डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
प्रिया आज माझी (भाग १०)
"किती अवलक्षणी पोरगी आहे ही. काय तर म्हणे लग्न आता करायचे नाही. काल त्याला भेटायला जाईपर्यंत तर सर्व ठीक होते मग आता अचानक काय झाले?....त्याने नकार दिला असेल बहुतेक....स्वतःची बदनामी होईल म्हणून उगाच बनाव करतेय. तरी मी सांगत होते ...चार चौघींसारखी थोडी तरी फॅशन कर. काकूबाई सारखी साडी नेसून गेली होती...."
"वहिनी... ती नाही म्हणत आहे ना...."
"सुधा पण इतक्या चांगल्या स्थळाला ती का नाही म्हणत आहे. प्रिया तू तरी काही बोल. " मामाना ही प्रियाने नकार दिलेला पटला नव्हता.
"मामा, मघाशी मामी म्हणत होत्या तसे मला पण वाटते.."
मामानी तिच्याकडे प्रश्नार्थकरित्या पाहिले.
"आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही आहोत...म्हणजे...म्हणजे आमच्या राहणीमानात खूप तफावत आहे. आय आय एम सारख्या प्रथितयश संस्थेत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांची इतक्या चांगल्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी आहे. त्यांच्यापुढे मी तर अगदीच नगण्य....साधी बीकॉम झाले आहे. साध्याशा कंपनीत काम करत आहे....उद्या या मुळे अडचणी निर्माण व्हायला नकोत म्हणून मला हे लग्न करायचे नाही. "
"घ्या.... दारिद्र्याचे डोहाळे लावून घ्यायचे आहेत का...इतका चांगला मुलगा तुला नको झाला म्हणजे कंपाऊंडरशी लग्न करणार आहेस का?"
"वहिनी लग्न तिला करायचे आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तिला नाही का?"
"हा... घ्या निर्णय...आणि आपल्या आयुष्याचे वाटोळे करा.
प्रिया .. तुला काय वाटले तू शेखरला लग्नाला नकार दिलास तर तुला आम्ही घरात बसवून ठेवणार आहोत. माझा मामेभाऊ केव्हाचा मागे लागला आहे. त्याचा मुलगा सनी इथे मुंबईतच पोस्टात कामाला आहे. आणि आपल्या शेजारच्या शिंदेबाई त्यांच्या भावासाठी तुला विचारत होत्या. त्यांनाही विचारते...."

"वहिनी, तो सनी पोस्टात शिपाई आहे. आणि शिंदेबाईंचा भाऊ एक नंबरचा मवाली आहे. येता जाता पोरींची छेड काढीत राहतो...."
"घ्या आता...शेखर नको, सनी नको...शिंदेबाईंचा भाऊ दीपकही नको...मग काय अंबानींच्या मुलाबरोबर लग्न करायचा विचार आहे का...पण तेही आता शक्य नाही त्याचेही लग्न झालेय. "
मामी कुत्सितपणे म्हणाली.
मामी कुत्सितपणे म्हणाली.
"वहिनी.... थोडे दिवस तरी जाऊदेत ...तिच्या लग्नाचे मग पाहू."
"मी फक्त एक महिना गप्प बसेन त्यानंतर नाही. येईल त्या स्थळाशी तिला लग्न करावे लागेल. आता जसे शेखरला भेटू दिले तसे भेटूही देणार नाही."
मामी फणकऱ्याने म्हणाली व तिथून निघून गेली.
मामी फणकऱ्याने म्हणाली व तिथून निघून गेली.
"येईल त्या स्थळाशी म्हणजे? दादा, तू वहिनीला काहीच का बोलत नाहीस. "
"सुधा ती बरोबर बोलत आहे. वयात आलेल्या मुलीचे जेवढे लवकर होईल तेवढे लवकर लग्न झालेले कधीही चांगलेच ना. "
"असा विचार तू श्रेयाच्या बाबतीतही करशील ना..."
सुधामावशी जरा खोचकपणेच बोलली. पण त्यावर काही एक ना बोलता मामा तिथून निघून गेले.
सुधामावशी जरा खोचकपणेच बोलली. पण त्यावर काही एक ना बोलता मामा तिथून निघून गेले.
*****
सुधामावशीने तिच्या मैत्रिणीला सुमेला म्हणजेच शेखरच्या आईला फोन केला. सुरुवातीला प्रियाने तिच्या मामा मामींना जे सांगितले होते ते त्यांना देखील सांगितले. पण शेखरच्या चाणाक्ष आईने आपल्या मैत्रिणीला शपथ देऊन खरे काय ते सांगण्यास सांगितले. शेखर किंवा प्रियाला यातले काही एक कळता कामा नये या अटीवर सुधामावशीने त्यांना शेखरनेच प्रियाला नकार देण्यास सांगितले असे सांगितले. खरेतर त्या शेखरला या गोष्टीचा जाब विचारणारच होत्या पण मग आपल्या मैत्रिणीला शपथ दिली आहे याची त्यांना जाणीव झाली.

त्यांनी प्रियाने शेखरला नकार दिला आहे ही गोष्ट त्याला सांगितली. शेखरच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून त्यांना त्याची खूप खूप चिड येत होती. पण तरीही त्या आपला राग नीट व्यक्त करत नव्हत्या. प्रियाला सून म्हणून घरी आणायचे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले.
त्यानंतर काही दिवसातच शेखरने मिहिकाला घरी आणले.
गोरीपान, सडपातळ अंगकाठी, केसांचा लेयरकट , पेन्सिल हिल घातलेली मिहिका त्यांच्या सुनेच्या व्याख्येत कुठेच बसत नव्हती. पण तरीही शेखरच्या चेहऱ्यावरचे सुख पाहून त्यांनी आपली आवड निवड बाजूला ठेवली.
गोरीपान, सडपातळ अंगकाठी, केसांचा लेयरकट , पेन्सिल हिल घातलेली मिहिका त्यांच्या सुनेच्या व्याख्येत कुठेच बसत नव्हती. पण तरीही शेखरच्या चेहऱ्यावरचे सुख पाहून त्यांनी आपली आवड निवड बाजूला ठेवली.
तिचे वडील एक मोठे इंडस्ट्रीयलिस्ट होते. लग्नाची बोलणी करण्यासाठी त्यांनी शेखर आणि त्याच्या आईला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये इन्व्हाईट केले होते.
"हे पहा मिसेस परांजपे. माझी मुलगी मिहिका म्हणजे माझी जान आहे. आजपर्यंत तिने जे जे मागितले ...ज्या कुठल्या गोष्टीवर बोट ठेवले ती गोष्ट मी तिला दिली. तिचे लग्नही तिनेच ठरविले. आणि खरे सांगू... आय लाइक हर चॉईस... ती इतकी खुश आहे की पुढच्याच आठवड्यात लग्न करेन असे म्हणत आहे. "
"पण अंकल..पुढच्या आठवड्यात कसे शक्य आहे
माझ्या ऑफिसचे एक महत्त्वाचे डेलिगेशन पुढच्या आठवड्यात आहे .....ते मी टाळू शकत नाही. मला एन्क्रिमेंट ही मिळणार आहे. "
माझ्या ऑफिसचे एक महत्त्वाचे डेलिगेशन पुढच्या आठवड्यात आहे .....ते मी टाळू शकत नाही. मला एन्क्रिमेंट ही मिळणार आहे. "
"अरे सन इन लॉ...असे अनेक मौके तुमच्या जीवनात येत राहतील ....तुम्ही एका मोठ्या पोस्टवर आहात...अशा गोष्टी मॅनेज करणे तुम्हाला सहज शक्य होईल. आय ॲम शूअर
तुम्ही मिहिकासाठी म्हणजेच तुमच्या वाइफ आणि लाइफ साठी एवढे करू शकता ना. "
तुम्ही मिहिकासाठी म्हणजेच तुमच्या वाइफ आणि लाइफ साठी एवढे करू शकता ना. "
"हो ना मिसेस परांजपे... वाइफ इज लाइफ... बरोबर बोललो ना मी. "
"हो. जीवनसाथी म्हणजे आयुष्यभराची साथ असते. "
कुठेतरी हरवत सुमन परांजपे म्हणाल्या.
कुठेतरी हरवत सुमन परांजपे म्हणाल्या.
"आई...तू ठीक आहेस ना."
"हो. "
एक निःश्वास टाकत त्या म्हणाल्या.
"शेखर...मला हळद मेहंदी....या सर्व गोष्टी करायच्या नाहीत... डायरेक्ट लग्न. "
"अगं पण या सर्व विधी मुली जास्त एन्जॉय करतात. आणि माझ्या नावाची मेहंदी तू काढणार नाहीस का?" शेखर कुजबुजत म्हणाला.
"नो वे....अरे मी कालच तुला सांगितले ना... लग्नानंतर लगेचच मी माझ्या फॅशन डिझाईनच्या प्रोजेक्ट साठी बाली ला जाणार आहे."
"सो व्हॉट?"
"म्हणजे काय!...तिथे सगळे प्रोफेशनल लोकं येणार आहेत...तिथे अस हाताला मेहंदी अँड ऑल.... हे सर्व एल एस (लो क्लास) वाटेल...शिवाय तिथे मी कोणाला सांगणार पण नाही की मी मेरीड आहे."
सुमन परांजपे सुप पित होत्या...तिचे शेवटचे वाक्य ऐकून त्यांना ठसका लागला..
शेखरलाही तिचे ते वाक्य फारसे रुचले नाही.
"ओ... बेबी...एकदा हे इव्हेंट झाले की इंडियात आल्यावर डॅडी आपल्यासाठी ग्रँड रिसेप्शन ठेवणार आहेत...तिथे अख्ख्या जगाला समजेल की आपले लग्न झालेय. "
आता कुठे शेखरचा चेहरा खुलला.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.