मागच्या भागात आपण पाहिले स्वप्नाली विकासच्या लग्नाच्या विचाराने अस्वथ झाली आणि घरी निघून गेली.आता पुढे काय ??
स्वप्नालीला असं अचानक निघून गेलेलं पाहून विकासाला जरा विचित्र वाटलं होतं. पण आता तिच्याबद्दल कुणाला विचारायचं कसं? असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. त्यातच घरी जायला निघताना स्वप्नालीचा चेहरा एकदम उतरलेला होता. नक्की काय झालं असेल? स्वप्नालीला काही अडचण तर आली नसेल? किंवा तिची तब्बेत तर बरी असेल ना? असे एक ना अनेक विचारांचं काहूर विकासाच्या मनात उठू लागलं होत. ऑफिसमधल्या सगळ्या लोकांशी अलिप्तपणे वागण्याचा त्याला आज पहिल्यांदाच राग येऊ लागला होता. " खरंच फारच अलिप्त वागलो आपण सर्वांशी. अगदी मैत्री नाही पण थोडं नॉर्मल बोलणं जर काही लोकांशी ठेवलं असत तर स्वप्नालीबद्दल कोणाला तरी विचारता आलं असतं ." विकास स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता.
स्वप्नाली गेल्यापासून त्याच देखील कामात लक्ष लागत नव्हतं. मनात सतत स्वप्नालीबद्दलच विचार येत होते. विकासाला त्याचा ऑफिसचा पहिला दिवस आठवला मिटिंग संपताना आलेली स्वप्नाली त्याला आठवली. पांढऱ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती तिने. आणि केस मोकळे सोडले होते. एरवी कोण्या मुलीकडे न पाहणाऱ्या विकासच लक्ष उशिरा आलेल्या स्वप्नालीने वेधून घेतलं होत. आणि त्यानंतर जेव्हा त्याला समजलं होतं कि त्याची बसायची जागा स्वप्नालीच्या समोरच आहे तेव्हा का कोण जाणे त्याला छान वाटलं होतं. त्यानंतर रोजच विकास स्वप्नालीला तिच्या आणि इतर कोणाच्याही नकळत पाहत असे. तसं काही वेळा स्वप्नालीने त्याला तिच्याकडे पाहताना पकडलं होत. पण विकासाच्या पहिल्या दोन तीन दिवसांच्या वागण्याने चिडलेल्या स्वप्नालीने त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष केले होते. पण काल ती जेव्हा बसमध्ये भेटली तेव्हा मात्र त्याला राहावले गेले नव्हते. विकास तिच्याशी बोलायला गेला होता. पण तेव्हादेखील स्वप्नालीने त्याच्याशी विशेष बोलणं केलं नव्हतं.
"पण आज सकाळी मात्र स्वप्नाली स्वतः येऊन मला गुड मॉर्निंग म्हणाली. दिवसाच्या सुरुवातीलाच अगदी फ्रेश मूडमध्ये असलेली स्वप्नाली काय सुंदर दिसत होती. पिवळा रंग फारच खुलून दिसतो यार तिला." विकास अजुनपण स्वप्नालीच्याच विचारात होता. तेवढ्यात मयुरी कामातली एक अडचण घेऊन विकासाकडे आली आणि त्याच्या विचाराची तंद्री तुटली. विकासने मयुरीला कामात मदत केली. थँक यु बोलून मयुरी तिच्या जागेवर जाण्यासाठी वळली. तेव्हा विकासने त्याचा धीर एकवटून मयुरीला विचारले " मयुरी स्वप्नाली एकदम अचानक ऑफिसमधून गेली. काही प्रॉब्लेम तर नाही ना?" ते ऐकून मयुरी काहीशी चमकलीच. गेले तीन महिने कोणाशीही कामाव्यतिरिक्त न बोलणारा हा माणूस आज चक्क स्वप्नालीची चौकशी करतोय हे पाहून तिला आश्चर्य वाटले. " माहित नाही सर. मलापण काहीच न सांगता गेली ती. खरतर ती असं कधी वागत नाही. पण आज काय झालं काय माहित." मयुरी म्हणाली. तेव्हा विकास म्हणाला " it's ok, ती जाताना मी पाहिलं. तिचा चेहरा थोडा उतरला होता. म्हणून विचारला. nothing else." मयुरीने मान हलवली आणि ती तिच्या जागेवर जाऊन बसली.
विकासाच्या बोलण्याचं मयुरीला आश्चर्य वाटलं होत. पण स्वप्नाली आणि विकास यांना एकमेकांबद्दल काहीतरी फील होतंय हे मात्र तिला आता समजलं होतं. हा विचार मनात येताच तिला आठवलं स्वप्नालीला तिनं विकास सरांची माहिती मिळवीन असं promise केलं होतं. ते आठवताच मयुरी उठली आणि विकासाची माहिती विचारायला HR मध्ये काम करणारा तिचा मित्र नितीनला जाऊन भेटली. नितीन जवळ बसून मयुरी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागली. आणि बोलता बोलता तिने विकासाचा विषय काढला. तेव्हा नितीन तिला म्हणाला "अरे हा विकास फारच विचित्र आणि खडूस माणूस आहे. कंपनी जॉईन करण्याच्या आधी इतकं बेकार negotiation आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. तुम्ही लोक कसं सहन करत असाल त्याला तुम्हालाच माहित." तेव्हा मयुरी त्याला म्हणाली अरे आम्ही करतो त्याला सहन कसं तरी पण त्याची बायको त्याला कसं सहन करत असेल देवच जाणे." त्यावर नितीन म्हणाला " अरे बाबा, बहुतेक देवालापण माहित होतं या विचित्र आणि खडूस माणसासोबत कोणी सुखी होणार नाही. म्हणूनच त्याच लग्न झालं नाही." असं बोलून नितीन हसला. तेव्हा मयुरी त्याला म्हणाली तुला काय माहित रे त्याच लग्न झालं नाही." तेव्हा नितीन म्हणाला " अग मीच तर त्याच्या इन्शुरन्स संबंधी काम केलं ना. त्यामुळं माहिती आहे मला. " जी हवी ती माहिती मिळाली म्हणताच मयुरी उठत नितीनला म्हणाली " चल रे आजचा मजुरीचा टाइम संपला. जाऊ घरी आता."
मयुरी नितीन जवळून परत तिच्या जागेवर आली आणि लॅपटॉप बंद करून बॅग घेऊन ऑफिसमधून बाहेर पडू लागली. तेव्हाच विकासने तिला बाय गुड नाईट असे म्हटले. त्याच बोलणं ऐकून मात्र मयुरी एकदमच आश्यर्यचकित झाली. पण तिनेदेखील विकासाला बाय असा रिप्लाय दिला आणि ती ऑफिस मधून बाहेर पडली. आणि बाहेर पडता पडताच मयुरीने स्वप्नालीला मेसेज केला " MISSION VIKAS DONE”

विकासाची कौटुंबिक माहिती समजल्यावर काय असेल स्वप्नलीची प्रतिक्रिया?? आणि ती पुढे काय करेल? विकास कसा प्रतिसाद देईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचत रहा प्रीत उमलताना...
धन्यवाद.
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा