Login

प्रीत उमलताना..भाग १

पंचवीस वर्षांची स्वप्नाली आणि छत्तीस वर्षांचा विकास पहिल्यांदाच ऑफिसमध्ये भेटतात. आणि मग काय घडत वाचा या पहिल्या भागात.
काही तांत्रिक कारणांमुळे कथेचा पहिला भाग इरा अँप वर दिसत नव्हता. त्यामुळे परत पहिला भाग टाकत आहे.वाचकाना झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व.
"आई मी निघते ग, आज ऑफिसमध्ये लवकर पोहचलं पाहिजे.आणि नेमका आज उठायला उशीर झाला. तरी तुला रात्रीच सांगितलं होत लवकर उठवायला.” २५ वर्षाची स्वप्नाली घाईगडबडीत घराबाहेर पडताना तिच्या आईला म्हणाली. स्वप्नाली ही एका प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होती. अतिशय हुशार,बोलकी आणि दिसायला सुंदर असलेल्या स्वप्नालीवर पूर्वी तिच्या कॉलेजमध्ये आणि आता ऑफिसमध्ये बरेच तरुण फिदा होते. पण स्वप्नालीने मात्र कधीही कुणाला स्वतःच्या जास्त जवळ येऊ दिले नव्हते.
आज तिच्या ऑफिसमध्ये टीमची एकत्रित मीटिंग होती. आणि त्या मीटिंगसाठी ऑफिसमध्ये सगळ्यांना लवकर बोलावले होते. पण नेहमीप्रमाणे आज स्वप्नाली उशिरा उठली आणि तिला घरातून निघतानाच उशीर झाला होता. अगदी घाई गडबड करत ती ऑफिसला पोहचली तेव्हा मीटिंग संपत आली होती. ती मीटिंगरूममध्ये पोहचताच तिच्या मॅनेजरने अतिशय जळजळीत कटाक्ष स्वप्नालीकडे टाकला. आणि सगळ्यांकडे पाहत म्हणाला. “ बाकीचे विषय पूर्ण झालेत तर आता आपल्या टीममधील नवीन सदस्याची मला तुमच्या सगळ्यांशी ओळख करून द्यायची आहे”. आणि असे म्हणतच त्यांनी शेजारी बसलेल्या माणसाकडे हात करत म्हटले “ हे मिस्टर विकास आजपासून आपल्या टीममध्ये सिनियर इंजिनिअर म्हणून जॉईन होत आहेत. So let's welcome him with claps.” सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर विकास बोलू लागला. “ Good morning मी विकास शिंदे. याआधी मला १२ वर्षांचा experience आहे. मी मूळचा साताऱ्याचा आहे. माझे सगळे शिक्षण हे साताऱ्यात झाले आहे.या कंपनीत तुमच्या सगळ्यांसोबत काम करायला मला नक्की आवडेल ”. एवढं बोलून तो खाली बसला. आणि त्यांची मीटिंग संपली असे सांगून मॅनेजर त्याच्या केबिनमध्ये निघून गेला.
सर्वजण आपापल्या जागी येऊन बसले आणि कामाला सुरुवात केली. विकासची बसायची जागा ही स्वप्नालीच्याच समोर केली होती. त्या जागेवर बसून विकास त्याचे काम करू लागला होता. आणि इकडे स्वप्नाली तिच्या शेजारच्या मयुरीकडे खुर्ची नेत कुजबुजली, “अरे बारा वर्षांचा experience म्हणजे त्यांना आता विकास सर म्हणावं लागेल.” मयुरी त्यावर म्हणाली “ हो ना इतका experience म्हणजे age पण जास्तच असेल. काय यार आता त्यांच्या सोबत ही जागा शेअर करायची म्हणजे आता नुसत कामच करायला लागू नये म्हणजे झालं”. “ हो ना यार, चल थोड कामपण करते नाहीतर परत चार शब्द ऐकायला लागतील.” असं म्हणून स्वप्नाली वळली तर विकास तिच्याकडेच गंभीरपणे पाहत होता. तेव्हा स्वप्नालीने विकासकडे हसून पाहिलं तर विकासने सरळ त्याच्या लॅपटॉपमध्ये डोकं घातलं. ते पाहून स्वप्नालीनेदेखील खांदे उडवत कामाला सुरुवात केली.
काहीच वेळात लंच ब्रेक झाला तस सगळे उठून जेवायला जाऊ लागले तेव्हा मयुरीने स्वप्नालीला विकासकडे पाहत त्याला बोलवायचं का? अस खुणावल. पण सकाळचा विकासचा अलिप्तपणा पाहून स्वप्नाली सरळ कॅन्टीनकडे निघाली. तिच्या पाठोपाठ विकासदेखील कॅन्टीनमध्ये आला आणि एका कोपऱ्यातल्या टेबलावर त्याच ताट घेऊन एकटाच जेवू लागला. ते पाहून स्वप्नाली थोडा विचार करून उठली आणि विकासकडे जाऊन म्हणाली “ सर तुम्ही इथे एकटे बसण्यापेक्षा आमच्यासोबत बसा जेवायला.” ती अस बोलताच विकास म्हणाला, “ नाही नको thanks पण मी इथेच बरा आहे. You guys carry on.” इतकंच बोलून विकास खिडकीबाहेर बघत जेवण करू लागला. जणू आपल्या आजूबाजूला कोणी उभ आहे याचा आपल्याला काही फरक पडत नाही अस त्याच वागणं होत. ते पाहून हा माणूस असा का आहे? या विचारात स्वप्नाली जागेवर येऊन जेवू लागली. जेवण संपवून सगळे लोक परत आपापल्या कामाला लागले. ऑफिस सुटताना देखील स्वप्नाली समोर बसलेल्या विकासला इतरांना बोलते तशी बाय म्हणाली तेव्हादेखील विकासने तिच्याकडे न बघताच बाय असे उत्तर दिले. ते पाहून मयुरी स्वप्नालीला म्हणाली “ अरे काय खडूस माणूस आहे ग. तो बोलत नाही काहीच तर तू कशाला बोलतेस ?” स्वप्नाली खांदे उडवत मयुरीला बाय बोलून बाहेर पडली.
स्वप्नाली ऑफिसमधून बाहेर पडली तरी तिच्या डोक्यात मात्र विकासचा विचार सुरू होता. तिला आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी इतकं इग्नोर केलं होत.स्वप्नाली घरी पोहचली तरी तिच्या डोक्यातले विकासचे विचार काही कमी झाले नव्हते. कसेतरी जेवण करून ती तिच्या खोलीत झोपायला आली. खोलीत येताच स्वप्नालीने Facetime चे ॲप उघडले आणि तिथं विकास शिंदे अस नाव शोधल. बऱ्याच प्रोफाइल तिथं होत्या पण त्यात ऑफिसमधल्या विकासची प्रोफाइल काही सापडली नाही. आजकालच्या जगात Facetime वर प्रोफाइल नसलेला माणूस. मग तिने अजून बाकीच्या सोशल मीडिया ॲपवर विकासबाबत सर्च केलं. पण कुठेच त्याच्याबद्दल काहीच सापडलं नाही. आता मात्र स्वप्नालीला विकासबद्दल कुतूहल वाटू लागलं होत. हा माणूस असा अलिप्त आणि एकटा एकटा का रहात असेल असा प्रश्न तिच्या डोक्यात उभा राहिला.

🎭 Series Post

View all