मागच्या भागात आपण पाहिले की स्वप्नाली लवकर घरी निघून गेल्यामुळे विकास काहीसा अस्वस्थ झाला. आणिंत्याने मयुरीकडे स्वप्नलीची चौकशी केली. आणि आता पुढे...
स्वप्नाली लवकर घरी आलेली पाहून स्वप्नालीची आई थोडी काळजीत पडली. तिने स्वप्नालीला लवकर घरी येण्याचे कारण विचारले. पण स्वप्नालीने डोकं दुखतंय असं सांगितलं आणि ती तिच्या खोलीत निघून गेली. ती दार लावून तिच्या बेडवर पडली होती. दुपारच्या शांत वातावरणात तिच्या मनातल्या विचारांनी वेग घेतला. तिच्या मनात पुन्हा विकासाबद्दल विचार चालू झाले. विकासाचा चेहरा समोर येताच तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. ती शांतपणे डोळे मिटून पडली होती आणि तिच्या डोळ्यासमोर विकास उभा होता. एक अनामिक हुरहूर तिच्या काजळात उठली होती. एक विचित्र पण गोड भावना मनाच्या एक कोपऱ्यात निर्माण झाली आणि हळू हळू त्या भावनेने तिचं मन व्यापून घेतलं होत. या अशा भावनेचा ती पहिल्यांदाच अनुभव घेत होती. तेव्हढ्यात तिच्या खोलीचं दार वाजल्याचा आवाज झाला आणि स्वप्नाली मनातल्या जगातून बाहेर पडली. काहीशा नाराजीनेच तिने दरवाजा उघडला. तर दारात तिची आई उभी होती. "काय होतंय का तुला स्वप्ना, किती हाका मारल्या मी तुला. मला वाटलं झोपलीस का काय? " स्वप्नालीची आई म्हणाली. ते ऐकताच स्वप्नाली म्हणाली " हो आई जरा डोळा लागला होता. त्यामुळं आता बर वाटतंय. " "बर चल मग मी मस्त चहा केलाय तू फ्रेश हो आणि चहा घ्यायला ये." असं बोलून तिची आई स्वयंपाकघरात निघून गेली. स्वप्नाली देखील फ्रेश होऊन बाहेर आली. आणि ती तिच्या आईसोबत चहा पीत बसली होती. एका हातात मोबाईल घेऊन तिने ऑफिसचा व्हाट्स ऍप ग्रुप उघडला आणि विकासाच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करत त्याचा फोटो न्याहाळू लागली. " अगं स्वप्ना, काय कुठं लक्ष आहे तुझं मी काय बोलतीये?" आईच्या या वाक्याने स्वप्नाली भानावर आली आणि हळूच हसत म्हणाली " अगं ऑफिसच्या ग्रुपवर काही मेसेज आले होते तेच वाचत होती. बोल ना काय झालं?" तेव्हा तिची आई म्हणाली “जाऊ दे बाई तुझ्यासोबत गप्पा मारत बसले तर स्वयंपाक कोण करणार? चल मी भात आणि भाजी करते नंतर तू तुझं भाकरी करायचं काम कर." असं बोलत आई उठून स्वयंपाकघरात गेली. आणि स्वप्नालीने पार्ट परत व्हाट्स ऍपवरचा विकासाचा फोटो न्याहाळायला सुरुवात केली. आणि तितक्यातच तिला मयुरीचा मेसेज दिसला MISSION VIKAS DONE ....
