प्रिया आज माझी भाग २६
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
प्रियाच्या आयुष्यात कारवाँ आला आणि तिची सकाळ आणि संध्याकाळ आल्हाददायक बनण्याचा कारवां सुरू झाला. सकाळी उठल्यावर प्रिया बाल्कनीत उभी राहून सूर्याचा कोवळा प्रकाश अंगावर घेत कारवाँ मधली मराठी भावगीते ऐकायची. कधी कधी शेखर घरी असला तर ती वेगळी कधी न ऐकलेली मराठी गीते त्याच्या कानावर पडायची.
"हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता "
या आधी त्याने क्वचितच एखादे मराठी गीत ऐकले असेल. पण प्रियाची गाणी एकदम वेगळ्या पठडीतील होती...भावस्पर्शी आणि विस्मृतीत गेलेली गाणी ऐकायला तिला फार आवडायचे. तिच्या बाबांचा एक जुना रेडिओ होता. त्यांनाही गाणी ऐकायला फार आवडायचे. तिच्या आईबाबांचे जेव्हा एक्सिडेंट झाले त्या कारमध्ये तो रेडिओ होता....त्यांच्याबरोबर तो ही गेला. त्यानंतर रेडिओ तिने कधी पाहिला नाही...पण तिच्या ऑफिसमधल्या कॉलेजमधल्या मित्र मैत्रिणींना तिने तिच्या या आवडीविषयी सांगितले होते. म्हणूनच कदाचित तिच्या बर्थडे ला तिला हे गिफ्ट मिळाले होते.
शेखरला सुट्टी असायची तेव्हा तो बाल्कनीत पुस्तक वाचत बसायचा. तेंव्हाही मंद स्वरात तिचा सारेगम कारवा सुरूच असायचा. त्यानेही कधी आक्षेप घेतला नाही किंबहुना त्याला त्या मंद स्वरांची सवय झाली होती.
"धुंदी कळ्याना, धुंदी फुलांना , शब्दरूप आले मुक्या भावनांना"
कधी कधी आजुबाजूची वयोवृद्ध शेजारी सुमनताईंकडे येऊन त्याच्या घरातून सुंदर गाणी ऐकू येतात असे त्यांना सांगायचे.
'आजकालच्या मुलांना असली गाणी कुठे आवडतात...तुमच्या निमित्ताने आम्हालाही ऐकायला मिळतात हो'
अशी दाद देऊन जायचे.
'आजकालच्या मुलांना असली गाणी कुठे आवडतात...तुमच्या निमित्ताने आम्हालाही ऐकायला मिळतात हो'
अशी दाद देऊन जायचे.
****
मिहिका मुंबईत आली होती. पण तिचे शेड्युल खूप व्यस्त होते. त्यामुळे ती शेखरला भेटू शकणार नाही असा तिने मेसेज केला होता. ती ज्या फॅशन इन्स्टिट्यूशी जोडलेली होती त्या इन्स्टिट्यूटने एका विदेशी NGO शी collaboration केले होते आणि त्याचे शो इथे भारतात ऑर्गनायझ करायचे काम तिला मिळाले होतें. मोठमोठ्या वर्तमानपत्रात तिचे नाव छापून आले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर तिच्या नावाचा गवगवा होता. तिच्या वाढदिवसानिमित्त तिने पार्टी आयोजित केली होती आणि शेखर त्यात स्पेशल गेस्ट होता. पार्टीचे आमंत्रण देण्यासाठी तिने त्याला फोन केला पण त्याला एक विनंती केली. ती विनंती ऐकूनच तो हैराण झाला. पार्टीत त्याच्या बायकोला घेऊन यायची विनंती तिने केली होती.
"मिहिका, पण तू तिला घेऊन यायला का सांगत आहेस मला समजत नाही. "
शेखर ऑफिसला जायच्या तयारीतच होता . तिच्याशी बोलताना तो टाय बांधत होता पण तिची अनपेक्षित मागणी ऐकून त्याचे हात स्थिर झाले.
शेखर ऑफिसला जायच्या तयारीतच होता . तिच्याशी बोलताना तो टाय बांधत होता पण तिची अनपेक्षित मागणी ऐकून त्याचे हात स्थिर झाले.
"शेखर डियर...आपले लग्न जमल्याचे माझ्या फ्रेंड सर्कलला माहित होते...मी तुला धोका देऊन निघून गेले अशी चर्चा त्यांच्यात आहे. तू जर एकटा पार्टीला आलास तर चर्चांना अजूनच उधाण येईल. सर्व म्हणतील, लग्न सोडून तर पळून गेली आणि आता इथे इंडियात आल्यावर शेखरचा सुखी संसारही मोडत आहे.
तसेही तुमचा डिव्होर्स व्हायला एक वर्ष तरी लागेल असे तू म्हणालास ना...तो पर्यंत आपण एकत्र येऊयात नको. म्हणूनतर इथे आल्यावरही मी तुला भेटायचे टाळले. "
"मग मी येतच नाही ना." तो चिडला.
"नो प्लीज शेखर, फॉर माय सेक मला तुला पहायचे आहे भेटायचे आहे ... तू ये....आणि येताना तुझ्या त्या बायकोलाही घेऊन ये. "
"मिहिका ...हे कसे शक्य आहे..तिला काय सांगू.... हे सांगू का की माझ्या गर्लफ्रेंडला आपल्या रेप्युटेशन ची खूप काळजी आहे त्यामुळे तिच्यासाठी तू माझ्याबरोबर ये..."
"बेबी असा रागावू नकोस ना....या नंतर मी तुला कधी अडचणीत आणणार नाही. "
समोरून तो काहीही बोलत नव्हता.
"शेखर आर यू देयर ....येशील ना. "
"आय विल ट्राय. "
त्याने अर्धवट बांधलेला टाय काढून बेडवर फेकून दिला.
त्याने अर्धवट बांधलेला टाय काढून बेडवर फेकून दिला.
*****
बाहेर हॉलमध्ये बसून प्रिया कन्सल्टन्सी फर्मच्या एचआरशी बोलत होती.
बाहेर हॉलमध्ये बसून प्रिया कन्सल्टन्सी फर्मच्या एचआरशी बोलत होती.
"हो मॅम, लोकेशन मुंबई बाहेर असेल तरी चालेल "
फ्रेश वाटावे म्हणून कॉफी पिण्यासाठी शेखर बाहेर आला होता पण प्रियाचे फोनवरच बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर आठ्या आल्या.
"जर तुम्हाला तिथे इमिजेटली रिपोर्ट करायला सांगितले तर तुम्ही तयार व्हाल का?"
"इमिजेटली म्हणजे किती लवकर?"
ती विचारताना संकोचत होती.
ती विचारताना संकोचत होती.
"मॅडम इमिजेटली म्हटले तर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला जॉइन करावे लागेल.
अशी संधी आली तर तिथे जॉइन होऊ शकला ना?"
अशी संधी आली तर तिथे जॉइन होऊ शकला ना?"
"ह....ह....हो...फक्त रेम्युनरेशन (पगार ) मी सांगितले तेवढे असायला हवे. "
"ओके फाईन देन. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. "
सुमनताई तिचे हे फोनवरचे बोलणे ऐकून हैराण झाल्या.
"अगं प्रिया....तू मुंबईच्या बाहेर का जॉब शोधत आहेस? तसे तुला जॉब करायची काही गरज नाही...पण तरी तुला करायचाच असेल तर इथे मुंबईत पहा ना. पण तू इथे नोकरी करीत होतीस ना...तुला हवे असेल तर तिथे जॉइन कर."
"आई...माझा इथला जॉब त्यादिवशी आमचे लग्न झाले न त्याच्या आदल्या दिवशीच सुटला..... तो टेम्पोररी बेसिस वर होता. घरी मामीला नाही सांगितले कारण ती उगाच नाराज झाली असती...त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी लग्नाला आले आणि माझेच लग्न झाले त्यामुळे मामीला सांगायचा प्रश्न उरला नाही. "
प्रियाने कसलातरी विचार करीत एक दीर्घ उसासा घेतला.
सुमनताई तिच्या जवळ येत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या,
सुमनताई तिच्या जवळ येत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या,
" इथे तुला जॉब केला पाहिजे असे कोणी म्हणणार नाही त्यामुळे तू त्याचे टेन्शन घेऊ नकोस.
(शेखरकडे पाहत)
शेखर आता तूच काय ते सांग हिला. "
(शेखरकडे पाहत)
शेखर आता तूच काय ते सांग हिला. "
इतका वेळ त्यांचे बोलणे ऐकत बसलेल्या शेखरकडे तिचे लक्ष गेले . त्याच्या नजरेतल्या प्रश्नांना आणि नाराजीला तिच्याकडे उत्तर नव्हते.
तो तडक आपल्या बाल्कनीत गेला. समोर शून्यात पाहत असताना त्याच्या मनाला विचारचक्राने घेरले.
प्रियाचे मुंबईबाहेर जॉब करायचे बोलणे...मिहिकाने तिला पार्टीत घेऊन यायला सांगणे...आईने प्रियाला दिलासा देणे... ताप आलेला असताना त्याचे तिची काळजी घेणे ....लग्नाच्या रात्री त्याने तिला घटस्फोटाचे पेपर देणे.....ती बाल्कनीत झोपलेली असताना त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे सारणे...कॉलेजमध्ये त्याने मिहिकाकडे एकटक पाहणे ...त्यांचे पहिल्यांदा डेटवर जाणे...तिथे त्याने आणि मिहिकाने एकत्र सिगारेट शिलगावून बाईकवर बसून गप्पा मारणे...प्रियाने त्याला सिगारेट सोडायला सांगणे एकामागोमाग एक असे हे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर नाचत होते....त्याच्या मनाला नेमके काय हवे तेच त्याला समजत नव्हते.
विचार करता करता त्याचा हात खिशाकडे गेला आणि नकळतपणे त्याने सिगारेट शिलगावून ओठांना लावली. त्या धुरांच्या वलयात तो विचारांचा गुंता सोडवू पाहत होता.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
