डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
प्रिया आज माझी (भाग ८)
ती शेखर बसलेला होता त्या ac दालनात आली. तो फोनवर काहीतरी टाईप करीत होता.
नेव्ही ब्ल्यू रंगाचे टी शर्ट आणि फिक्कट निळ्या रंगाची जीन्स. पेहराव अगदीच साधा होता पण त्यातही तो कमालीचा आकर्षक दिसत होता. फोटोत पाहिल्यापेक्षा कितीतरी सुंदर दिसत होता. त्याच्या जवळ एक एक पाऊल टाकत जाताना तिच्या हृदयाचे ठोके वेग घेत होते.

ती साधारण दहा पाऊले लांब होती तेंव्हा त्याने मान वर केली आणि क्षणभर तो ही तिला पाहत राहिला. हो....ती दिसतच इतकी छान होती की तोच काय आजुबाजूच्या टेबलावरचे बॅचलर आणि मॅरीड सर्वच जण तिच्याकडेच पाहू लागले.
प्रियाला आपल्या आई वडिलांकडून त्यांच्यातले सर्व सुंदर फिचर्स वारसारुपी मिळाले होते. आईसारखे चाफेकळीसारखे नाक, मोठे पाणीदार डोळे, लांबलचक पापण्या, वडिलांसारखी तीक्ष्ण हनुवटी, आणि हसताना किंवा बोलताना गालावर पडणारी नाजूक खळी.
फक्त रंग देताना देवाने समतोल राखला होता. ना पूर्ण सावळा ना पूर्ण गोरा....एखाद्या गोऱ्या मुलीला भर उन्हात भरगच्च डेरेदार वृक्षाखाली उभे केल्यास तिचा जसा रंग दिसेल तसा ...गव्हाळ गोरा.
फक्त रंग देताना देवाने समतोल राखला होता. ना पूर्ण सावळा ना पूर्ण गोरा....एखाद्या गोऱ्या मुलीला भर उन्हात भरगच्च डेरेदार वृक्षाखाली उभे केल्यास तिचा जसा रंग दिसेल तसा ...गव्हाळ गोरा.
आपण तिच्याकडे एकटक पाहत आहोत ह्याचे भान झाल्यावर त्याने आपली नजर फेरली आणि पुन्हा तिच्याकडे पाहिले. एव्हाना ती जवळ आली होती.
"हाय.. प्लीज..."
त्याने तिला बसावयास सांगितले.
"हाय. "
उत्तरादाखल तो पुसटसे हसला.
"वेटर...."
वेटर जवळ आल्यावर शेखरने प्रियाकडे पाहिले.
"कॉफी, टी ऑर समथिंग एल्स?"
"एनिथिंग."
"ओके... वेटर टू कॉफी..."
वेटर निघून गेला. त्याने तिच्याकडे पाहिले...त्याला थोडे असहज वाटत होते.
बहुतेक एखाद्या मुलीला भेटायची त्याची ही पहिलीच वेळ असावी म्हणून असावे कदाचित... ती मनात विचार करू लागली.
वेटर कॉफी घेऊन येईपर्यंत ...तिच्याकडे एक दोन वेळा पाहून शेखर इकडे तिकडे पाहत होता.
शेवटी एकदाचा वेटर कॉफी घेऊन आला.
"प्लीज हॅव इट. "
तिने कॉफी पियायला सुरू केली त्यानंतर त्यानेही कॉफी मग ओठांना लावला.
खरेतर कुठल्याही मुलाला भेटायची तिचीही तशी पहिलीच वेळ होती पण तो जितका अस्वस्थ होता ती तितकीच शांत होती. कॉफी पिता पिता ती त्याचे निरीक्षण करीत होती. कसल्यातरी टेन्शन मुळे त्याचा चेहरा लाल झाला होता अगदी रुज लावल्यासारखा. त्याचे लक्ष नव्हते त्यामुळे ती मात्र त्याच्याकडे अगदी टक लावून पाहत होती.
त्याने कसाबसा कॉफीचा शेवटचा घोट संपवला.
"नक्की याला कुठल्या गोष्टीचे टेन्शन आले असावे. तिची मैत्रीण रागा सांगत होती की तिच्या नवऱ्याने तिला पहिल्यांदाच प्रपोज केले तेंव्हा तो खूप अस्वस्थ झाला होता. शेखर तसे तर काही बोलणार नाही ना."
विचारानेच प्रियाच्या पोटात लाजेची फुलपाखरे बागडू लागली.
"प्रिया....प्रपोज करायला तुमचे थोडीच लव मॅरेज आहे. तू पण अगदी काहीपण विचार करतेस. ".
तिच्या मनाने तिला डोक्यात टपली मारली.
तिने त्याच्याकडे पाहून एक दीर्घ श्वास घेतला.
तिच्या मनाने तिला डोक्यात टपली मारली.
तिने त्याच्याकडे पाहून एक दीर्घ श्वास घेतला.
त्याने डोळे मिटले होते. मनात कसला तरी विचार करून त्याने डोळे उघडले,
"प्रिया. "
तिचे डोळे किंचित मोठे झाले.
त्याच्या तोंडून तिचे नाव ती पहिल्यांदाच ऐकत होती.
त्याच्या तोंडून तिचे नाव ती पहिल्यांदाच ऐकत होती.
तिचे नाव पहिल्यांदाच तिला गोड वाटू लागले.
"प्रिया.... आय.... आय...."
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.