मागच्या भागात आपण पाहिलं विकासने आपल्या मनातल्या भावना स्वप्नालीजवळ व्यक्त करायच्या असा निर्णय घेतलाय. आता पुढे काय होणार चला जाणून घेऊ
जवळपास आठवड्याभराने स्वप्नालीने परत ऑफिसला यायला सुरुवात केली. त्या आठवड्याभरात विकास आणि स्वप्नाली मेसेजवर बराच वेळ बोलत असत. विकास आणि स्वप्नाली आता एकमेकांसोबत खूप कम्फरटेबल झाले होते. आता स्वप्नाली रोज ऑफिसला येऊ लागल्यामुळे विकास एकदम खुशीत होता. ऑफिसमध्ये काम करताना त्या दोघांची अनेकदा नजरानजर होत असे. प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर विकास स्वप्नालीमध्ये अधिकच गुंतत चालला होता. स्वप्नालीला पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. हळू हळू विकासाला जाणवले की तो स्वप्नालीशिवाय अपूर्ण आहे. पण अजूनही त्याला त्याच्या मनातल्या भावना स्वप्नालीकडे कशा व्यक्त कराव्यात हे समजत नव्हतं.
घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली आहे असं जेव्हापासून विकासाला कळलं होतं तेव्हापासून विकासला काहीशी धाकधूक वाटत होती. आपण स्वप्नालीला गमवणार तर नाही ना अशी त्याला सतत भीती वाटत राही. कधीकाळी सदैव मित्रांच्या गराड्यात राहणारा विकास मागच्या दहा वर्षात कोणाच्याच संपर्कात राहिला नव्हता. त्यामुळे त्याला त्याचं मन मोकळं करायला कोणीच नव्हते. या गोष्टीमुळे तो अजूनच अस्वस्थ होत असे. दिवसभर ऑफिसचे काम घरी आलं कि घरच काम यात त्याच्या जीव अगदीच आंबून गेला होता. त्याच्या या बिझी आयुष्यात स्वप्नालीशी होणार बोलणं हेच त्याच्या मनाला विरंगुळा देणारे क्षण होते. आपल्या मनात चाललेल्या या भावनांच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला कोणीतरी एक मित्र हवा होता जो त्याला त्याच्या भावना स्वप्नालीकडे व्यक्त करण्यासाठी मदत करू शकेल. असा विचार मनात येताच त्याच्या डोळ्यांसमोर एकच नाव आलं ते म्हणजे मयूरी. त्यांच्या इग्नोरन्स, भांडण ते भावनिक जवळीक या सर्व प्रवासाची एकमेव साक्षीदार होती मयुरी. आणि मयुरी हि स्वप्नालीच्या कॉलेजपासूनची मैत्रीण असल्यामुळे तिला स्वप्नालीच्या सर्व आवडी निवडी आणि तिचा स्वभाव या दोन्हींची माहिती होती. आता विचारांच्या या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मयुरीचं आपली मदत करू शकेल याची विकासला खात्री पटली.
