डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
प्रिया आज माझी (भाग ४)
"वाइफ नाही... एक्स वाइफ.... शी इज नो मोर वाइफ ऑफ शेखर... हो ना शेखर?"
मिहिकाने लाडीकपणे त्याला विचारले .पण त्याचा चेहरा निर्विकार होता ...तो कसल्यातरी विचारत होता ....आजपर्यंत तिला इतके इग्नोर कुणीच केले नव्हते. ...ती गोंधळली...राहुलच्याही ते लक्षात आले. वातावरणातील अवघडलेपण टाळण्यासाठी ते पुढे म्हणाला,
मिहिकाने लाडीकपणे त्याला विचारले .पण त्याचा चेहरा निर्विकार होता ...तो कसल्यातरी विचारत होता ....आजपर्यंत तिला इतके इग्नोर कुणीच केले नव्हते. ...ती गोंधळली...राहुलच्याही ते लक्षात आले. वातावरणातील अवघडलेपण टाळण्यासाठी ते पुढे म्हणाला,
"मिहिका...तुझ्या बर्थडे पार्टीला तू मलाही इन्व्हाइट केले होतेस पण त्यावेळेस मी कॉन्फरन्स साठी जपानला गेलो होतो. पण माझ्या माहितीप्रमाणे शेखर आपल्या मिसेस ला घेऊन आला होता....म्हणजे सुदर्शन, मोहित यांनी मला सांगितले....म्हणजे त्यावेळेस तू त्याच्या वाइफला पाहिले असशील ना...."
"हो...पाहिले ...आणि नाही सुद्धा...अरे त्यावेळेस माझ्या डॅडीच्या पॉलिटिकल पार्टीतले गेस्ट आले होते. शेखरने त्याच्या एक्स वाईफशी (आत्ताही तिने एक्स या शब्दावर जोर दिला) इंट्रो करून दिले पण तिचा चेहरा इतका ऑर्डिनरी आहे की लक्षातच राहिला नाही....आणि त्या दिवशी शेखर तिला घेऊन लगेचच निघून गेला.
आय नो द रिजन.. तिच्या बरोबर त्याला अन्कमफर्टेबल वाटत होते....(तिने शेखरकडे पाहिले...पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते जणू त्याला कसल्यातरी गोष्टीची आठवण आली होती.) त्यामुळे माझ्या बर्थडेच्या फोटोग्राफ्समध्ये किंवा व्हिडिओ शूटिंगमध्ये ती दिसली नाही. हा कुठे कुठे व्हिडिओ शूटिंगमध्ये दिसली ती ही पाठमोरी. तसे म्हटले तर ती मघाशी जी पाण्यात भिजली त्या ऑर्डिनरी मुलीसारखीच आहे दिसायला. "
मागून येणाऱ्या रागिणीने हे ऐकले व ती चिडलीच.
तिचे हावभाव पाहून राहुल लगेचच म्हणाला,
तिचे हावभाव पाहून राहुल लगेचच म्हणाला,
"रागिणी... ये मी ओळख करून देतो..."
शेखर भानावर आला होता.
"शेखर मिहिका... मीट माय स्वीटहार्ट... माय लाइफ.... रागिणी..."
"रागिणी हे माझे कॉलेज फ्रेंड्स.... धिस इज शेखर परांजपे अँड शी इज मिहिका कुलकर्णी. रागिणी. मी तुला हे येणार आहेत असे सकाळी बोललो होतो ना. "
रागिणीने त्याच्याकडे सूचकपणे पाहिले आणि मग त्या दोघांकडे पाहून ती मनात नसतानाही हसली कारण ते तिच्या घरी आले होते....आणि घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करणे तिच्या तत्त्वात बसत नव्हते.
"हॅलो... ग्लॅड टू मीट यू.(तुम्हाला भेटून खूप आनंद झाला.)"
"वी टू(आम्हाला सुद्धा)"शेखर आणि मिहिका एकदमच म्हणाले.
त्यांचे जुळलेले सूर पाहून रागिणीच्या कपाळावर आठ्या चढल्या.
त्यांचे जुळलेले सूर पाहून रागिणीच्या कपाळावर आठ्या चढल्या.
"रागिणी...प्रिया कशी आहे?" राहुलने विचारले.
ती काय बोलत आहे हे ऐकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या शेखरने रागिणीकडे चमकून पाहिले तस तिने त्याच्याकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला आणि पुन्हा राहुलकडे पाहून ती म्हणाली,
"ठीक आहे....i"
राहुलने तिला त्याच्या बाजूला बसण्यासाठी खुणावले तसे अनिश्चेने ती त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसली.
"तुमच्या मैत्रिणीला मी भिजवले ....त्याबद्दल आय एम सो सॉरी. "
"आणि तिचे मन दुखावले , तिला हर्ट केले त्याचे काय .... सॉरीने हे सर्व भरून निघणार आहे का?" रागिणी मनात म्हणाली.
"रागिणी शेखर तुला सॉरी म्हणाला. "
"... इट्स ओके. "
"रागिणी प्रियाला इथे बाहेर बोलाव ना...मी शेखर आणि मिहिकाशी तिची ओळख करून देतो. "
यावर ती काही बोलणारच होती इतक्यात त्याने प्रियाला बाहेर येताना पाहिले.
"प्रिया , ये ना. "
"मघाशी माझा फोन इथे कुठेतरी पडला. "
"माझ्याकडे आहे . "
"शेखरने हात उंचावत तिचा फोन दाखवला.
त्याच्याकडून फोन घेण्यासाठी रागिणी पुढे सरसावली.
"अं ह वहिनी...जिचा फोन आहे तिलाच यावे लागेल. "
रागिणीने प्रियाकडे पाहिले आणि तिला नजरेनेच धीर दिला. थोडी हिंमत करून ती शेखरसमोर येऊन उभी राहिली आणि त्याची नजर टाळून फोन घ्यायसाठी तिने हात पुढे केला.
शेखर तिच्याकडे एकटक पाहत होता पण ती नजर टाळत होती. बाजूला बसलेल्या मिहिकाच्या ही गोष्ट लक्षात आली.
"शेखर, एकदाचा तिचा फोन देऊन टाक...."
ती पुटपुटली.
ती पुटपुटली.
"आय ॲम सॉरी. "
तिचा हात हातात घेऊन त्यावर फोन ठेवत तो सूचकपणे म्हणाला...त्याच्या स्पर्शाने ती मोहरुन गेली आणि तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आले.
तिचा हात हातात घेऊन त्यावर फोन ठेवत तो सूचकपणे म्हणाला...त्याच्या स्पर्शाने ती मोहरुन गेली आणि तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आले.
"सॉरी फॉर एव्हरिथिंग. "
तो पुन्हा गंभीर आवाजात म्हणाला.
तो पुन्हा गंभीर आवाजात म्हणाला.
तिने क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तडक ती तिथून निघून गेली. मोठ्या कसोशीने तिने आपल्या अश्रूंना आवर घातला होता....त्याच्याकडे पाठ करताच ते डोळ्यांतून घळघळ वाहू लागले.
"मी जरा येते..."
तिच्यामागोमाग रागिणीही तिथून निघून गेली.
"हिला काय झाले?....या प्रिया नावाच्या सर्वच मुली फुल असतात का? "
"शट अप मिहिका..."
शेखर ओरडला तशी मिहिका दचकली. ती काही बोलणार त्या आधीच शेखर बंगल्याबाहेर निघून गेला.
शेखर ओरडला तशी मिहिका दचकली. ती काही बोलणार त्या आधीच शेखर बंगल्याबाहेर निघून गेला.
गेटच्या बाहेर आल्यावर त्याने आपल्या खिशातील सिगारेटचे पाकिट काढून त्यातील सिगारेट शिलगावली.
सहा महिन्यांपूर्वी .........
*****
क्रमशः
शेखर आणि प्रियाचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे तर वाचत रहा....
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा