प्रिया आज माझी भाग २९
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
"शेखर हे कसं शक्य आहे प्रिया तुझी बायको आहे वॉट अ प्लीझंट सरप्राईज!"
"पण मला सांग हे कसं झालं ? आय मीन प्रियाच्या मावशीने तिचे तुझ्याबरोबर लग्न जमवले होते का?
"हो "
"अच्छा. पण मग मिहिकाचे काय?"
"सांगतो सांगतो . कुल डाऊन. "
शेखरने त्याचे लग्न कसे झाले . लग्नाच्या वेळेस मिहिका हजर नव्हती त्यामुळे आईच्या सांगण्यावरून प्रियाशी लग्न करावे लागले हे सर्व सांगितले .पण सांगताना त्याने लग्नाच्या रात्री तिला घटस्फोट दिला हा भाग वगळला.
*******
प्रिया मैत्रिणींशी बोलत उभी होती. तिला तिच्या मैत्रिणी तिच्या मिस्टरांचा फोटो दाखवायला सांगत होत्या . प्रियाने आपला मोबाईल ओपन केला. तिच्या लग्नात सुधा मावशीने तिचा आणि शेखरचा फोटो काढला होता. तो तिला तिने मेसेज द्वारे पाठवला होता. तो फोटो प्रियाने तिच्या मैत्रिणींना दाखवला.
"वाव प्रिया ! ही इज सो हँडसम!"
शेखरला पाहून तिच्या मैत्रिणी गारदच झाल्या.
शेखरला पाहून तिच्या मैत्रिणी गारदच झाल्या.
"ए जास्त पाहू नका हा...नजर लावाल."
"प्रिया , नजर लावण्यासारखा देखणा नवरा आहे खरा तुझा.."
"ए समीक्षा...प्रियाचे मिस्टर बघ. "
लांबून येणाऱ्या एका मैत्रिणीला दुसरीने बोलावले.
लांबून येणाऱ्या एका मैत्रिणीला दुसरीने बोलावले.
"प्रिया, हे तुझे मिस्टर आहेत यांना तर मी आत्ताच बाहेर पाहिले. " समीक्षा म्हणाली.
प्रिया आश्चर्यचकित झाली.
हे कसे शक्य आहे असे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले.
हे कसे शक्य आहे असे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले.
"उगीच माझी मस्करी करू नका. ते ऑफिसला गेले आहेत .बिझी आहेत नाहीतर नक्की आले असते. "
प्रियाचा आवाज थोडा मंदावला.
प्रियाचा आवाज थोडा मंदावला.
"अगं खरंच आलेत... बघ जा... समीर आहे ना आपल्या कॉलेजमधला ...त्याच्याशी बोलत आहेत."
"काय समीर शी ?"
तिला अचंबा वाटला.
प्रिया उत्सुकतेने जायला निघणार इतक्यात तिला थांबवत तिची दुसरी मैत्रीण म्हणाली ,
तिला अचंबा वाटला.
प्रिया उत्सुकतेने जायला निघणार इतक्यात तिला थांबवत तिची दुसरी मैत्रीण म्हणाली ,
"बघा तरी लग्न होऊन दोन महिने झाले.. तरी नवऱ्याला बघायची उत्सुकता गेली नाही."
"काय ग, तुझ्या त्यांना ऑफिसात काम होतं ना? मग गं कसे आले ?"
"येणारच बायको शिवाय करमत नाही ना ..इतकी सुंदर गोड गोड बायको असेल तर त्यांना राहणार नाही ना. कच्चे धागे मे बंधे चले आये हे सरकार इसके ."
तिची हनुवटी पकडत एक मैत्रीण म्हणाली.
तिची हनुवटी पकडत एक मैत्रीण म्हणाली.
"जाऊ का आता?"
तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून होत होता.
तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून होत होता.
"जा.. जा ...त्यांना करमत नसेल तिकडे
उचकी लागेल उगीच ."
उचकी लागेल उगीच ."
प्रिया लगबगीने शेखरला शोधत बाहेर आली.
तर तिला दूरवर तिथे समीरशी बोलत असलेला शेखर दिसला.
तर तिला दूरवर तिथे समीरशी बोलत असलेला शेखर दिसला.
"समीरदादाची आणि ह्यांची ओळख कशी.... एकमेकांना खूप चांगले ओळखतात असे वाटत आहे. ...पण हे आले कसे ? ऑफिसमध्ये काम होते ना! फालतू गोष्टींसाठी वेळ नसतो ना ...मग आता कसा वेळ मिळाला?"
ती जवळ जाणार इतक्या दोघांचे तिच्याकडे लक्ष गेले. शेखर तिच्याशी गोड हसला .प्रियाला आकाश ठेंगणे झाले.
"हे प्रिया. इथे ये लवकर ." समीरने तिला हात दाखवला.
"हा शेखर तुझा नवरा आहे तू बोलली नाहीस ते ."
"समीर दादा तू कुठे विचारलेस?"
"हो तेही आहेच. हा तुझा नवरा माझा शाळेपासूनचा मित्र आहे....
बट एनीवे आय एम सो हॅप्पी फोर बोथ ऑफ यु. तुमची जोडी अगदी मेड फॉर इच अदर वाटत आहे. "
तिने चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिले तर तो ही तिच्याकडेच पाहत होता.
बट एनीवे आय एम सो हॅप्पी फोर बोथ ऑफ यु. तुमची जोडी अगदी मेड फॉर इच अदर वाटत आहे. "
तिने चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिले तर तो ही तिच्याकडेच पाहत होता.
ते तिघे बोलत असताना प्रियाची एक मैत्रीण आली.
"प्रिया तुला शलाकाच्या आईने बोलावले आहे. जीजू तुमच्या लाडक्या बायकोला थोड्यावेळासाठी घेऊन जाते हा ."शेखर कडे पाहत ती म्हणाली. त्याने होकार दिला.
"लाडक्या बायकोला कशाला म्हणायचे..."
प्रिया कुजबुजली.
प्रिया कुजबुजली.
"मग अजून काय म्हणू...सर्व कामे सोडून तुझ्यासाठी आलेत ना...मग तू त्यांची लाडकीच आहेस."
ती मैत्रीण मात्र मोठ्याने म्हणाली जे शेखर आणि समीर दोघांनीही ऐकले.
ती मैत्रीण मात्र मोठ्याने म्हणाली जे शेखर आणि समीर दोघांनीही ऐकले.
त्या गेल्यावर समीर म्हणाला ,
"शेखर काँग्रॅच्युलेशन ! हे अभिनंदन फक्त लग्नासाठी नव्हे तर एवढी चांगली बायको मिळाली त्यासाठी आहे."
( काहीसा गंभीर होत)
( काहीसा गंभीर होत)
" शेखर प्रिया मला तिचा भाऊ मानते या नात्याने मी तुला एक सांगतो, तिला दुखावू नकोस. मिहिकाला विसरून जा."
शेखर यावर काही बोलला नाही पण त्यांने समीरचा हात हातात घेऊन त्याला मानेनेच आश्वासन दिले.
काही वेळाने प्रिया तिथे आली. तिने छोटसं गुलाबाचं फुल शेखरच्या कोटाला लावले . ते नीट करायला तो हात वर उचलणार इतक्या प्रियाचे लक्ष त्याच्या हाताकडे गेले. त्याच्या हातावर रुमाल बांधला होता.
" हे काय कधी लागलं? मलम लावलं का? तिने पटापट शेखरच्या हातावरचा रुमाल काढला. तर त्याच्या बोटांवर चीर गेलेली तिला दिसली. ती घाबरली.
"काही औषधी लावले नाही का?" ती काळजीने म्हणाली .
"एवढं काही नाहीये थोडं लागलंय. "
त्याच्या बोलण्याकडे तिचे लक्ष कुठे होते...ती कावरीबावरी होऊन आजूबाजूला पाहत होती. इतक्यात तिला तिथे एक ओळखीचा मुलगा दिसला. तिने त्याला काहीतरी सांगितले. तसा तो गेला.
"नक्की काय लागले? काच लागली की अजून काही. इन्फेक्शन होईल ना..
तुम्ही त्यावर अँटिसेप्टिक लावलेलेही दिसत नाही. "
तिचा स्वर हळवा झाला होता.
तुम्ही त्यावर अँटिसेप्टिक लावलेलेही दिसत नाही. "
तिचा स्वर हळवा झाला होता.
तिने त्याच्या जखमेवरून हळुवार हात फिरविला. दुखत असेल ना.
मान किंचित हलवून तो तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. मन मात्र तिच्या नजरेत त्याच्यासाठीची काळजी पाहून तिला शरण गेले होते.
इतक्यात मघासचा मुलगा हातात फर्स्ट एड टूल बॉक्स घेऊन आला.
प्रियाने अँटिसेप्टिकने त्याची जखम साफ केली आणि त्यावर मलम लावून पट्टी बांधली.
शेखरला सकाळचा प्रसंग पाठवला तिला इतके लागून मी साधी तिची चौकशी केली नाही. माझी जखम पाहून किती कासावीस झालेय ही...
समीर मोठ्या कौतुकाने तिच्याकडे पाहत होता...त्याची नजर शेखरला पुन्हा पुन्हा सांगत होती की प्रियाचे तुझ्यावर खूप प्रेम आहे...तिला कधीच अंतर देऊ नकोस.
******
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