एके दिवशी विकासने मयुरीला ऑफिस सुटल्यावर थोडा वेळ आपण भेटूया असे सांगितले. मयुरीने त्याला होकार दिला. आणि ऑफिस सुटल्यावर ते दोघे एका कॅफेमध्ये भेटले. कॉफीचे घोट घेत मयुरी म्हणाली " बोला ना सर, काय झालं आज अचानक स्वप्नालीला सोबत न बोलावता तुम्ही फक्त मला एकटीला इथे का बोलावले?" तिचं बोलणं ऐकताच विकासने एक पॉज घेतला आणि थोडा विचार करून तो म्हणाला " मयुरी तू जेव्हापासून मला स्वप्नालीच्या घरच्यांबद्दल सांगितलं आहेस तेव्हापासून माझ्या मनात बरेच विचार येत आहेत. आणि खरं सांगायचं तर आता मला स्वप्नालीला गमवायचा नाहीये. स्वप्नाली जेव्हा आजारी होती तेव्हा मला जाणवलं कि ती माझ्यासाठी किती महत्वाची आहे. पण खरं सांगू का मला ना अगदीच कन्फ्युज होतंय, माझ्या मनातल्या भावना तिला कशा सांगू? जेणेकरून तिला ते सगळं आवडेल. " विकासने एका दमात त्याचं हे सगळं बोलणं पूर्ण केलं. आणि त्याने मयुरीकडे पाहिलं. विकासच बोलणं पूर्ण होताच मयुरी एकदम हसू लागली. मयूरीच हसणं पाहून विकास अजूनच हवालदिल झाला. आपलं काही चुकलं आहे का काय असं त्याला वाटू लागलं. आणि त्या विचाराने त्याचा चेहरा आणखीनच उतरला. विकासाच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून मयुरीने तिचे हसू दाबलं . आणि चेहऱ्यावर गंभीर भाव आणत ती म्हणाली "मियाँ बीबी राजी आहेत. सध्यातरी कोणी काझी पण नाहीये. मग तुम्ही दोघे फक्त अतिविचार करून सगळ्या गोष्टी गरज नसताना अवघड करताय. आता मलाच तुमची लव्हगुरू बनावं लागेल असं दिसतंय." ती असं म्हणताच विकास हलका हसत म्हणाला "प्लिज गुरुवर्य तुम्हीच आम्हा पामरांना योग्य मार्ग दाखवावा."त्याच हे बोलणं ऐकून मयुरीने त्याला तिचा सर्व प्लॅन समजावून सांगितला. सर्व प्लॅन ऐकून विकास एकदम खुश झाला आणि त्याने मयुरीला त्या प्लॅन साठी होकार दिला.
दुसऱ्या दिवशी स्वप्नाली ऑफिसला आली तेव्हा तिने विकासाच्या जागेकडे पहिले तर विकास जागेवर नव्हता. स्वप्नाली तिच्या जागेवर बसून काम करू लागली. पण तिचं सर्व लक्ष मात्र विकासाच्या जागेकडे लागले होते. सकाळपासून विकासाला एकदाही न पाहिल्यामुळे तिला अजिबातच चांगले वाटत नव्हते. तिने विकासला फोन केला पण पूर्णवेळ मोबाईलची रिंग वाजत राहिली. पण विकासने फोन उचललाच नाही. शेवटी तिने विकासला मेसेज करून तिला फोन करण्यास सांगितले. आणि ती तिच्या कामाला लागली. थोड्या वेळाने तिच्या फोनची मेसेजची टोन वाजली. तिने फोन हातात घेतला तेव्हा विकासचा मेसेज होता "आता बोलू शकत नाही. too much busy." विकासच्या या मेसेजला पाहताच स्वप्नालीचा पारा आणखीच वर चढला. ती मयुरीकडे जात म्हणाली "चल माझं डोकं एकदम गरम झालंय. आता कॉफी पिल्याशिवाय मला शांत वाटणार नाही." ती मयुरीला घेऊन कँटीनला आली. आणि तिने मयुरीला सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यावर मयुरी म्हणाली "जाऊ दे ग त्यांना काही महत्वाचं काम असेल. करतील फ्री झाले कि कॉल. तू उगाच पॅनिक होतेस. एक आपण एक काम करू तुझा मूड चांगला करायला माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे. ऑफिस सुटलं कि आपण मस्त बाहेर जाऊ. आणि प्लिज माझी आई आता नाही म्हणू नकोस. तसही विकास सर आल्यापासून तुम्ही या गरीब मैत्रिणीला पूर्ण विसरून गेला आहात." मयूरीच हे बोलणं ऐकून स्वप्नाली नाईलाजाने हो बोलली.
संध्याकाळी ऑफिस सुटताच मयुरी आणि स्वप्नालीने कॅब बुक केली आणि त्या दोघी त्यांच्या आवडत्या हॉटेलला पोहचल्या. त्या तिथे पोहचताच वेटरने त्यांना एका कोपऱ्यातील टेबलजवळ नेले. तो टेबल अतिशय चांगल्या प्रकारे सजवला होता. स्वप्नाली मात्र एकदम गोंधळून गेली होती. तिने एकदा मयुरीकडे पाहिले. मयुरी तिला म्हणाली " अगं बस तरी. तुझा मूड चांगला करायचंय ना." स्वप्नाली आणि मयुरी त्या सजवलेल्या टेबलवर बसल्या आणि त्यांनी खाण्याची ऑर्डर केली. इतक्यात मयुरीला एक कॉल आला आणि ती उठून बाजूला गेली. स्वप्नालीने तिचा फोन हातात घेतला आणि व्हाट्स अँप वरचा विकासचा फोटो बघायला लागली. आणि तितक्यात तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला.
स्वप्नालीने मागे वळून पाहताच तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिथं विकास हातात एक छानसं गुलाबाचं फुल घेऊन उभा होता. स्वप्नालीला तिच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. विकास त्याच्या हातातलं गुलाबाचं फुल स्वप्नालीला देत म्हणाला " स्वप्नाली खरंतर मयुरीने मला बरीच रोमँटिक वाक्य दिली होती याप्रसंगी बोलण्यासाठी. पण मला जास्त काहीच बोलायचं नाहीये. मला तू खूप खूप खूपच जास्त आवडतेस. तुझा समजूतदारपणा, तुझा भावनाशील स्वभाव, तुझं हसणं, तुझं दिसणं तुझं सगळंच माझ्या मनाला अगदी भावतं. आता तुझ्यापासून दूर जाण्याचा विचार मला सहन होत नाही. तेव्हा तू मला इथून पुढच्या आयुष्यात तुझी साथ देशील का?" विकासच हे सगळं बोलणं ऐकतानाच स्वप्नालीचे डोळे आनंदाने भरून आले होते. तिने विकासच्या हातातले फुल घेतले आणि ते दोघे खुर्चीत बसले. त्याचवेळी मयुरी तिथे आली आणि म्हणाली "चला माझे काम झाले. मी निघते पण तुम्ही दोघे निवांत मनातलं बोला. नाहीतर आजपण उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसाल." मयुरी जायला वळताच स्वप्नालीने उठून मयुरीला मिठी मारली आणि म्हणाली "थँक्स मयू. I LOVE YOU..." त्यावर हसत हसत मयुरी म्हणाली "ए बाई हे वाक्य मला नाही या समोर बसलेल्या माणसाला सांग. मी निघते नाहीतर उगाच इथं लव्ह ट्रँगल व्हायचा."
मयुरी निघून जाताच विकास आणि स्वप्नाली समोरासमोर बसले. काहीवेळ असाच शांततेत गेला. स्वप्नालीला मान वर करून विकासाकडे पाहायचादेखील धीर होत नव्हता. थोड्यावेळाने विकासने विचारले "स्वप्नाली मी अजुनपण वाट पाहतोय तुझ्या उत्तराची. सांग ना देशील का मला साथ?" त्याचे हे बोलणे ऐकून स्वप्नालीने विकासाच्या डोळ्यात पाहिलं. तिला त्याच्या डोळ्यात तिच्या बद्दल असलेलं प्रेम स्पष्ट दिसत होतं. तिने पुन्हा एकदा खाली बघितलं आणि ती म्हणाली " विकास मला आता इथून पुढं फक्त तुमचाच हात धरून पुढचं संपूर्ण आयुष्य चालायचंय. माझ्या स्वप्नातलं प्रेम मला तुमच्या रूपाने मिळालं आहे ते प्रेम मला आता आयुष्यभर जपायचं आहे. " एवढं बोलून ती थांबली. आणि विकासने तिचा हात हातात घेतला.
त्यानंतर बराच वेळ ते दोघे तिथे त्यांच्या आयुष्याची सुखी स्वप्ने पाहत बसली होती. पण त्यांना हे कुठं माहित होतं की आयुष्य हे इतकं साधं सोपं आणि सरळ कधीच नसतं. वर्तमानकाळातली शांतता हि कधी कधी भविष्यकाळात येणाऱ्या मोठ्या वादळाची सुरुवात असते.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा