डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
प्रिया आज माझी (भाग १२)
संध्याकाळची वेळ होती.
प्रिया दिवाबत्ती करीत होती. मावशी आणि तिच्या रुममध्ये देव्हारा होता. मावशी सद्गुरूंची पोथी वाचत होती. इतक्यात फोन वाजला.
"हॅलो सुमा..." फोन घेताना मावशी काहीशी नाराज झाली होती.
सुमा नाव ऐकताच प्रियाने मागे वळून पाहिले.
"सुधा , शेखर लग्न करत आहे. "
"अच्छा."सुधामावशी थंड स्वरात म्हणाली.
"कधी... कोणाशी...असे नाही विचारणार का? माझ्यावर रागावलीस ना? "
"नाही गं....तुझ्यावर कशी रागावू....काही काही गोष्टी नशिबावर अवलंबून असतात....बरे आता सांग शेखरचे लग्न कधी आहे? "
बोलताना सुधामावशीचे तिच्याकडेच पाहणाऱ्या प्रियाकडे लक्ष गेले. प्रियाच्या डोळ्यांत अश्रू तरळले पण तिने लगेचच दुसरीकडे पाहिले.
"येत्या शुक्रवारी."
"अगं म्हणजे आजपासून चारच दिवसांनी."
"हो...तुम्ही सगळे या. "
"सगळे..." मावशी खिन्न हसली.
"खरेतर प्रियाबद्दल कसे विचारू तेच समजत नव्हते...सारखे अपराध्यासारखे वाटत आहे. ती कशी आहे ?"
"बरी आहे. "
"तिला बघावेसे वाटले आहे. लग्नाला तिला घेऊन येशील का?"
"तुला तिला भेटायचे असेल ना तर आपण बाहेर कुठेतरी भेटू... पण ती लग्नाला येणार नाही. तू मला ॲड्रेस मेसेज कर मी नक्की येईन. "
एवढे बोलून सुधामावशीने फोन ठेवला.
"मावशी ...तू फोन असा लगेच का ठेवला ...त्यांना वाईट वाटले असेल."
"ती माझी मैत्रीण आहे ..माझा स्वभाव तिला ठाऊक आहे.....आणि कितीही नाही म्हटले ना तरी मी खरोखरच सुमेवर रागावली आहे...मला माहित आहे यात तिची काहीच चूक नाही तरीही. मला म्हणत होती शेखरच्या लग्नाला तुला घेऊन ये..."
"घ्या आता.....त्याचे लग्न ठरलेही...
ठरणारच ना...एवढा चांगला मुलगा होता...हसत हसत एखादी झाली असेल तयार....आता तुम्ही मावशी भाची मिळून देवासमोर ठणठण करीत बसा. "
रूमच्या आत शिरत मामीने आपली बडबड सुरू केली.
ठरणारच ना...एवढा चांगला मुलगा होता...हसत हसत एखादी झाली असेल तयार....आता तुम्ही मावशी भाची मिळून देवासमोर ठणठण करीत बसा. "
रूमच्या आत शिरत मामीने आपली बडबड सुरू केली.
"वहिनी....बोलताना थोडे तरी भान ठेव. आणि आमचे बोलणे चोरून ऐकताना तुला काहीच कसे वाटले नाही. "
"मी माझ्या खोलीत जात होते...तेंव्हा ऐकले आणि माझ्या घरात मी कुठेही फिरेन...."
"काय म्हणालीस तुझ्या घरात!!!!!!!!....."
मावशी खोचकपणे म्हणाली तशी मामीने तिथून काढता पाय घेतला.
मावशी खोचकपणे म्हणाली तशी मामीने तिथून काढता पाय घेतला.
"सदगुरू , ...मी जिवंत असेपर्यंत माझ्या प्रियाचे लग्न होऊ दे... माझ्यामागे ही वहिनी तिचा नुसता छळ करेल. माझी पोरगी गरीब गाय आहे...निमूटपणे ऐकून घेते.... तिच्याजागी दुसरी कोण असती तर या दोन उपटसुंभाना घरातून हाकलून काढले असते. "
"मावशी... असे नको बोलूस....आईचा पुरु(पुरुषोत्तम) मामावर खूप जीव होता. "
सुधामावशीची बाजूला बसत प्रिया म्हणाली.
"तेंव्हा मलाही तसेच वाटायचे ना...पण त्याचे त्याच्या बायकोपुढे काही चालत नाही. कितीतरी वेळा त्याच्यासमोरच ती (मामी) वाट्टेल ते बोलते पण तिला एक शब्दाने रोखेल तर शपथ."
यात मामीची काही एक चुकी नाही माझ्या नशिबानेच माझी थट्टा केली आहे. ती उठली व पुन्हा देव्हाऱ्याकडे गेली. दिव्यात तेल ओतून तिने ज्योत प्रज्वलित केली आणि हात जोडून ती देवासमोर उभी राहिली. पण तिच्या मनात भावनांचा पूर आला होता.
देवा का परीक्षा बघतोस माझी? अजून किती दुःख भोगायचे आहे मला? ॲक्सिडेंट मध्ये आईबाबांना घेऊन गेलास. शेखरवर मनापासून प्रेम केले त्यालाही माझ्यापासून दूर केलेस. मला जन्माला तरी कशाला घातलेस... त्याच्याशिवाय कशी जगू तूच सांग. ज्यावेळी मी उठता बसता त्याची स्वप्ने पाहत होते त्यावेळेस तो कुणा दुसरीच्या स्वप्नांत गुंतलेला होता ही भावनाच मला असह्य होत आहे. अजून किती परीक्षा पाहणार आहेस माझी?
समोर लावलेल्या ज्योतिकडे पाहताना तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या.
मागे बेडवर बसून पोथी वाचत असलेल्या मावशीचे तिच्याकडे लक्ष गेले तसे तिने उठून तिला मिठीत घेतले.
मामी पुन्हा एकदा त्याच्या रुममध्ये आली.
"घ्या आता ...दिवेलागणीच्या वेळेस टिपे गाळत बसलात तर
घरात लक्ष्मी कशी येईल.... सर्व दळभद्री लक्षणे आहेत. आईबाप गेले आणि जाताना हे लोढणे आमच्या गळ्यात टाकून गेले....ते तर आमचे मन मोठे म्हणून गावातला आमचा संसार सोडून आम्ही इथे येऊन राहिलो...आता अजून कितीवर्ष पिडायचे बाकी आहे कोणास ठाऊक. "
मामी मान उडवत म्हणाल्या.
घरात लक्ष्मी कशी येईल.... सर्व दळभद्री लक्षणे आहेत. आईबाप गेले आणि जाताना हे लोढणे आमच्या गळ्यात टाकून गेले....ते तर आमचे मन मोठे म्हणून गावातला आमचा संसार सोडून आम्ही इथे येऊन राहिलो...आता अजून कितीवर्ष पिडायचे बाकी आहे कोणास ठाऊक. "
मामी मान उडवत म्हणाल्या.
"बस कर वहिनी...किती बोलशील... हिला घालून पाडून बोलल्याशिवाय तुझा दिवस सार्थकी लागतच नाही का?"
"चांगले बोलण्यालायक काय काम केले आहे हिने? एवढे चांगले स्थळ आले होते....नकार देऊन मोकळी झाली. जा......आता मावशी भाचीने दोघी मिळून लग्नाला जा.... आणि त्याच्या अंगावर अक्षदा टाकून मोकळ्या व्हा. तुम्हा दोघींना खिजविण्यासाठी परांजपे बाईनी त्यांच्या मुलाच्या लग्नाला तुम्हाला बोलावले आहे. थोडीतरी लाज शिल्लक असेल तर त्या लग्नाला जाऊ नका. मला तर पक्का संशय आहे शेखरनेच लग्नाला नकार दिला आहे..... तो शेखर त्याला...."
"मामी.... मला काहीही बोला...पण शेखर विषयी काही एक बोलू नका. त्याची काही चूक नाही....नकार मी दिला आहे."
"हो का ? चांगले आहे....त्याची इतकी बाजू घेतच आहेस...तर लग्नाला जाऊन दाखव...त्याचे लग्न बघवेल का तुला?
"हो...त्याचे चांगले होत आहे ते मला का नाही पाहवणार...मी त्याच्यासाठी खूप खुश आहे...आणि मी त्याच्या लग्नालाही जाणार . "
"प्रिया..."
सुधामावशी चकित होऊन प्रियाला पाहू लागली.
सुधामावशी चकित होऊन प्रियाला पाहू लागली.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
