिजे. कुणी सांगावं त्याला मुलंदेखील असतील. असा विचार मनात येताच स्वप्नालीचा चेहरा पडला. तिने विचार केला की आपल्या मनात जे चालू आहे ते कुणाला तरी सांगावं म्हणजे आपल्याला दुसऱ्या बाजूचा विचार समजेल. स्वप्नाली मनाशी असा विचार करतच मागे वळली आणि मयुरीला म्हणाली "ऐक ना मयुरी. चल ना कॅंटीनमध्ये मला तुझ्याशी एक खूप महत्वाचं बोलायचं आहे.
मयुरी आणि स्वप्नाली कॅंटीनमध्ये पोहचताच मयुरी स्वप्नालीला म्हणाली " बोला बाईसाहेब इतकं काय महत्वाचं बोलायचं आहे." तेव्हा स्वप्नाली म्हणाली " सांगते पण प्रॉमिस कर हे फक्त आपल्या दोघीत राहील." ते ऐकताच मयुरी म्हणाली " स्वप्ने तू मला आज ओळखतेस का? आपण कॉलेजपासून सोबत आहे." मग थोडा विचार करून स्वप्नाली म्हणाली "अग कसं सांगू तेच कळत नाहीये यार. मला ना विकास सर आवडायला लागलेत. माझ्या मनात सतत त्यांचे विचार येत असतात. काय करू तेच समजत नाहीये." स्वप्नालीच बोलणं ऐकून मयुरी शांतपणे म्हणाली "अरे बाळा तुला हे आत्ता जाणवलं असलं तरी मला मात्र हे गेल्या काही दिवसापासून जाणवत आहे. पण तू नीट विचार केलया का या गोष्टीचा? म्हणजे त्यांचं वय ३६-३७ तरी असेल आणि तुझं वय २५. " तेव्हा स्वप्नाली म्हणाली "वयाचं काय इतकं मोठं नाही ग मयुरी. तो विचार माझ्या मनात आला नाही तर माझ्या मनात दुसराच एक विचार येतोय सारखा आणि त्याच विचाराची भीती वाटतेय." "कसला विचार? आणि भीती कसली वाटतेय?" मयुरी म्हणाली. तेव्हा स्वप्नाली म्हणाली " अग जर विकास सर मॅरीड असले तर ? मग कस होईल?" हे ऐकताच मात्र मयुरी हसू लागली आणि म्हणाली "अरे कॉलेज आणि इथं ऑफिसमध्ये जिच्यामागे मुलांची लाईन लागायची ती मुलगी मात्र तिच्यापेक्षा बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाच्या प्रेमात पडली. खरं आहे देवा, प्रेम हे आंधळच असतं." तिला हसताना बघून मात्र स्वप्नाली जाम वैतागली आणि म्हणाली " काय यार तूपण माझी चेष्टा कर. मला वाटलं तू तरी मला समजून घेशील. मला मदत करशील. पण नाही तू फक्त माझी मजा घे." असं बोलता बोलता स्वप्नालीच्या डोळ्यात पाणी तरळलं.
ते पाहिल्यावर मात्र मयुरीला समजलं की स्वप्नाली खरच विकासाच्या प्रेमात पडली आहे. तिने विकासाबाबत थोडा विचार केला आणि तिलादेखील हे जाणवलं की विकास हा हुशार दिसायला देखणा आणि समजूतदार असा माणूस आहे. त्याच्यात नावे ठेवण्यासारखा एकच गुण आहे तो म्हणजे त्याचा एकलकोंडेपणा. तेव्हा स्वप्नाली विकासाच्या प्रेमात पडली यात तिला आता काही विचित्र वाटलं नाही. पण स्वप्नालीच्या मनात विकासाच्या लग्नाचा जो मुद्दा आला होता तोच एक मोठा प्रश्न होता. मयुरी स्वप्नालीला कॉलेजच्या दिवसापासून ओळखत होती. स्वप्नाली ही नुसती देखणी आणि हुशार मुलगी नाही तर एक हळवी आणि भावनाशील मुलगी आहे. तसेच ती स्वप्नालीच्या कुटुंबालादेखील ओळखत होती. तेव्हा तिला हे माहित होत कि जर स्वप्नालीने पूर्ण विचार करून कोणताही निर्णय घेतला तर तिचे आईवडील हे नेहमी तिला सपोर्टच करत आले होते. आणि विकासच वय सोडलं तर त्याच्यात बोट ठेवायला कोणतीही जागा नव्हती. प्रश्न होता तो विकासाच्या कुटुंबाचा. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ऑफिसमध्ये कोणालाच काही माहिती नव्हती. आता स्वप्नालीच्या आयुष्यात निर्माण झालेला हा गुंता सोडवण्यासाठी आपल्यालाच तिची मदत करावी लागेल. मयुरीला इतका वेळ विचार करताना पाहून स्वप्नालीने तिला हलवत विचारले "मयुरी काय झालं काय विचार करतीयेस इतका? सांग ना मी आता काय करू?" तेव्हा मयुरी म्हणाली " हे बघ स्वप्नाली विकास सरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही हाच आत्ताचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला जर समजले तर आपण पुढचा विचार करू शकतो. आणि ऑफिसमध्ये ते कुणाशीच मोकळेपणाने बोलत नाहीत तेव्हा त्यांच्याबद्दल माहिती कशी काढायची ते कळत नाहीये."
मयूरीचं हे बोलणं ऐकताच स्वप्नाली एकदम निराश झाली. तेव्हा तिच्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत थोडा विचार करत मयुरी म्हणाली "एक मार्ग आहे. आपण HR डिपार्टमेंट मधून विकास सरांची माहिती काढू शकतो. जास्त काही नाही फक्त विकास सरांचं लग्न झाली का नाही इतकं कळालं तरी आपलं मोठं काम होऊन जाईल." तीच हे बोलणं ऐकताच स्वप्नाली म्हणाली "अगं पण त्यांची वैयक्तिक माहिती आपल्याला कोणी सांगणार नाही. किंवा जर कोणी सांगितलीच तरी ती कशासाठी हवी आहे विचारल्यावर आपण काय उत्तर देणार?" तेव्हा मयुरी हसत उठली आणि म्हणाली "वो काम तुम मुझपर छोड दो जानेमन. कोणालाही खरं न कळता विकास सरांची माहिती काढायचं काम माझ्याकडे लागलं. फक्त तू आतातरी थोडं हस आणि निवांत रहा. चल आता निघूया." एवढं बोलत त्या दोघी उठल्या आणि जागेवर येऊन बसल्या. पण स्वप्नालीच मन काही कामात लागत नव्हतं. मयुरी विकास सरांची माहिती काढेल का? आणि नक्की काय असेल? त्यांचं लग्न झालं असेल का नसेल? अशा एक ना अनेक विचारांचा तिच्या मनात हलकल्लोळ माजू लागला. हे सगळे विचार असह्य होऊन तीच डोकं जाम दुखायला लागलं. आणि तिने मॅनेजर कडे जाऊन घरी जाण्याची परवानगी घेतली आणि कुणालाच काही न बोलता ती घरी निघून गेली.

कसा वाटला आजचा भाग ते कमेंट करून नक्की सांगा. स्वप्नालीला वाटणारी भीती खरी ठरणार का?? मयुरी विकासाबद्दल माहिती मिळवू शकेल का?? जाणून घेण्यासाठी वाचत रहा कथामलिका. प्रीत उमलताना....
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा