प्रीतबंध. लिहिताना..
महाबळेश्वरचा तो भाग आठवतो? सत्याने ऑरग्नाईज केलेले कॅम्पफायर.. शेकोटी भोवती बसलेले मंजिरी, तिथी, रौनक, राशी आणि अभी आणि त्यांच्यासमोर रात्रीच्या वेळी डोळ्यावर गॉगल घालून गात असलेला सत्या..
"मैने छानी इश्क की गली
बस तेरी आहटे मिली
मैने चाहा चाहू ना तुझे
पर मेरी एक ना चली
इश्कमें निगाहो को मिलती हैं बारिशे
फिर भी क्यू कर रहा दिल तेरी ख्वाईशे
दिल मेरी ना सुने दिल की मै ना सुनू
दिल मेरी ना सुने दिल का मै क्या करू
दिल मेरी ना सुने.."
आठवलं तुम्हाला? जिनियस सिनेमातील हेच ते गाणं ज्यामुळे मला ही कथा सुचली.
रँडमली ऐकण्यात आलेले हे गाणं.. आणि ते मला इतकं आवडलं की मग रिपीट रिपीट कितीदातरी ऐकतच राहिले. त्या गाण्यातील शब्द, ‘दिल’ माझ्या दिलात अगदी घट्ट बसला आणि लागलीच काही पात्र मनात पिंगा घालू लागली. दिल म्हणजे हृदय! मग गोष्टही हृदयाचीच सुचली.
अभी आणि राशी.. दोन हृदयरोगतज्ञ! त्यांची ही प्रेमकथा आणि जोडीला असलेला सत्या ज्याने ‘दिल मेरी ना सुने’ म्हणत राशीला केव्हाच आपलं हृदय देऊन टाकले होते.
प्रेमाचा हा एक त्रिकोणच; पण टिपिकल त्रिकोण नव्हताच तो. इथला प्रत्येक कोन प्रेमाचा होता. मग तो अभी राशीचा असो, सत्या आणि अभीचा असो की राशी अन् सत्याचा! हा त्रिकोण खूप चांगला जुळून आला.
जवळपास साठ भागाची ही कथा लिहावी असे ठरले असताना ऐन्शीहून अधिक भाग लिहिल्या गेले त्याला कारण होत्या त्या तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया. खूप सुंदर सुंदर प्रतिक्रिया या कथेला मिळत गेल्या. अँपवर आणि त्या पेक्षा जास्त फबीवर.
या प्रतिक्रियांनी मी खरंच भारावून गेलेय. व्यस्त असल्यामुळे प्रत्येकवेळी तुमचे आभार मानायला मला जमले नाही, पण आता इथे माझ्या संपूर्ण वाचकांचे मी मनापासून आभार मानते. थँक यू, थँक यू सो मच! तुमच्यामुळेच प्रीतबंधचा वाचकवर्ग साडेतीन लाखाजवळ पोहचला. माझ्या आजवरच्या सर्व कथेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेली ही कथा! त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप आभार.
‘प्रीतबंध’ ही या वर्षातील माझी ही शेवटची कथामालिका!
कथा पुढे जाताना अनेक पात्र कथेत आली डॉक्टर सीमा, डॉक्टर रुपाली आणि सगळ्यात शेवटी पुन्हा नव्याने भेटलेली मंजिरी. सगळ्या प्लॅनची मास्टर माईंड आणि आपल्या आशिषची हाय कमांड! त्यांच्याबद्दल लिहायचे तर कथेचे आणखी भाग वाढले असते म्हणून मग कथा तिथेच आटोपती घेतली.
मात्र कथा संपत असताना अगदी शेवटच्या क्षणी पुन्हा प्रेमाचा एक त्रिकोण तयार झाला. जुन्या प्रीतबंधाचा एक नवा डाव.. डॉक्टर सिन्हा, डॉक्टर रुपाली आणि डॉक्टर सैनानी! तुम्हाला यांची कथा वाचायला आवडेल का? ते सांगा. जर आवडेल तर नव्या वर्षात दुसऱ्या पर्वाच्या रूपात त्यांना तुमच्यासमोर सादर करायला नक्की आवडेल. पण ते इतक्यात होणार नाही.
सध्या तरी इतकेच! हे पर्व तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. कारण एका लेखकाला त्याच्या वाचकांच्या प्रतिक्रिया किती मोलाच्या असतात हे त्यालाच माहीत असते.
परत एकदा खूप खूप धन्यवाद!
परत एकदा खूप खूप धन्यवाद!
नाताळ आणि नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!
स्वस्थ रहा आणि वाचत रहा!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
स्वस्थ रहा आणि वाचत रहा!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा