प्रिया आज माझी भाग 23
डिसेंबर- जानेवारी 2025-26
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दुसऱ्या दिवशी
शेखर टायची नॉट बांधत होता.
प्रियाने ड्रॉवरमधून त्याचा रुमाल काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवला.
प्रियाने ड्रॉवरमधून त्याचा रुमाल काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवला.
"तुला माझ्यासाठी हे सर्व करायची गरज नाही. "
"या सर्व गोष्टींची मला सवय आहे. तिथे घरी होते तेंव्हा मामांचे कपडे इस्त्री करण्यापासून ते त्यांच्या प्रत्येक गोष्टी जागेवर ठेवण्यापर्यंत मीच करायचे. मला ते त्रासाचे वाटत नाही. आवडत्या व्यक्तींसाठी आपण काही केले तर तो त्रास थोडीच असतो. "
शेखरने चमकून तिच्याकडे पाहिले. तिची नजर थरथरली.
शेखरने चमकून तिच्याकडे पाहिले. तिची नजर थरथरली.
"म्हणजे मला म्हणायचे होते माझ्या सर्व अंगवळणी पडले आहे. "
"मला सवय होईल त्याचे काय...काही दिवसांनी तू जाणार आहेस.."
"मग तुमची बायको...म्हणजे होणारी बायको करेल ना .."
यावर शेखर स्वतःशीच हसला...कारण मिहिकाकडून तो या गोष्टीची अपेक्षाच करू शकत नव्हता.
"शेखर तुम्हाला एक विचारू?"
त्याने तिच्याकडे काहीसे आश्चर्यचकित नजरेने पाहिले.
कारण तसे त्यांचे इतके बोलणे व्हायचे नाही.
त्याने तिच्याकडे काहीसे आश्चर्यचकित नजरेने पाहिले.
कारण तसे त्यांचे इतके बोलणे व्हायचे नाही.
" शेखर तुमच्याकडे तिचा फोटो आहे का ?"
"कोणाचा ?"
"तिचा....तुमची.."
"तुला कशाला हवाय?"
बेडवर बसत सॉक्स घालत शेखर म्हणाला.
बेडवर बसत सॉक्स घालत शेखर म्हणाला.
"मला बघायचं आहे तिला. तुमच्या डायरीत मी तिच्याबद्दल वाचले...तेंव्हापासून. "
"व्हॉट? तू माझी डायरी वाचलीस?"
तो गुरगुरला..तशी ती दचकून भीतीने मागे सरकली.
तो गुरगुरला..तशी ती दचकून भीतीने मागे सरकली.
"तुला बेसिक मॅनर्स नाहीत का? अशी पर्सनल डायरी कशी वाचू शकतेस तू? रिडिक्युलस."
त्वेषातच हँगिंग स्टँडवर टांगलेला कोट त्याने हातात घेतला व टेबलावर ठेवलेली बॅग उचलत तो म्हणाला,
" तुझ्यापेक्षा खूप सुंदर आहे ती. स्वतःची तिच्याबरोबर तुलना करू नकोस. तुझ्यात आणि तिच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. सर्वात मोठा फरक म्हणजे आय लव्ह हर अँड आय हेट यू . मला वाटतं तुला एवढं पुरेसं आहे."
"मुद्दाम नाही केले...वॉर्डरोब साफ करताना माझ्या हातात आली म्हणून पाने पलटली.... आय ॲम सॉरी. "
त्याने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि ताडताड पाय आपटत तो तिथून निघून गेला. तो बाहेर जाताच तिला रडू कोसळले.
सुमनताईंनी त्याचे रागाने असे निघून जाणे पाहिले. या दोघांमध्ये काहीतरी बिनसले असावे याचा त्यांना अंदाज आला.
शेखर ऑफिसला गेला खरा पण तिथे त्याचे लक्षच लागत नव्हते. सकाळी तो प्रियाला टाकून बोलला पण आता ऑफिसमध्ये त्याला राहून राहून चुकल्यासारखे वाटत होते. तिचा तो निरागस चेहरा डोळ्यासमोर येत होता. खरच तिचं कुठे एवढं चुकलं की आपण अगदी वाटेल ते तिला बोललो. रोज घरी जायला त्याला आठ वाजायचे पण आज तो चार वाजताच तो घरी आला.
सुधाकरने दार खोलले ... तो डस्टिंग (कपडा घेऊन रूम साफ करणे) करीत होता. शेखरने त्यांच्या हातात गाडीची चावी दिली आणि गाडी पार्क करायला सांगितली. मनिषाने त्याला पाणी आणून दिले पण तरीही त्याचे लक्ष कधी किचनकडे तर कधी बेडरूमकडे होते.
अजून कशी आली नाही. एरवी सॉक्स काढेपर्यंत पाणी घेऊन येते. कदाचित आत बेडरूममध्ये झोपली असावी. त्याने बेडरूम मध्ये जाऊन पाहिले. ती तिथे नव्हती. कदाचित आईच्या रुममध्ये असावी. सुधाकर डस्टिंग करायला आला की ती आईच्या रुममध्ये जाते कारण तिला धुळीची अलर्जी होती ते त्याला ठाऊक होते. तो फ्रेश होऊन आला आणि थोडे घाईतच त्याने त्याची थ्री फोर्थ आणि टीशर्ट घातले. तिला पहायची इच्छा तीव्र होत होती.
सुमनताईंच्या खोलीच्या दरवाजावर त्याने नॉक् केले.
"कोण शेखर का?"
शेखर एका विशिष्ट पद्धतीने दरवाजा वाजवायचा त्यावरून बाहेर शेखर असेल असा त्यांनी अंदाज बांधला.
"हो आई."
"ये आत ये. "
आत शिरताचक्षणी त्याची नजर रुमभोवती फिरली. सुमनताईंच्या चेहऱ्यावर स्मित पसरले कारण तो प्रियासाठी इथे आला आहे हे त्यांनी ओळखले.
"आई , ... ती....ती....कुठे आहे?"
"तुला चहा हवा असेल ना....मनिषा किचनमध्येच असेल तुला दिसली नाही का ती?"
सुमनताईंनी त्याची अजून चेष्टा करायचे ठरविले.
सुमनताईंनी त्याची अजून चेष्टा करायचे ठरविले.
"आई, मी प्रियाबद्दल बोलत आहे. ती बाजूला देशपांडे काकूंकडे गेली आहे का?"
"अच्छा ...मघापासून तू प्रियाबद्दल विचारत आहेस का...मला वाटले तुला चहा हवा होता. ती बाजूला नाही गेली... पण आज तुला बायकोची आठवण कशी आली आणि आज इतक्या लवकर कसा आलास?"
तो लवकर आल्याचे त्यांना आश्चर्य वाटले होते कारण शेखर एरवी इतक्या लवकर कधी येत नसे. कामाच्या बाबतीत साक्षात ब्रह्देवही आला तरी तो त्याचे ऐकणार नाही इतका तो प्रामाणिक होता. त्यामुळे सहाजिकच आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते.
तो लवकर आल्याचे त्यांना आश्चर्य वाटले होते कारण शेखर एरवी इतक्या लवकर कधी येत नसे. कामाच्या बाबतीत साक्षात ब्रह्देवही आला तरी तो त्याचे ऐकणार नाही इतका तो प्रामाणिक होता. त्यामुळे सहाजिकच आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते.
"आज काम लवकर झाले."
" शेखर, सकाळी निघताना तू प्रियाशी भांडण केले होतेस का रे ? का ती काही बोलली जे ते तुला लागले ? "
"नाही. पण तू असे का विचारतेस?"
" आज तू लवकर घरी आलास ना म्हणून विचारलं."
" उद्यापासून उशिरा येऊ का?"
शेखर चिडून म्हणाला . कारण तो ज्या प्रश्नांचे उत्तर शोधायला इथे आला होता त्याचे उत्तर तर त्याची आई देत नव्हती पण उगीच पाल्हाळ लावून विषय वाढवत मात्र होती.
शेखर चिडून म्हणाला . कारण तो ज्या प्रश्नांचे उत्तर शोधायला इथे आला होता त्याचे उत्तर तर त्याची आई देत नव्हती पण उगीच पाल्हाळ लावून विषय वाढवत मात्र होती.
"असा चिडतोस का या म्हातारीवर ! माझं आपलं वय झालं म्हणून मी असे वेड्यासारखे बोलते. पण तू समजूतदार आहेस. तू प्रियाशी नीट वागत जा. तिच्याशी प्रेमाने वागायला नाही जमले तर मैत्रिने वाग . ती फार जीव लावते तुझ्यावर. तुमच्यातले तुटक वागणं मी पाहत आलेय...पण मी काही बोलले नाही. वाटलं... आज ना उद्या सर्व व्यवस्थित होईल. पण आज महिना झाला तरी तुम्ही..."
" आई पण झालं काय ते तरी सांगशील तिने तक्रार केली का माझ्याबद्दल?"
"तुझ्याबद्दल एक शब्दही ती कोणाकडून ऐकून घेत नाही. ती तुझ्याबद्दल तक्रार कशी करेल? परवा अवनी...ती रे बाजूच्या विंगमधल्या प्रमोदची बायको....ती घरी आली होती. ती प्रियाला म्हणाली...शेखर जरा रागीटच आहे....मागे एकदा सोसायटीच्या मिटिंगमध्ये तिच्या नवऱ्यावर उगीचच भडकला. ... प्रियाला लगेच राग आला म्हणाली, ... हे भडकले म्हणजे नक्कीच कुणीतरी चुकीचे वागले असतील...प्रमोदची बायको बिचारी तिच्याशी मैत्री करायला आली होती ...तिला वाटले बाकीच्या बायकांसारखी ही सुद्धा नवऱ्याची उणीदुणी सांगेल. पण प्रिया तर प्रिया आहे...तिला आल्यापावली परतून लावले. "
"आज तू ऑफिसमध्ये गेल्यापासून सारखे रडत होती. सकाळी नाश्त्याला बाहेर आली नाही म्हणून मी रुममध्ये गेले तर हिचे डोळे भरलेले. मी विचारले तर म्हणाली, काही नाही मावशीची खूप आठवण येते. मी म्हटलं मग फोन कर तिला तर नको म्हणाली . रडून रडून डोकं दुखत होतं तिचं. आज मनिषा सुद्धा थोडी उशीराच आली...ती येईपर्यंत हिने किचनमधले आवरले. मनिषा आली तरी तिलाही काही न काही मदत करते. मला तर जागेचे उठू देत नाही. काही मागायच्या आधी वस्तू हजार. मी भाग्यवान म्हणून मला अशी सून मिळाली. "
"पण आई, ती आहे कुठे ? "
"अरे तिला मी बोलता बोलता नुसते म्हटलं. शेखरला ब्रोकोलीचे सॅलड आवडते. आपल्या इथल्या मार्केट मध्ये मिळत नाही. मागे सुधाकरला सांगितले तर त्याला काही समजले नाही. तो तसाच परत आला. मी एवढे म्हणायची खोटी की झाले! ...अंगात ताप असतानाही गेली भाजी मार्केट मध्ये.....तरी मी म्हटले अगं मार्केट लांब आहे...तुला बरे वाटत नाही.... तेवढ्यापुरती थांबली...आणि माझा डोळा लागला तेंव्हा गेली सुद्धा. मघाशी मनीषाने मला सांगितले तेंव्हा मला माहित पडले. वाटेत चक्कर येऊन कुठे पडली नाही म्हणजे मिळवले. "
सुमनताईंचे लक्ष शेखरच्या चेहऱ्याकडे होते... त्याची काय प्रतिक्रिया आहे हे त्यांना पहायचे होते.
तो अधिक चिंताग्रस्त झाला होता.
तो अधिक चिंताग्रस्त झाला होता.
"आई, मी समीर कडे जाऊन येतो. खूप दिवस झाले त्याला भेटलो नाही ना."
"कोण समीर ?..तोच ना ..भाजी मार्केट जवळ त्याची बिल्डिंग आहे?"
"कोण समीर ?..तोच ना ..भाजी मार्केट जवळ त्याची बिल्डिंग आहे?"
" हो. तोच ."
"मग येताना प्रिया कुठे दिसते का ते पहा. तुझ्याबरोबरच आण तिला."
सुमन ताईंच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होते.
सुमन ताईंच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होते.
"बघेन. वेळ मिळाला तर ."
शेखर लगबगिने बाहेर निघून गेला सुद्धा .
"अरे , कपडे तरी बदल. तू या कपड्यांवर कधी बाहेर जात नाहीस ना. "
पण आईचे वाक्य ऐकण्याइतपत देखील त्याला धीर नव्हता.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
