मागच्या भागात आपण पाहिलं विकासच्या लग्नासंबंधीची माहिती स्वप्नालीला समजली. आणि तिच्या मनातल्या प्रेम भावनेची पण तिला जाणीव झालिये. आता वाचा पुढे.....
दुसऱ्या दिवशी स्वप्नाली लवकर उठली आणि तिचे सर्व आवरून ऑफिसला जायला तयार देखील झाली. नेहमी उशिरा उठून सकाळी सर्व काही गडबडीत आवरणारी स्वप्नाली आज चक्क वेळेआधी सगळं आवरून ऑफिसला जायला निघाली हे पाहून स्वप्नालीच्या आई आणि वडिलांना एकदम आश्चर्य वाटले. स्वप्नालीने आज छान गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. केस छान मोकळे सोडले होते. आणि तिच्या चेहऱ्यावर छानसं स्मितहास्य होते. हे सगळे पाहून स्वप्नालीचे बाबा म्हणाले "काय स्वप्ना आज दिवस कुठं उगवला म्हणायचा, तू चक्क घाईगडबड न करता तयार होऊन ऑफिसला चाललीसुद्धा. आणि ते पण इतकं छान नटून. काय आज काही विशेष आहे का ऑफिसमध्ये?" वडिलांचं ते बोलणं ऐकून स्वप्नाली एकदम गडबडली आणि म्हणाली " नाही काहीच नाही. तुम्हीच रोज बोलता ना माझ्या पोरीचे सगळे चांगले गुण आहेत फक्त सकाळी लवकर उठत नाही तेव्हा ठरवलं आज उठायचं लवकर. बर आता मी जाऊ का ?नाहीतर लवकर उठून पण ऑफिसला उशिराच जाईन मी." असं बोलतच स्वप्नाली घराच्या बाहेर पडली.
स्वप्नाली आज लवकर ऑफिसला पोहचली होती. फारच कमी लोक आलेले होते. स्वप्नाली तिच्या जागेवर जाऊन बसली. ती मयुरीची खूप उत्सुकतेने वाट पाहत होती. आणि तेवढ्यात तिला विक्स समोरून येताना दिसला. त्याने छानसा पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. तो त्याच्या जागेवर येईपर्यंत स्वप्नाली त्याला न्याहळत होती. ते पाहून विकास थोडासा बुजून गेला. त्याने स्वप्नालीकडे पाहत छानशी स्माईल केली आणि तिला गुड मॉर्निंग म्हटले. स्वप्नालीने त्याला छान हसून रिप्लाय दिला. विकास पुढे काही बोलणारच तितक्यात स्वप्नालीला मयुरी येताना दिसली. आणि स्वप्नाली एकदम मयुरी जवळ जात म्हणाली; "पटकन बॅग ठेव आणि कँटीनमध्ये ये." आणि मयुरीला काहीच बोलण्याची संधी न देता स्वप्नाली कँटीनकडे निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत विकास हलकंसं हसला आणि त्याने कामाला सुरुवात केली.
मयुरी कँटीनमध्ये येताच स्वप्नालीने तिला विचारले " मयू सांग ना विकास सर काय म्हणत होते?" तिचा उतावळेपणा पाहून मयुरी हसू लागली. तिचं हसणं बघून स्वप्नाली आणखीनच चिडली आणि तिने मयुरीच्या हातावर एक चापट मारली. तेव्हा मात्र मयुरीने तिला कालच विकाससोबतच सगळं बोलणं स्वप्नालीला सांगितलं. त्यांचं संभाषण ऐकताना स्वप्नालीच्या चेहऱ्यावर लाली पसरली. तिच्या चेहऱ्यावरची लाली पाहून मयुरी म्हणाली "अगं बाई चेहरा पहा मॅडमचा. आमच्या जीजूंचा विचार येताच कशी लाली चढली त्यांच्या गालावर" असे म्हणत मयुरीने स्वप्नालीचे गाल ओढले. तेव्हा स्वप्नाली एकदम कावरीबावरी होत म्हणाली "अगं जीजू काय? काहीही बोलतेस हा." "बर बाई राहिल तुला जर नसेल आवडत तर नाही म्हणणार मी जीजुंना जीजू." हसत हसत मयुरी म्हणाली. तेव्हा स्वप्नाली लाजत उठली आणि तिच्या जागेवर येऊन बसली.
स्वप्नाली जागेवर बसली आणि तिने समोर पहिले तर विकास त्याच्या कामात गढून गेला होता. स्वप्नालीने देखील कामाला सुरुवात केली. काही वेळाने स्वप्नालीला जाणवले कोणीतरी तिच्याजवळ उभे आहे. तिने बाजूला पाहताच तिला शेजारी उभा असलेला विकास दिसला. तिने त्याच्याकडे पाहताच विकास थोडासा हडबडला. पण क्षणात स्वतःला सावरत तो म्हणाली "स्वप्नाली आजची क्लायंट मीटिंग कॅन्सल झाली आहे. तेच तुला सांगावं म्हटलं. स्वप्नाली हसली आणि मिश्कीलपणे म्हणाली "हो सर, पाहिला मी तो मेल आताच." ते ऐकून विकास एकदम बावरला. आणि इकडे तिकडे बघू लागला. त्याची अवस्था पाहून स्वप्नालीला हसू आले. आणि तिने परत विलकसला विचारले "बोला ना सर काही बोलायचे आहे का अजून?" तिचं बोलणं ऐकून काही क्षण विकास बावरला आणि लगेच स्वतःला सावरलं. आणि तो म्हणाला " काही विशेष नाही काल तू एकदम अचानक निघून गेलीस ऑफिसमधून. आणि जाताना तुझा चेहरा उतरला होता. सो घरी सर्व ठीक ना?"
आतापर्यंत पाहिलेला बुजरा, अलिप्त आणि काहीसा एकलकोंडा विकास खरा कि आजचा अतिशय आत्मविश्वासाने आणि काळजीने बोलणारा विकास खरा? स्वप्नाली या विचारात असतानाच विकास पुन्हा म्हणाल " काय झालं स्वप्नाली? I Mean जर तुला नसेल सांगायचे तर it's ok." " नाही तस काही नाही सर. काल थोडं डोकं दुखत होतं म्हणून गेले लवकर घरी. " स्वप्नाली असं म्हणताच विकास म्हणाला " अच्छा मग ठीक आहे." एवढं बोलून तो त्याच्या जागेवर जाऊन बसला. विकास त्याच्या जागेवर बसताच स्वप्नालीने लॅपटॉपमध्ये डोकं घातलं. त्याचवेळी तिच्या डोक्यात विकासाचा विचार सुरु झाला. विकास आपल्याला वाटलं होता तसा विकास बुजरा, अलिप्त आणि एकलकोंडा नव्हता. तर तो caring आणि आत्मविश्वास असलेला होता. असा विचार मानत येताच ती खुद्कन हसली आणि तिने विकासकडे पाहिले तर विकास तिच्याकडेच पाहत होता. त्या दोघांची नजरानजर झाली आणि दोघांनीही ते जाणवताच इकडेतिकडे पाहिलं आणि परत कामात डोकं घातलं.
