मागच्या भागात आपण पाहिले की विकास आता हळू हळू ओपन होत आहे. त्याने स्वतःहून स्वप्नालीसोबत बोलण सुरू केलंय. आता वाचा पुढे.
दरवाज्याच्या बेलने स्वप्नालीचे डोळे उघडले. तिने उठून दरवाजा उघडला तर दारात तिचे आई बाबा उभे होते. स्वप्नालीने घड्याळाकडे पाहिले तर संध्याकाळचे साडे पाच वाजले होते. "अरे बाप रे मी बराच वेळ झोपली होती." आई बाबांना पाणी देत स्वप्नाली म्हणाली. "हम्म मस्त मजा करून घ्या परत लग्नानंतर कामच काम आहे." स्वप्नालीचे बाबा स्वप्नालीला चिडवत म्हणाले. ते ऐकून स्वप्नाली म्हणाली "झालं का सुरु तुमचं परत. मला खर तर इतक्यात लग्नच करायच नाही. पण माझं कशाला कोण ऐकतंय ? " स्वप्नालीचे असे बोलणे ऐकताच स्वप्नालीची आई म्हणाली "आम्ही नसलं तुझं ऐकलं तरी बहुतेक देवानेच तुझं मन जाणलंय." "म्हणजे?असं काय झालं?" स्वप्नालीने थोड्याशा आश्चर्याने विचारले. त्यावर तिचे वडील म्हणाले " अगं कुलकर्णी काकांनी तुझ्या पत्रिकेत काही दोष आहेत त्यामुळे इतक्यात लग्न जमणं अवघड आहे. आणि त्यासाठी काही पूजा विधी करावे लागतील असपण ते म्हणत होते." वडिलांचे हे बोलणे ऐकताच स्वप्नालीचा चेहरा एकदम उजळला आणि अगदी खुशीत तिने आईला फर्मान सोडले " मातोश्री ती आणलेली भेळ काढा. आज हम बहोत खुश है" तिचे हे बोलणे ऐकून स्वप्नालीचे बाबा देखील हसू लागले.
पत्रिकेतील दोषामुळे आता आपल्या लग्नाचा विषय निदान पाच सहा महिने तरी मागे पडणार या भावनेने स्वप्नालीला सुखावल्या सारखं झालं होत. त्यामुळे आज स्वप्नाली काहीशी खुशीतच होती. त्या खुशीतच स्वप्नालीने आज सगळा स्वयंपाक केला आणि रात्रीचे जेवण करून ती तिच्या खोलीत आली. ब्लूटूथ स्पीकरवर छान रोमँटिक गाणी लावून तिने मोबाइल हाती घेतला आणि ती फेसटाईम अँप वर जाऊन तिचा आणि विकासाचा सकाळचा चॅट परत वाचू लागली. ती चॅट वाचताना तिला जाणवलं कि विकासाच्या मानत देखील आपल्याबद्दल भावना निर्माण झाल्या आहेत. पण त्याच्या भूतकाळात घडलेल्या घटनांनी त्याला अशी खोलवर जखम केली आहे की त्याचा मेंदू त्याच्या मनातल्या भावनांवर मात करून त्याला सगळ्यांपासून मागं खेचून एका सुरक्षित कोषाकडे ढकलू पाहतोय.
या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत तिने परत तो चॅट वाचायला सुरवात केली तेव्हा तिच्या लक्षात आले कि विकास आपल्याला भेटण्याबद्दल विचारत होता पण स्थळ, लग्न, पत्रिका या सगळ्या गोंधळात आपण भेटणं टाळून दिला होतं. पण आता काही हरकत नव्हती त्याला भेटायला. कदाचित आपण दोघेच निवांत कुठेतरी भेटलो तर विकासाच्या भूतकाळातल्या गोष्टींविषयी आपण त्याच्याशी बोलू शकू. आणि कदाचित त्या जखमांवर आपण फुंकर घालून विकासला पुन्हा नव्याने जगायला लावू शकू. या विचारात असतानाच तिला फेसटाईमवर विकासाचा मेसेज आला.
विकास - "हाय स्वप्नाली; जेवलास का? "
स्वप्नाली - "हो जेवलीं ना. तुम्ही जेवला का?"
विकास -" हो जेवण केलं आणि फेसटाईम अँप उघडलं तर नेमकी तू ऑनलाईन दिसलीस मग म्हटलं चला थोडं बोलूया आणि झोपू या."
स्वप्नाली - "इतक्या लवकर झोपता तुम्ही?"
विकास - " हो सकाळी लवकर उठाव लागतं. बरीच काम असतात ना ऑफिसला यायच्या आधी."
स्वप्नाली - "पण उद्या तर सुट्टी आहे."
विकास - " हा सुट्टीतर आहे. पण काय ना आता रोजची सवय झाली ना."
स्वप्नाली - "मग उद्या काय करताय तुम्ही?"
विकास - " काही विशेष नाही. का ग?"
स्वप्नाली - "आपण भेटू शकतो का मग उद्या?"
विकास - " हो भेटू शकतो ना. पण सकाळी तर तू म्हणत होती घरी काम आहे म्हणून."
स्वप्नाली - "हा, ते होय! ते कॅन्सल झालं म्हणून तर मग म्हटलं चला तुम्हाला भेटू आणि निवांत गप्पा मारू. माझ्याबद्दल तर तुम्हाला बरच माहिती आहे. पण तुमच्याबद्दल मला तेवढं काहीच माहिती नाही."
विकास - " माझ्याबद्दल काय माहिती पाहिजे तुला? "
स्वप्नाली -" तशीतर सगळंच जाणून घ्यायला आवडेल मला तुमच्याबद्दल. तुमच्या आवडीनिवडी सवयी. आणि..... "
विकास - "आणि काय ?"
स्वप्नाली - " आणि तुमचा भूतकाळ ज्यानं तुम्हाला असं अलिप्त आणि एकलकोंड बनवलं."
विकास- "खरं सांगायचं तर मला स्वतःलाच तुला माझ्याबद्दल सांगायचं आहे. आणि त्या सगळ्यामध्ये माझा भूतकाळ हा खूप महत्वाचा आहे. आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी माझं घर हीच सगळ्यात चांगली जागा आहे. जमेल तुला उद्या माझ्या घरी यायला?"
स्वप्नालीने काही वेळ विचार केला आणि ती म्हणाली " हो विकास येईन मी तुम्हाला भेटायला तुमच्या घरी. संध्याकाळी पाच वाजता भेटूया का?"
त्यावर विकासने तिला होकार दिला आणि तो स्वप्नालीला गुड नाईट बोलून झोपायला निघून गेला.
इकडे स्वप्नालीची झोप मात्र उडून गेली होती. तिच्या मनात विकास आणि त्याच्या भूतकाळाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. असं काय घडलं होतं विकासाच्या आयुष्यात? की ज्यामुळे त्याच्यात इतका बदल झाला आणि तो असा तुसडा एकलकोंडा माणूस बनून गेला. विकासने आपल्याला बाहेर कुठे भेटायला न बोलावता त्याच्या घरीच का बोलावले असेल? माझा भूतकाळ जाणून घेण्यासाठी घर हीच सगळ्यात चांगली जागा आहे असं तो का म्हणाला असेल? उद्या विकासाच्या घरी आपल्या समोर कोणतं रहस्य उलगडणार आहे? असे एक ना अनेक प्रश्न स्वप्नालीच्या भोवती पिंगा घालू लागले. या प्रश्नांच्या गदारोळात तिला कधी झोप लागली हे तीच तिलाच समजलं नाही..
कसा वाटला आजचा भाग ते कमेंट करुन सांगा. आता पुढे काय होणार? स्वप्नालीला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का? त्यांच्या नात्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार जाणून घेण्यासाठी वाचत रहा प्रीत उमलताना....

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा