Login

प्रीत उमलताना.... भाग ९

अखेरीस विकासने त्याच्या मनातल्या स्वप्नालीबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलंय.आणि त्यामुळे स्वप्नालीला एक सुखद धक्का बसला आहे. आता पुढे काय होणार?
मागच्या भागात आपण पाहिलं की स्वप्नाली साठी एक स्थळ सांगून आलं आहे. आणि आई वडिलांच्या इच्छेखातर स्वप्नलीदेखील मुलगी बघायचा कार्यक्रम करण्यास तयार झाली आहे. पण ती मनापासून नाराज आहे. आता पुढे .....
स्वप्नाली दुपारी जेवण करून तिच्या खोलीत आली . आज सुट्टी असल्यामुळे तिने बेडवर अंग टाकून दिले. काहीतरी टाईमपास करायचा म्हणून तिने फेसटाईमचे अँप उघडले. तिथे तिला बऱ्याच नोटिफिकेशन आल्या होत्या. स्वप्नाली एक एक करत नोटिफिकेशन बघत होती. जवळपास सगळ्या नोटिफिकेशन या तिच्या मित्र-मैत्रिणींनी केलेल्या पोस्टच्याच होत्या. काहीवेळ फेसटाईम अँपवर घालवल्यावर कंटाळून स्वप्नाली अँपवरून लॉगऑऊट करणार इतक्यात तिला एक नवीन नोटिफिकेशन आली. तिला फेसटाईमवर एक Friend Request आली होती. तिने परत अँप उघडले आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
ती नवीन Friend Request आली होती विकास शिंदे नावाच्या प्रोफाईलवरून. स्वप्नालीचा तिच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. पण तरीही तिने त्या प्रोफाईलवर जाऊन पहिले त्यावर विकासाचाच फोटो होता. तिने त्याच्या friend list ला जाऊन पहिले तर त्यात अवघे सात ते आठच friends होते. तिला वाटले कोणीतरी फेक प्रोफाइल बनवून तिची मस्करी करत असेल. पण आपल्या मनात विकासाबद्दल फिलिंग आहेत हे मयुरी सोडून बाकी कोणालाच माहित नाही. आणि मयुरी तर आपली असली मस्करी करणार नाही. म्हणजे ही खरच विकासाची प्रोफाइल आहे? Ohh my god करू का accept request? करूयाच कदाचित विकासला त्याचा अलिप्तपणा आणि एकलकोंडेपणा सोडून देऊन पुन्हा जुना हसमुख, मनमोकळा आणि आनंदी विकास परत आणायचा असेल तर. असे एक ना अनेक विचार तिच्या मनात पिंगा घालू लागले. आणि शेवटी तिने ती request accept केली. तिच्या हृदयात मात्र धडधड वाढली होती. स्वप्नाली विकासाच्या Friend List मधल्या लोकांच्या प्रोफाईलवर जाऊन ती लोक कोण आहेत ते पाहू लागली.
तितक्यात तिला एक मेसेज आला. तिने पटकन फेसटाईम मेसेंजरवर जाऊन मेसेज पाहिला. आजच्या दिवसातला दुसरा आश्चर्याचा धक्का तिला बसला. विकासने तिला hii.. असा मेसेज केला होता. त्याचा मेसेज बघून तिच्या हृदयातली धडधड खूप जोरात झाली. त्या मेसेजला काय रिप्लाय द्यावा हेच तिला सुचत नव्हते. असेच चार पाच मिनिटं गेली. आणि तिला विकासाचा मेसेज आला.
विकास- "are you there."
स्वप्नालीने थरथरत्या हाताने त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला.
स्वप्नाली- "Yes, बोला ना"
विकास - "काय झालं इतका वेळ रिप्लाय द्यायला. मला वाटलं तुला मी लगेच मेसेज केला ते आवडलं नाही."
स्वप्नाली- "नाही असं नाही पण तुमची प्रोफाइल नव्हती ना इथं."
विकास - " होती आधी पण नंतर मी डिलीट करून टाकली. कारण मला कोणाशीच संबंध नव्हता ठेवायचा."
स्वप्नाली- "मग आज अचानक कशी काय सुरु केली."
विकास - "काही विशेष कारण नाही पण आताशा परत जुना विकास बाहेर डोकावू पाहतोय."
स्वप्नाली- "अरे वा खरच छान वाटलं सर हे ऐकून"
विकास - "अरे सर म्हणायला आपण काय ऑफिस मध्ये आहोत का.? तू मला विकास म्हणू शकतेस."
स्वप्नाली - "चालेल. पण तुम्हाला एक विचारू का? जर तुम्हाला राग येणार नसेल तर."
विकास - "विचार ना, मला तुझा राग नाही येत."
विकासाचा असा मेसेज वाचून स्वप्नालीची कळी चांगलीच खुलली. आणि तिने विकासाला मेसेज केला.
स्वप्नाली - "सर असं काय झालं होत? की तुम्ही असे एका कोशात निघून गेलात. "
विकास - "स्वप्नाली आपण इतक्यात या विषयावर बोललं नाही तर चालेल का? माझ्या भूतकाळाच्या गोष्टी मला खूप त्रास देतात."
स्वप्नाली- "चालेल विकास जर तुम्ही कम्फरटेबल नसाल तर काही हरकत नाही. तुम्ही माझ्याशी मनमोकळे बोलताय. तुमचा भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करताय यातच मला आनंद आहे."
विकास - "हो नक्कीच मला माझा भूतकाळ विसरायचाय. आणि पुन्हा एक नवी सुरुवात करायची आहे. खरंतर मला बरेच दिवस हे सगळं तुझ्याशी बोलायचं होतं पण माझं धाडसच होत नव्हतं. म्हणून तर मी हि प्रोफाइल बनवली आणि तुला request पाठवली. "
स्वप्नाली - "काही हरकत नाही तुम्ही मोकळेपणाने बोललात मग ते इथे असो किंवा समोरासमोर माझ्यासाठी हेच खूप महत्वाचं आहे."
विकास - "ऐक ना स्वप्नाली; आपण भेटू शकतो का उद्या? ऑफिसमध्ये तो निवांतपणा मिळत नाही सतत कोणी ना कोणी आजूबाजूला असत. मग निवांत असं बोलणं होतच नाही. "
स्वप्नालीने विकासाचा मेसेज वाचला आणि ती विचारात पडली. जर पत्रिका जुळल्या तर बाबा म्हणतात तसं उद्या मुलगी बघायचा कार्यक्रम असेल मग भेटायला कसं जमणार? स्वप्नाली असा विचार करत असतानाच विकासाचा मेसेज आला
विकास - "काय झालं?"
स्वप्नाली - "काही नाही पण उद्या जमेल असं वाटत नाही. घरी काही काम आहेत?"
विकास - "it's ok; मी सहज विचारले. काही हरकत नाही ."
इतक्यात स्वप्नालीला तिच्या आईची हाक ऐकू आली. आईची हाक ऐकून स्वप्नालीने विकासाला एक काम आहे असं सांगितलं. आणि ती खोलीतून बाहेर आली. बाहेर हॉलमध्ये आई आणि बाबा तयार होऊन बसले होते. बाहेर येत स्वप्नालीने विचारले " हे काय जोडी आज एकदम तयार होऊन बसलीये. काय विशेष प्लॅन?" तिचं बोलणं ऐकून आई लटक्या रागात म्हणाली " आता या वयात कसला विशेष प्लॅन? आम्ही इथेच मार्केटमध्ये जात आहे. तुला काही आणायचं आहे का?" त्यावर स्वप्नाली म्हणाली " नाही काही आणायचं नाही. पण मार्केट बाहेरची भेळ नक्की घेऊन या. बरेच दिवस झालेत खाल्ली नाही." "चालेल पण आम्हाला वेळ लागेल परत यायला. येता येता आम्ही कुलकर्णी काकांकडे जाऊन तुमच्या पत्रिकेचं काय झालं ते पाहूनच येणार आहे." असं स्वप्नालीचे बाबा म्हणाले. पत्रिकेचा विषय निघताच स्वप्नालीचा मूड उतरला. पण चेहऱ्यावर काहीच न दाखवत तिने त्यांना चालेल असे म्हटले. आई बाबा निघून गेले पण स्वप्नालीचा मूड मात्र चांगलाच ऑफ झाला होता. त्यावर मग ती बेडरूम मध्ये जाऊन एक पुस्तक काढून वाचत पडली. पण उद्या मुलगी बघायचा कार्यक्रम होईल का? आणि झालाच तर काय होईल त्यानंतर? या विचारांनी तिच्या मनात थैमान घातलं होतं.आणि त्या विचारांच्या चक्रात तिला कधी गाढ झोप लागली हेच तिला समजलं नाही.
कसा वाटला आजचा भाग नक्की कमेंट करून सांगा. काय होणार मुलगी बघायच्या कार्यक्रमच? विकास त्याच्या भावना व्यक्त करायचा प्रयत्न तरी करतोय. जमेल का ते त्याला? काय असेल विकासचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी वाचत रहा प्रीत उमलताना.....
धन्यवाद.

🎭 Series Post

View all