सर्वात आधी नवीन भाग घेऊन येण्यास झालेल्या विलंबाबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तर मागच्या भागात आपण पाहिले होते की विकासने स्वप्नालीला त्याच्या भूतकाळात घडलेल्या घटना सविस्तर सांगितल्या होत्या. आणि त्या घटना सांगताना तो अतिशय भावनाप्रधान झाला होता आणि आता पुढे..
विकासच्या भावनांचा आवेग कमी होईपर्यंत तो तसाच स्वप्नालीच्या मिठीत होता. काही वेळाने विकास काहीसा भानावर आला. त्याने स्वतःला स्वप्नालीपासून दूर केले. स्वप्नालीने विकासाचा हात हातात घेतला आणि ती विकासच्या डोळ्यात पाहत म्हणाली " विकास मला खरच माफ करा. मला जर थोडीपण कल्पना असती कि या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इतका त्रास होईल तर मी तुमच्या भूतकाळात शिरायचा प्रयत्नच केला नसता." त्यावर विकास म्हणाला " खरं सांगायचं तर मीच तुझे आभार मानले पाहिजेत स्वप्नाली. विश्वासघाताची जखम मी मनात ठेऊन जगत होतो. मला वाटलं होतं काळच माझ्या या जखमेला भरून आणेल. पण मी हेच विसरलो होतो कि कोणतीही जखम बरी करायची असेल तर आधी त्यातली घाण बाहेर वाहून जावी लागते. आणि त्यानंतरच ती जखम भरायला सुरुवात होते. आणि खरच थँक्स स्वप्नाली आज तुझ्यामुळे माझ्या मनात साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडली. आता ही मानसिक जखम नक्की भरून येईल." हे ऐकून स्वप्नालीने समाधानाने विकासाच्या हातावर थोपटले. आणि ती म्हणाली " विकास मला निघायला हवे. बराच वेळ झाला. आपण भेटू उद्या ऑफिसमध्ये." असं बोलतच ती उठली आणि तिची पर्स घेऊन निघाली. विकासदेखील तिच्या मागोमाग तिला सोडण्यासाठी दरवाजाजवळ आला.
दरवाजा उघडता उघडता स्वप्नाली थांबली आणि ती एकदम वळली . विकासला ती अचानक का वळली ते समजलेच नाही. तेवढ्यात स्वप्नाली विकासच्या आईच्या बेडरूमकडे निघाली.. विकासही तिच्या मागोमाग बेडरूमकडे गेला. स्वप्नाली बेडजवळ गेली. आणि तिने विकासच्या आईचा हात अगदी प्रेमाने हातात घेतला. तो हात हळुवार थोपटत ती अतिशय प्रेमळ पण आश्वासक स्वरात म्हणाली " आई सगळ्या गोष्टी नीट होतील. याआधी जे झालं त्यात कोणाचीच काही चूक नव्हती. जर कोणाची चूक असेल तर ती होती फक्त नशिबाची. पण जर तुम्ही सर्व विसरून मनाला उभारी द्यायचा प्रयत्न केला तर विकासच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळेल." स्वप्नालीचे हे बोल एकूण विकासच्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे बदलले. आणि यांच्या डोळ्यातून अश्रुंचे काही थेंब गालावर ओघळले. स्वप्नाली हळूच उठली आणि तिची पर्स घेऊन घराबाहेर पडली.
दुसऱ्यादिवशी विकास काहीसा उशिराच ऑफिसला पोहचला. त्याने त्याची बॅग जागेवर ठेवत समोर पहिले. स्वप्नाली त्याच्याकडेच पाहत होती. त्याने स्वप्नालीकडे पाहत एक स्मितहास्य केले आणि तो त्याच्या कामाला लागला. विकासने काम सुरु केले असले तरी त्याच्या मनात कालचा प्रसंग उभा राहिला होता. काल स्वप्नालीच्या मिठीत त्याला जाणवलेली आपलेपणाची भावना, विश्वास त्याला अजूनही जाणवत होता. बऱ्याच वर्षांनी विकास कोणाच्यातरी इतका जवळ गेला होता. विश्वासघाताच्या खोलवर झालेल्या आघातानंतर त्याने त्याच्या मनाचे दरवाजे घट्ट बंद करून टाकले होते. कालची स्वप्नालीची मिठी मात्र त्याच्या मनाचा तो दरवाजा उघडून गेली होती. इतके वर्ष ज्या प्रेमासाठी आणि आधारासाठी आसुसलेलं विकासच मन आता स्वप्नालीकडे ओढ घेत होते. विकासच मन आता अशा भावनांच्या हिंदोळ्यावर हिंदकळत होते. पण याआधीचा विश्वासघात त्याला पाऊल पुढे टाकू देत नव्हता. स्वप्नालीच प्रेम आणि मधुराचा विश्वासघात यांचं द्वंद्व विकासाच्या मनात उभं राहील होत. विकासचं मन त्याला स्वप्नालीच्या प्रेमाच्या बाजूला खेचत होतं तर विकासचा मेंदू त्याला मधुराचा विश्वासघात दाखवून सावध करत होतं. अशा द्विधा मनस्थितीतच त्याने समोर पाहिले. स्वप्नाली तिच्या जागेवर नव्हती. तेव्हा तो उठला आणि मोकळ्या हवेत जाण्यासाठी ऑफिसच्या टेरेसवर आला.
टेरेसवर पोहचताच त्याला समोर स्वप्नाली उभी दिसली. विकास स्वप्नालीजवळ येऊन उभा राहिला. पण कसल्यातरी विचारात गुंतलेल्या स्वप्नालीला विकासच्या येण्याची चाहुलदेखील लागली नाही. काही क्षण तसेच गेल्यानंतर विकासने स्वप्नालीला हाक मारली. आणि त्या हाकेसरशी स्वप्नाली तिच्या विचारातून बाहेर आली. समोर विकास उभा असल्याचं पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यावर विकास म्हणाला " कसला एवढा विचार करत होतीस?" "तुमचाच विचार करत होते. खरं तर तुमचं सुरुवातीचं वागणं पाहून मला तुमचा फार राग आला होता. पण काल तुम्ही जे काही सांगितलं त्यानंतर मात्र जाणवलं तुम्ही कुठल्या परिस्तिथीतून जात असला. पण विकास आता तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या सोबत मीदेखील आहे." स्वप्नाली असे म्हणताच विकास हसला आणि तिला म्हणाला " स्वप्नाली मला नक्की माहित आहे तू माझ्यासोबत आहेस. पण एक गोष्ट सांगू का अगदी मनापासून. पण जर तू रागावणार किंवा गैरसमज करून घेणार नसशील तर?" " बोला ना विकास" स्वप्नाली म्हणाली. त्यावर विकास म्हणाला " मला कळतंय तुझ्या मनात माझ्याविषयी काय भावना आहेत. पण इतका त्रास आणि मनस्ताप सहन करून झाल्यावर माझं मन मात्र आता पुढे पाऊल टाकायला धजावत नाहीये. I HOPE तुला समजतंय मी काय बोलतोय ते?" हे ऐकताच विकासाच्या नजरेला नजर देत स्वप्नाली म्हणाली "विकास मला तुमची अवस्था समजतेय. तुम्ही तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. मी वाट पाहीन. "
स्वप्नाली आणि विकास असेच बोलत उभे होते तेव्हाच मयुरी टेरेसवर आली. आणि त्या दोघांना एकत्र पाहून जवळ जात म्हणाली "सॉरी सॉरी मला माहित आहे मी कबाब मध्ये हड्डी बनत आहे. पण काय आहे ना आता वाजलेत दुपारचे दीड . आणि मला लागलीये जोराची भूक तर मग आपण जेवल्यानंतर पुढच्या गप्पा मारुयात का?" मयुरीचे हे बोलणे ऐकून विकास आणि स्वप्नाली दोघेही हसले. आणि विकास म्हणाला "चालेल ना कारण तसही आम्ही तुला नाही म्हटलं तरी तू काय आम्हाला एकटं सोडणार नाहीस तेव्हा तू म्हणतेस तसं करणंच आमच्या भल्याच आहे." विकास असं म्हणताच ते तिघेही खळखळून हसले आणि जेवणासाठी कॅन्टीनमध्ये गेले.
असेच दोन-तीन महिने निघून गेले. विकास आणि स्वप्नाली यांच्यामध्ये मैत्रीचे नाते एकदम बहरले होते. ते दोघे ऑफिसमध्ये जेवायला कॉफी घ्यायला बऱ्याच वेळा एकत्रच जात असत. ऑफिस सुटल्यानंतरही विकास आणि स्वप्नाली बाहेर पार्कमध्ये बसून काहीवेळ गप्पा मारत आणि मगच घरी जात. एकमेकांना बराच वेळ देत असल्यामुळे आता विकास आणि स्वप्नालीला एकमेकांचे स्वभाव बऱ्यापैकी समजू लागले होते. दर एक-दोन दिवसांनी स्वप्नाली विकासच्या घरी जाऊन त्याच्या आईलाही भेटत असे. भेटून ती काहीवेळ त्याच्या आईशी ही बोलत असे. स्वप्नालीच्या प्रेमळ आणि निरागस बोलण्याने विकासाची आई देखील आता हळू हळू सावरू लागली होती. का कोण जाणे पण स्वप्नालीची भेट झाल्यापासून विकासच्या आईमध्ये चमत्कार व्हावा असा बदल दिसून येऊ लागला होता.
अशातच एकेदिवशी सकाळी विकास ऑफिसला गेला. पण दुपार होत आली तरी स्वप्नाली ऑफिसला आली नव्हती. तेव्हा मात्र विकासाच्या मनात बरेच विचार येऊ लागले. त्याच कामात लक्ष लागेना. जेवणाची वेळ होताच त्याने मयुरीला स्वप्नालीबद्दल विचारले. मात्र मयुरीला पण काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर मात्र विकासने कसातरी तो दिवस ढकलला. आणि तो घरी निघू गेला. घरी जाताच विकासने स्वप्नालीला मेसेज करून ऑफिसला का आली नव्हती ते विचारले. पण रात्र झाली तरी स्वप्नालीने तो मेसेज वाचला देखील नव्हता. दुसऱ्या दिवशी देखील स्वप्नाली ऑफिसला आली नव्हती. तेव्हा मात्र विकास काहीसा काळजीत पडला. आणि त्याने मयुरीला स्वप्नालीच्या ऑफिसला न येण्याचे कारण विचारले त्यावर मयुरी म्हणाली " सर मी काळ रात्री तिला फोन केला होता पण तिने माझा फोन घेतलाच नाही." त्यावर विकास म्हणाला "मयुरी काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला स्वप्नालीला?" हे सगळं बोलत असताना विकासाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता बघून मयुरी म्हणाली "सर तुम्ही चिंता करू नका. मी आज संध्याकाळी तिच्या घरी जाऊन बघते नक्की काय झालं आहे ते?" असं बोलून मयुरी तिच्या जागेवर जाऊन काम करू लागली. विकासने देखील काम करायचा प्रयत्न केला पण स्वप्नालीच्या काळजीने त्याचे मन आता पूर्ण अस्वस्थ झाले होते. शेवटी न राहवून विकासने स्वप्नालीला फोन लावला. बराच वेळ रिंग होऊन पण कोणीच फोन उचलला नाही. या गोष्टीमुळे आता विकासाच्या मनात शंकेच आणि भीतीच वादळ उठलं. त्याच्या मनात एकामागोमाग एक प्रश्न उभे राहिले. आणि त्यातला सगळ्यात प्रकर्षाने समोर येणारा आणि काळजी करायला लावणारा प्रश्न होता 'नक्की काय झालं असेल? का येत नसेल स्वप्नाली ऑफिसला?' आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विकासाला उद्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा