Login

प्रिया आज माझी.... भाग २

शेखर आणि प्रियाची हळुवार फुलणारी प्रेमकहाणी


डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


प्रिया आज माझी (भाग २)

भिजल्यामुळे तिचा चेहरा ओला झाला होता त्यामुळे तिच्या डोळ्यांतून ओघळलेले अश्रू लपवण्यात ती यशस्वी झाली पण तिच्या डोळ्यांत आलेला लालसर रंग सांगत होता की ती रडत आहे आणि आता पर्यंत तो तिला इतपत नक्कीच ओळखत होता. तिच्या हातातल्या शॉपिंग बॅग कधीच गळून पडल्या होत्या. तिची अवस्था ओळखून तो तिच्याजवळ गेला पण त्याला पाहून ती दोन पाऊले मागे फिरली आणि तिचा तोल जाऊन ती पडणार इतक्यात त्याने अलगद तिला आपल्या हातांवर झेलले.

त्याला इतके जवळ पाहून ती निशब्द झाली होती. त्याने तिला आपल्या हातात उचलून घेतले. ती ही त्याच्या डोळ्यांत हरवून गेली होती. पण काहीसे पुढे आल्यावर तिने मिहिकाला पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

"मला खाली सोडा...मी ठीक आहे. "

"तू पूर्ण भिजली आहेस.... तू नीट चालू शकणार नाहीस. "

तिच्याकडे दुर्लक्ष करीत तो म्हणाला आणि तसंच पुढे चालत राहिला.

राहुल आणि मिहिका त्या दोघांकडे आश्चर्याने पाहत होते. मिहिकाच्या कपाळावर आठ्या आल्या.

"व्हू इज शी?"

"रागिणीची (राहुलची पत्नी) मैत्रीण आहे. "

"हिला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतेय. "

"असेल कारण या आधी ती मुंबईलाच होती. "

"मे बी....अशा ऑर्डिनरी फेसच्या कितीतरी मुली असतात.... पण या शेखरला समजत नाही...तिची तो हेल्प करीत होता तिथपर्यंत ठीक आहे पण असे उचलून कशाला घ्यायचे. या मिडल क्लास मुली लगेच गैरसमज करून घेतात. आताच कुठे एकीपासून त्याचा पिच्छा सुटलाय. "

"अगं ए माझ्या आई....तिच्याबद्दल काही बोलू नकोस...कुठल्याही क्षणी रागिणी येईल. तिने जर तिच्या मैत्रिणीबाबत वेडेवाकडे ऐकले ना तर तुला काय मलाही घराबाहेर काढेल...तिची बेस्ट फ्रेंड आहे ती... अँड शी इज अ रिअली नाइस गर्ल."

इकडे शेखर तिला घेऊन आत बंगल्यात आला . ती त्याच्या हातातून खाली सुटायचा पूर्ण प्रयत्न करीत होती पण तो तिला काही केल्या दाद देत नव्हता.

सकाळी तो आणि मिहिका इथे राहुलच्या बंगल्यात आले तेंव्हा रागिणी व तिची मैत्रीण बाहेर गेल्या आहेत असे राहुलने त्यांना सांगितले होते . संपूर्ण बंगला दाखवला तेंव्हा त्याने रागिणीची मैत्रीण कुठे थांबलेय तो रूमही त्याला दाखवला होता त्यामुळे शेखर न थांबता प्रियाला घेऊन तिच्या रुममध्ये आला. त्याने आत आल्यावर दार आतून लावून घेतले आणि प्रियाला जमिनीवर सोडले. त्याच्या अशा वागण्याने ती चिडली.

"शेखर....हे दार कशाला लावलेत....उघडा ते...हे असे करणे तुम्हाला शोभते का"
ती पुढे काही बोलणार त्या आधी त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला आपल्याजवळ ओढून घेतले.

तिच्याशी बोलण्यासाठी तो अधीर होता.

"कुणाला काहीही न सांगता तू निघून आलीस ...हे तुला शोभते का?"

त्याच्या डोळ्यांत उत्कटता पाहून ती हरखून गेली पण दुसऱ्याच क्षणी तिने बाहेर मिहिकाला पाहिले ते तिला आठवले.

त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून तिने दरवाजा उघडला आणि त्याच्याकडे सूचकपणे पाहिले तसा क्षणभर तो तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या नजरेत बरेच प्रश्न होते....तो काही बोलणार इतक्यात त्याला बाहेर कुणीतरी बोलत असल्याची चाहूल लागली तसा तो तडकाफडकी बाहेर निघून आला. तिच्या रूममधून त्याला असे बाहेर येताना पाहून रागिणी संभ्रमात पडली.

********************

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.