Login

प्रिया आज माझी भाग ११

Love Story
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


प्रिया आज माझी (भाग ११)


आज शेखर आणि मिहिका लग्नाची शॉपिंग करण्यासाठी मॉल मध्ये चालले होते.

"शेखर, आपण दोघांनी एकत्र पाहिलेले स्वप्न आता काही दिवसातच पूर्ण होणार आहे. "

शेखर ड्राईव्ह करत होता आणि मिहिका त्याच्या बाजूला बसली होती.

"कॉलेजमध्ये असताना तू म्हणायचास तुझ्या स्वतःच्या कारमध्ये तू ड्रायव्हिंग करत असताना तुझ्या बाजूला बसण्याचा अधिकार तू फक्त आणि फक्त तुझ्या स्पेशल पर्सनला देणार आहेस...असे म्हणताना माझ्याकडे हळूच पाहायचास. तुझे इशारे मी कधीच ओळखले होते. पण तू कन्फेस करायची वाट पाहत होते. पण तू शेवटपर्यंत मला आय लव्ह यू म्हणालाच नाहीस.....

मिहिका लटके रागावली होती तेंव्हा शेखरने डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला पाहिले आणि तो खोडकर हसला.

"ते फक्त मी एकाच व्यक्तीला बोलणार आहे... माझ्या पत्नीला."

"तुझी बायको मीच होणार आहे ना. मग आता बोल ना... मला ऐकायचे आहे.

"मी म्हटले ना की मी माझ्या बायकोलाच म्हणणार आहे. "

"ओ हो... वेडिंग नाइटला!....म्हणजे नक्कीच काहीतरी सरप्राइज देणार आहेस"

"तू आताच सगळे गेस करतेस मग आपण वेडिंग नाइटला काय करणार"

"यू नॉटी मिस्टर स्कॉलर.... हाऊ रोमँटिक. "

शेखरने तिच्याकडे चमत्कारिकपणे पाहिले व तो पुन्हा ड्राईव्ह करू लागला.

"शेखर, तुला एक विचारायचे होते. माझे फॅशन इव्हेंट होणार आहे ना...त्याची नक्की डेट ठरली नाही...म्हणजे दोन तीन दिवसात कधीही डेट कळेल. मी तिथे जात आहे त्या बद्दल तुला काही ऑब्जेक्शन नाही ना. "

"अफकोर्स नॉट. "

"ओ शेखर...तू माझे टेन्शन कमी केले आहेस. यू आर रिअली अ हसबंड मटेरियल. "

तिने ड्राईव्ह करत असणाऱ्या शेखरच्या गालांवर पटकन किस केले.
त्याने चमकून तिच्याकडे पाहिले.

"मिहिका ...आपले आधीच ठरले होते ना की आपण आपल्या रिलेशनशिप मध्ये फिजिकल व्हायचे नाही. सगळे काही लग्नानंतर ....या बाबतीत मी ऑर्थोडॉक्स आहे. लग्न अग्निभोवती फेरे या गोष्टी मी मानतो. "

"शेखर...मी फक्त तुझ्या गालांवर किस केले. हे सर्व मी बोलले पाहिजे....पण खरे सांगू..... तुम्हारी इसी अदा पर मुझे प्यार आता है. "

तिने शेखरचा गालगुच्चा घेतला...आता मात्र त्याने तिच्याकडे रागाने पाहिले तशी ती घाबरली.

"ओ सो सॉरी. "
तिने असे म्हटल्यावर दुसऱ्याच क्षणी तो खुलून हसला.

"शेखर..... यू स्केअर्ड मी..." ती लटके रागावून म्हणाली.

"जोक्स अपार्ट..... नाऊ आय ॲम सीरियस...मी सांगतो ते नीट ऐक. आपले लग्न येत्या शुक्रवारी आहे....आज रविवार आहे....तू मेहंदी हळद या विधी टाळल्यास ते बरेच झाले...कारण सोमवार पासून मी सॉलिड बिझी असणार आहे. सोमवार ते गुरुवार मी ऑफिसमध्येच राहणार आहे. फॉरेनचे क्लायंट गुरुवारी येणार आहेत. त्या आधी माझ्या टीमला ट्रेनिंग देण्यात येणार आहे. मी तिथे असणे गरजेचे आहे. माझा पर्सनल फोन मी घरीच ठेवणार आहे . मी फक्त ऑफीस कॉलच अटेंड करणार आहे. त्यामुळे या दिवसात तू मला फोन करू नकोस. आईलाही मी तेच सांगितले आहे. "

"मी सुद्धा सोमवार पासून माझ्या इवेंटची तयारी करणार आहे.... सो नो वरीज माय लव्ह. "
तिने पुन्हा आपला हात त्याच्या गालांजवळ नेला तसे तो आधीच मागे झाला.

*****
सोमवारी सकाळी

शेखर टाय बांधीत होता आणि त्याची आई त्याचे कपडे सुटकेसमध्ये भरीत होती.
"शेखर...असे कसे रे लग्न तुझे...ना हळद ना ढोल ताशे...ना कोणाला आमंत्रण दिले आहे ....माझा एकुलता एक मुलगा आहेस तू...तुझ्या लग्नाबाबत मी काय काय विचार करून ठेवला होता..."

"आई, आजपासून तीन दिवसांनी माझे लग्न आहे...तू फोनवर आमंत्रण दे... मी आपल्या भास्कर काकाना सांगतो...ते आणि त्यांची मुलेही आमंत्रण देतील. तुला ज्यांना बोलवायचे त्यांना बोलाव. मी इव्हेंट ऑर्गनायझरला त्याप्रमाणे सर्व अरेंज करायला सांगतो. "

"तुझे ऑफिसला जाणे गरजेचे आहे का?"

"हो आई... तुझीच तत्वे घेऊन पुढे चाललोय ना मी..मग माझ्या कर्तव्यास कसे चुकू."

"मला तुझ्याशी बोलायचे असेल तर काय करू?"

" आई... तुला हवे तेंव्हा तू कधीही कॉल कर...पण माझा ऑफिसचा नंबर इतर कुणालाही देऊ नकोस... कुणाला तसे सांगू देखील नकोस. अगदी मिहिकालाही नको. "

"आई .. इव्हेंट ऑर्गनायझरला सांगितले आहे.....तुला दुकानात जायची काही गरज नाही.तुझ्यासाठी साड्या घेऊन तो येईलच . तू दगदग अजिबात करायची नाही...तुझ्या फोनमध्ये सावंत या नावाने सेव केलेला नंबर आहे...तो इव्हेंट ऑर्गनायझरचा आहे. काही लागले तर त्यांना सांग. "

आपल्या मुलाला आपली किती काळजी आहे या गोष्टीचे सुमन परांजपेना कौतुक वाटले.

क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.