बघता बघता दुपार होऊन गेली. ऑफिसमधले बरेच लोक कँटीनमध्ये जाऊन चहा कॉफ़ी घेत होते. स्वप्नालीपण कँटीनमध्ये कॉफी घेण्यासाठी आली. तेव्हा तिने पहिले विकास त्याच्या नेहमीच्या जागी कॉफी घेऊन एकटाच बसला होता. स्वप्नालीने एक कॉफी घेतली आणि ती विकासाच्या जवळ गेली. आणि तिने विचारले " सर एकटेच बसलाय?" तेव्हा विकास हलकासा हसला. पण विकासाच्या त्या हसण्यात स्वप्नालीला परत एक उदासी दिसली. तीच उदास छटा त्याच्या हसण्यात तिला त्यादिवशी बसमध्ये दिसली होती. स्वप्नाली विकासला म्हणाली "सर मी बसू का इथे? " तेव्हा विकास म्हणाल " हो बस ना." स्वप्नाली त्याच्यासमोर बसली. विकासने स्वप्नालीकडे पाहत एक छान स्माईल केली. मघाशी त्याच्या हसण्यात असलेली उदासी एकदम गायब झाली होती. त्याउलट आताच त्याच हास्य एकदम रिलॅक्स आणि मनमोकळं होतं. ते हास्य पाहून स्वप्नालीने विकासाला विचारलं "सर एक विचारू?" तिच्या या प्रश्नावर विकासने मान हलवून होकार दिला. तेव्हा स्वप्नालीने कॉफीचा एक घोट घेतला आणि काहीसा विचार करत स्वप्नाली म्हणाली " सॉरी सर पण मला तुमचा स्वभाव एकदम गूढ वाटतो." स्वप्नाली असं बोलताच विकास हसू लागला. आणि त्याच हसणं थांबवत त्याने विचारलं "गूढ म्हणजे?" तेव्हा स्वप्नाली म्हणाली "गूढ म्हणजे सर कधी तुम्ही एकदम एकलकोंडे, अलिप्त आणि तुसडे वाटता. तर कधी एकदम मनमोकळे, दुसऱ्यांची काळजी असणारे, कॉन्फिडन्ट असता. नक्की कसे आहात तुम्ही? ते मात्र अजून नक्की समजलं नाही." ते ऐकून विकासाच्या चेहऱ्यावरचं मनमोहक हसू एकदम लोप पावलं.आणि ती एक गूढ उदासी त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आली आणि त्याने कॉफीचा शेवटचा घोट संपवला त्याची नजर खिडकीच्या बाहेर रोखली गेली आणि हळुवार आवाजात तो बोलू लागला " स्वप्नाली खरं सांगायचं तर आता जो तू अलिप्त, तुसडा विकास पाहतेस ना तो विकास आधी एकदम विरुद्ध होता. मनमोकळा दिलखुलास जगणारा,खूप मित्र मैत्रिणी असणारा असा होता काही वर्षांपूर्वीचा विकास. पण नंतर काही गोष्टी अशा घडल्या की सगळं बदललं आणि मला सगळ्यांपासून अलिप्त राहणं, स्वतःमध्ये आणि कामामध्ये रममाण होणं जास्त सोपं आणि चांगलं आहे असं वाटू लागलं." विकास शांत झाला. एक दीर्घ श्वास घेत तो हसला आणि म्हणाला " जाऊ दे; माझं रडगाणं मांडत बसलो तर आज इथंच मुक्काम करावा लागेल. चला सहा वाजलेत निघुयात." असे म्हणत तो उठला आणि कॅन्टीनच्या बाहेर पडला. विकासाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे स्वप्नाली पाहतच राहिली. विकास हळूहळू ओपन होतोय याचा स्वप्नालीला आनंद होत होता. पण तेव्हाच विकासाच्या आयुष्यात असं काय घडलं? की ज्यामुळे विकासचं आयुष्य एकदम बदलून गेले याची उत्सुकतापण स्वप्नालीच्या मनात उभी राहिली होती. मनातल्या या मिश्र भावनांना सोबत घेत स्वप्नाली देखील उठली तिच्या जागेवर येऊन लॅपटॉप बंद केला आणि घरी जाण्यासाठी निघाली.
सुरुवातीचा ताण संपून विकास आणि स्वप्नालीच नात आता खुलू लागलंय. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा प्रीत उमलताना....

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा