डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
प्रिया आज माझी (भाग ३)
रागिणी प्रियाच्या रुममध्ये आली. तिला पाहताच प्रियाच्या भावनांचा बांध तुटला आणि तिला मिठी मारून ती रडू लागली.
"प्रिया, राहुलचा मित्र शेखर म्हणजे तुझा शेखर हे मला जर माहीत असते ना तर मी त्याला इथे येण्यास मनाई केली असती. खरेतर मीच वेडी आहे. राहुलने जेव्हा त्याचा मित्र शेखर येत आहे असे जेव्हा सांगितले तेव्हा मी त्याचे पूर्ण नाव विचारायला हवे होते. बहुतेक राहुलला देखील ही गोष्ट माहित नसावी."
"मोठ्या मुश्किलीने मी स्वतःला सावरले आहे....आता पुन्हा नव्याने या गोष्टींचा सामना मी नाही करू शकत. "
दाटलेल्या आवाजाने प्रिया म्हणाली.
दाटलेल्या आवाजाने प्रिया म्हणाली.
"तेंव्हा तू एकटी होतीस. आता मी तुझ्या बरोबर आहे. आता डोळे पुस पाहू. "
प्रियाचा हुंदका ओसरला. तिने स्वतःला सावरले.
"तू भिजली आहेस....आजारी पडशील.. पटकन चेंज कर ...मघाशी मी आले तेंव्हा मला राहुलने सांगितले की त्याच्या मित्रामुळे तू भिजलीस...आत आल्यावर समजले की त्याचा मित्र म्हणजे तुझा शेखर आहे. "
"रागिणी आता तो माझा नाही ..बाहेर मिहिकाला पाहिले असशील ना?"
"म्हणजे बाहेर जी होती ती मिहिका आहे का?"
प्रियाने होकारार्थी मान हलविली.
"डिस्गस्टींग.... मी आताच राहुलला सांगते की ती दोघं इथे असेपर्यंत मी या घरात थांबणार नाही. "
रागिणी चिडली होती.
रागिणी चिडली होती.
"नको रागिणी....शेखरचा अपमान होईल असे काहीही करू नकोस...त्यापेक्षा मीच इथून निघून जाते. "
"तुझ्याबरोबर इतके काही झाले तरी तू त्याचाच विचार करतेस...."
"त्यांच्याशिवाय या जगात माझे आहे तरी कोण?त्यांचे माहित नाही...पण मी त्यांच्यावर खरे प्रेम केले आहे आणि सात जन्मापर्यंत त्यांच्यावरच करणार. "
"त्याने मुव्ह ऑन केले आहे आणि तू अजून त्याच्यातच अडकली आहेस. प्रिया अगं कुठल्या जमान्यात वावरतेस...आजकाल एका रिलेशनशिप मधून बाहेर पडल्यावर लगेचच दुसरे करतात.....आणि तू साता जन्माच्या गोष्टी करतेस. "
प्रियाला शिंक आली.
"प्रिया...तू पहिला चेंज कर.... मग आपण बोलू. "
रागिणी बाहेर आली.
रागिणी बाहेर आली.
इकडे बाहेर...
"शेखर, अरे तिचे नाव प्रिय आहे .....तुला काय ती तुझी बायको प्रिया वाटली का... म्हणून रागाने तिला भिजवलेस....आणि इथपर्यंत ठीक होते...वर तिला उचलूनही आत घेऊन गेलास...तुम्हां दोघांना कुणी असे पाहिले असते तर कोणालाही वाटले असते की तुम्ही नवराबायको आहात.... रागिणीने पाहिले नाही म्हणून बरे नाहीतर काही खरे नव्हते...तिची मैत्रीण म्हणजे तिचा जीव की प्राण आहे. "
मिहिका कसला तरी विचार करत होती.
"शेखर...ही तुझी एक्स वाइफ प्रिया आहे का?"
"शक्यच नाही....या प्रियाचे लग्न झाले नाही...तिचे नाव प्रिय करंदीकर आहे. तिचे डॉक्युमेंट पाहिलेत मी...आणि मिहिका तू असे का विचारत आहेस...तू शेखरच्या वाईफला पाहिले नाहीस का?"
******************
******************
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
