डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
प्रिया आज माझी (भाग ७)
"काय म्हणत होता शेखर?"सुधामावशीने विचारले.
"त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे...बाहेर भेटायला ये असे म्हणत होते. "
तिच्या सुरात नाराजी होती.
तिच्या सुरात नाराजी होती.
"अगं, लग्नाविषयी किंवा साखरपुड्याविषयी काहीतरी बोलायचे असेल. आजकाल मुलगा मुलगी मिळूनच ठरवितात. लग्नाचा बस्ता घ्यायलाही आता पूर्वीसारखे वऱ्हाड जात नाही. लग्न कसे करायचे ? कुठे करायचे त्या संदर्भात काहीतरी बोलायचे असेल. "
प्रियाने एक सुस्कारा टाकला. मावशी म्हणत होती ते तिला पटले होते पण तरीही का कुणास ठाऊक एक अनाहुत भीती मनात दाटून आली होती.
"झाले बोलणे?...काय म्हणत होते जावईबापू?"बेडरूममध्ये शिरत मामी उपरोधिक सुरात म्हणाली.
"शेखरने तिला भेटायला बोलावले आहे. "
सुधामावशी म्हणाली.
सुधामावशी म्हणाली.
"अजून साखरपुडा झालेला नाही. त्या आधी कशाला भेटायला हवे. उगाच वागण्या बोलण्यात कुठे कमीजास्त झाले तर ठरलेले लग्न मोडायचे...आणि हिच्या बोलण्यात कुठे उत्साह असतो. नुसती बुजल्यासारखी असते. आजकालच्या मुलांना मॉडर्न मुली पसंत पडतात. तरी कितीतरी वेळा मी हिला सांगते...इतर चारचौघींसारखी थोडी फॅशन करीत जा. पण माझे ऐकेल तर शपथ. "
"वहिनी, अगं किती बोलतेस? त्याने भेटायला बोलावले आहे तिला जाऊ दे ना. उद्या संसार त्या दोघांना करायचा आहे. एकमेकांशी बोलले तर स्वभाव समजतील. आणि तू उगाच वेडे वाकडे तर्क लावू नकोस. "
"बरं बाई...मी आपली गप्प बसते. पण तरी दोन शब्द बोलते ते नीट ऐक. त्याच्याशी व्यवस्थित बोल. आणखी एक लक्षात ठेव. नशिबाने एवढे मोठे स्थळ आले आहे . तर हातचे सोडू नकोस. "
मामी जाता जाता उपदेशाचे बोल सुनावून गेलीच.
ती गेल्यावर सुधामावशी आणि प्रिया एकमेकांकडे पाहून खुदकन हसल्या. तिचे असे बोलणे त्यांच्या सवयीचे झाले होते.
मामी जाता जाता उपदेशाचे बोल सुनावून गेलीच.
ती गेल्यावर सुधामावशी आणि प्रिया एकमेकांकडे पाहून खुदकन हसल्या. तिचे असे बोलणे त्यांच्या सवयीचे झाले होते.
सुधामावशीने प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवून तिच्या गालावरून हनुवटीजवळ आणला आणि आपल्या तीन बोटांत तिची हनुवटी पकडत ती म्हणाली,
"एवढ्या सुंदर मुलीला तो कसा नाकारेल! "
प्रियाने आपल्या सुधामावशीच्या मांडीवर डोके ठेवले.
"त्यादिवशी सुमा जेव्हा दवाखान्यातून परत येत होती तेव्हा तिने तुला बसस्टॉपवर पाहिले
'केंव्हा ?'
... प्रियाने मान वर करून मावशीकडे पाहिले. प्रियाच्या नजरेत प्रश्नचिन्ह होते.
... प्रियाने मान वर करून मावशीकडे पाहिले. प्रियाच्या नजरेत प्रश्नचिन्ह होते.
"ती कारमध्ये होती म्हणून तू तिला पाहिले नसशील. तुझ्या ऑफिसमध्ये दिवाळीची पूजा होती ना तेव्हाची गोष्ट. तू अबोली रंगाची नाजूक रेशमी काठाची साडी नेसली होतीस. खूप सुंदर दिसत होतीस. तिने मला लगेचच फोन केला . मला म्हणाली ,
"सुधे, माझी सून नक्षत्रासारखी देखणी दिसतेय. तिला अशी सजवून बाहेर पाठवू नकोस. कोणाचीतरी दृष्ट लागायची."
प्रिया लाजली. तिचा चेहरा वर करीत मावशी म्हणाली,
"ती तुझ्या आईची ... अनुची साडी आहे. तिचा आशिर्वाद आहे त्यात. त्यात खूप खुलूनही दिसतेस. ती साडी नेसून शेखरला भेटायला जा. त्याची नजर तुझ्यावरून हटणारच नाही. "
"मावशी...आता बस हा...मी जाते. "
प्रिया गोरीमोरी होत म्हणाली.
प्रिया गोरीमोरी होत म्हणाली.
*******
टॅक्सी हॉटेल आलोक समोर थांबली. प्रियाने पैसे चुकते केले व ती हॉटेलमध्ये शिरणार तोच तिथे रडत असणाऱ्या साधारण दोन अडीज वर्षाच्या मुलाकडे तिचे लक्ष गेले. तो मुलगा बहुदा झोपला असावा आणि नुकताच उठल्यावर आपली आई बाजूला नाही हे पाहून रडत असावा असे तिला वाटले. तिने आजुबाजूला पाहिले. बाजूलाच एका इमारतीचे बांधकाम चालले होते. बहुतेक त्याची आईसुद्धा तिथेच काम करीत होती. कारण त्या इमारतीतून एक स्त्री काम करता करता खाली त्या मुलाकडे डोकावून पाहत असल्याची तिला दिसली.
एव्हाना शेखर आला असावा तिने घड्याळात पाहिले सहा वाजून गेले होते. पण त्या रडणाऱ्या मुलाला एकटे सोडून ती थोडीच जाणार होती. तिने त्या मुलाला उचलून घेतले. असे करताना आपली साडी खराब होईल, या गोष्टीचा तिच्या मनात चुकूनही विचार आला नाही. बोटाने टिचकी वाजवून ती त्या मुलाला बाजूचे झाड, त्यावर बसलेला कावळा दाखवू लागली. काही मिनिटातच त्या बाळाची आई धावतच तिच्या जवळ आली. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते. तिने आपल्या बाळाला घेतले आणि त्याच्या गालाचा पापा घेतला. प्रियाने आपल्या पर्समधून पाचशेची नोट काढून तिला दिली.
ती बाई ते घेण्यास कचरत होती पण प्रियाने तिच्या हातात ती बळेच ठेवली.
ती बाई ते घेण्यास कचरत होती पण प्रियाने तिच्या हातात ती बळेच ठेवली.
"ताई, बाळाला खाऊ घे आणि एखादे खेळणे घेऊन दे. "
त्या स्त्रीने हसून मान डोलावली. प्रिया वळली पण पुन्हा फिरून तिने बाळाचा गालगुच्चा घेतला व ती हॉटेल आलोक मध्ये शिरली.
शेखर आलोक हॉटेलच्या वर असलेल्या काचेच्या AC दालनातून हे सर्व पाहत होता.
******
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