तो मेसेज पाहताच स्वप्नालीच्या चाऱ्यावर चेहऱ्यावर थोडी काळजी दिसू लागली. काय माहिती काढली असेल मयुरीने या विचाराने तिला थोडंसं टेन्शन आलं. ती पटकन उठून तिच्या खोलीत गेली आणि तिने मयुरीला फोन लावला. मयुरीने कॉल उचलताच स्वप्नाली म्हणाली " मयू काय कळलं तुला. पटकन सांग त्यांचं लग्न झालंय का? प्लिज अजिबात इकडचं तिकडचं न बोलता मला सांग यार. सकाळपासून या एकाच विचारानं डोक्यात नुसतं वादळ उठलय." स्वप्नालीची उत्सुकता बघून मयुरी हसूच लागली. तिच्या हसण्याचा आवाज ऐकून मात्र स्वप्नाली अजूनच चिडली आणि म्हणाली "तू हसत बसणार असशील तर मी फोन ठेवते. " ते ऐकून आपलं हसू दाबत मयुरी स्वप्नालीला अजून थोडं खेचण्यासाठी म्हणाली " ये प्यार हमे किस मोडपे ले आया ; के दिल करे हाये कोई ये बतायें क्या होगा...." आता मात्र स्वप्नालीच्या रंगाचा पारा अजून चढला. आणि तिने फोन कट केला. स्वप्नालीने फोन कट केल्याचे पाहून मयुरी मात्र अजूनच हसू लागली. आणि हसत हसत तिने स्वप्नालीला परत फोन लावला. तिचा फोन उचलताच मयुरी म्हणाली "अरे बास बास इतका राग बरा नाही." ते ऐकून स्वप्नाली म्हणाली "रागवू नको तर काय करू? तूला सगळं माहित आहे पण तरीदेखील तू माझी मजा घेत बसली आहेस. आता पटकन सांग तुला काय कळलं आहे ते." स्वप्नाली चिडली आहे हे कळून पण मयुरीची तिची फिरकी घ्यायची इच्छा कमी झाली नव्हती. ती म्हणाली " माझ्याकडे दोन न्यूज आहेत. पण आता फोनवर मी तुला एकच सांगणार. बघ तुला चालतंय का? उगाच माझ्यावर चिडचिड नाही करायची." ते ऐकून स्वप्नाली थोडी विचारात पडली आणि तिने विचारलं "दोन न्यूज कुठल्या?" तेव्हा मयुरी म्हणाली "एक आहे विकास सरांच्या लग्नाबद्दल; आणि दुसरी आहे तू ऑफिस मधून निघून गेल्यावर विकास सर माझ्याशी काय बोलले ती. सांग तुला कुठली न्यूज ऐकायची आहे?" मयूरीच हे बोलणं ऐकून स्वप्नाली एकदम काकुळतीला येऊन म्हणाली "मयू तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस ना ; मग प्लिज यार मला नको त्रास देऊस. प्लिज दोन्ही गोष्टी सांग ना यार." "नाही नाही मॅडम मी तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे म्हणूनच मला तुझी मजा घेण्याचा पण हक्क आहे. आणि त्यामुळेच मी आता तुला फक्त एकच न्यूज सांगणार. आणि दुसरी उद्या आपण भेटल्यावर. तेव्हा पटकन सांग काय ऐकायचं?" असं म्हणून मयुरी थांबली आणि क्षणात स्वप्नाली म्हणाली "ठीक आहे विकास सरांच्या लग्नाची काय माहिती मिळाली ते सांग." स्वप्नालीने एक मोठा पॉज घेतला आणि ती म्हणाली " विकास सरांचं लग्न झालेलं नाहीये. तेव्हा कदाचित तुझी लाईन क्लीअर असू शकते." मयूरीच हे वाक्य ऐकताच स्वप्नालीचा जीव एकदम भांड्यात पडला. आणि ती काहीशा लाडिक स्वरात मयुरीला म्हणाली " थँक्स यार मयू ; माझी सोनू प्लिज सांग ना सर काय बोलत होते माझ्याबद्दल नको ना छळूस." त्यावर मयुरी हसत हसत म्हणाली "नाही नाही नाही तुला त्यासाठी उद्याची वाट पाहावीच लागेल. चल मी आता घरी पोहचतच आहे. उद्या ऑफिसला भेटलो की सांगते तुला. बाय." असं म्हणत मयुरीने फोन ठेवला.
स्वप्नाली मात्र विकास सरांचं लग्न झालेलं नाही हे ऐकून एकदम खुश झाली. आणि विकास सर आपल्याबद्दल मयुरीकडे काय बोलले असतील याचा विचार जसा तिच्या मनात येऊ लागला. तसा तिचा चेहरा अजूनच खुलू लागला. कारण एरवी कुणाशीही कामापुरतेच संबंध ठेवणारा विकास आज स्वतःहून तिच्याबद्दल मयुरीकडे विचारपूस करत होता. म्हणजे त्यांनादेखील आपल्याबद्दल काहीतरी वाटत असू शकत. त्या विचारातच हसत हसत स्वप्नाली स्वयंपाक घराकडे वळली होती. पण तिच्या मनात मात्र कधी एकदा ऑफिसला जाऊन मयुरीला भेटते आणि विकास सर काय म्हणले ते जाणून घेते अशी उत्सुकता निर्माण झाली होती.
आता स्वप्नाली विकासला खुलवण्यासाठी काय करणार? विकासच्या मनात निर्माण झालेल्या भावना तो स्वप्नलीजवळ व्यक्त करेल का? जाणून घेण्यासाठी वाचत रहा प्रीत उमलताना....
तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा.
धन्यवाद

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा