प्रिया आज माझी भाग ३०
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया बेडशीट नीट करत होती व शेखर शर्टची बटणे लावत होता.
"आज संध्याकाळी एका पार्टीला जायचे आहे. "
शेखर म्हणाला.
शेखर म्हणाला.
"यायला उशीर होईल का ? प्रियाने विचारले.
"फक्त मी नाही... तुला सुद्धा यायचंय."
"मी कशाला?... माझी अडचण कशाला ...म्हणजे माझे तिथे कुणी ओळखीचे नसणार...आणि या आधी मी कुठल्या पार्टीला गेले नाही...मला सवय नाही..."
"अच्छा...म्हणजे मी रोज लग्नाला जात असतो का?... मी नाही आलो तुझ्यासाठी तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला ?"
"म्हणजे मला परतफेड करावे लागणार वाटतं."
हसून प्रिया म्हणाली.
हसून प्रिया म्हणाली.
"तयार रहा. संध्याकाळी मी ऑफिसवरून आल्यावर आपण जायचय. विचारणार नाहीस पार्टीला कुठे जायचे आहे ते?"
तिने विचारले नाही परंतु तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.
"तुला इतके दिवस जिला बघायचे आहे तिच्याकडे पार्टी आहे."
टाय नीट करीत आरशात पाहत तो म्हणाला.
"तिच्याकडे! मग मी उगीच नको. तुम्ही एकटेच जा. मी तिथे असले तर तुम्हालाही ..."
टाय नीट करीत आरशात पाहत तो म्हणाला.
"तिच्याकडे! मग मी उगीच नको. तुम्ही एकटेच जा. मी तिथे असले तर तुम्हालाही ..."
"मी संध्याकाळी येईन . तयार रहा."
तिच्या म्हणण्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत तो म्हणाला आणि आपली ऑफिस बॅग घेऊन बाहेर पडलादेखील.
तिच्या म्हणण्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत तो म्हणाला आणि आपली ऑफिस बॅग घेऊन बाहेर पडलादेखील.
*******
साडी नेसू की ड्रेस घालू?
तिथल्या हायफाय लोकांमध्ये माझे काय काम...शेखर आपल्या बरोबर मला का नेत आहेत?
संध्याकाळ होईपर्यंत हेच विचार तिच्या डोक्यात घुमत होते. सरतेशेवटी तिने तिचा एक पेस्टल शेड मधला अनारकली घालायचे ठरविले. सुमनताईना तिने पार्टीबद्दल सांगितले पण पार्टी कोणाकडे होती ते सांगणे तिने जाणीवपूर्वक टाळले.
काल जेव्हा त्यांना समजले की शेखर तिच्यासोबत लग्नाला गेला होता तेव्हा त्या भलत्याच खुश झाल्या होत्या. आपल्या मुलगा आणि सुनेमध्ये सर्वच आलबेल आहे असे त्यांना वाटत होते. तिला त्यांचा हिरमोड करायचा नव्हता.
संध्याकाळ झाली. तिला उगीच चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते.
त्याची वाट पाहत ती तयार होऊन बसली होती.
काय माहित कशी असेल ती? मी तिच्यापुढे कशी वाटेन ?माझ्यापुढे ती किती छान दिसते हे त्यांना मला दाखवायचे आहे का? आज तिच्यासमोर नेऊन माझी फजिती करण्याचा त्यांचा प्लॅन दिसतोय! तिथे गेल्यावर मी एकटी तर पडणार नाही ना! शेखर तिकडे गेल्यावर विसरून जातील मला. पुन्हा तिच्या मनात उलट सुलट विचार येऊ लागले.
******

एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या खुल्या मैदानात पार्टी ठेवण्यात आली होती. पार्किंग स्लॉट मध्ये BMW , M5, मर्सिडीज सारख्या एकापेक्षा एक महागड्या गाड्या पार्क होत्या.
शेखरने आपली बी एम डब्ल्यू पार्क केली आणि ती दोघं मिणमिणत्या दिव्यांच्या मांडवाखालून पार्टी झोन मध्ये शिरली .
पार्टी अगदी उच्चभ्र लोकांची वाटत होती. थ्री पिस घातलेली वयस्कर, मध्यमवयीन लोकं हातात वाइनचे ग्लासेस घेऊन सॉफ्ट टोन मध्ये एकमेकांबरोबर इंग्रजीमध्ये संवाद साधत होती. तर यँगस्टर्स वेगळा ग्रूप करून इंग्रजीतच एकमेकांची
मजा मस्करी करीत होती. वाटेत भेटणाऱ्या लोकांशी संवाद साधत शेखर एकदम सहज वावरत होता. पण या वातावरणाची अजिबात सवय नसलेली प्रिया खूप म्हणजे खूपच बावरलेली होती. तिला तिथे अगदीच ऑड मॅन आऊट वाटत होते.
तिथे उपस्थित असलेल्या स्त्रियांनी वेस्टर्न कपडे घातले होते. तरुणींनी तर मिनी स्कर्ट आणि बॉडी हगिंग ड्रेसेस घातले होते. प्रिया त्यात अगदीच वेगळी तरीही साजिरी दिसत होती. पण तिचं मन मात्र उदास होतं.
तिची नजर लांबवर फिरत होती ...आता कुठल्याही क्षणी ती दिसेल आणि शेखर तिच्याजवळ जातील ...बोलतील.... मला ते सहन होईल का? तसा तिचा स्वभाव जळकुटा नव्हता. द्वेष काय हे तिला माहीतच नव्हते. पण जिथे स्वतःच्या प्रिय व्यक्तीचा प्रश्न येतो तेव्हा कुठचीही स्त्री थोडीशी का होईना उदास होतेच. प्रियाचीही तीच अवस्था झाली होती. एका अनामिक भीतीने तिची छाती धडधडत होती. कसली भीती होती ही? इथल्या वातावरणाची की शेखरला गमावण्याची?
ती दोघेही जिथे यँगस्टर्सचा घोळका होता तिथे आले. त्यांना पाहताच जवळजवळ सर्वच जण अवतीभोवती जमले. काहीजण कुजबुज करू लागले.
"हे .... शेखर मेरिड हर... शी इज हिज वाइफ. "
"पण मिहिका आणि शेखरचे अफेअर होते ना."
"आणि शेखर हिला घेऊन इथे कसा...."
"आय वॉन्ट टू सी हाऊ शी विल रिॲक्ट व्हेन शी विल सी देम. "
उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. शेखर त्याच्या मित्रांबरोबर बोलण्यात बिझी होता पण प्रियाच्या कानावर मात्र ही कुजबूज पडत होती. ती अजूनच नर्व्हस झाली.
मध्येच त्याचे तिच्याकडे लक्ष जात होते . ती त्याच्या पेक्षा थोडी मागे उभी आहे असे लक्षात येताच त्याने तिच्या मागून कंबरेला अलगद विळखा घालीत तिला पुढे घेतले. त्याच्या ह्या छोट्याशाच कृतीने प्रिया शहारून गेली. आपल्या मित्रांबरोबर बोलताना देखील ती आपल्या बरोबर आहे याचे तो भान ठेवून होता.

इतक्यात एक सुंदर तरुणी तेथे आली. तिने उंची निळसर रंगाचा गाऊन घातला होता. रंग गोरा, रेखीव भुवया,गोड हास्य अशी ती तरुणी शेखरच्या समोर आली. प्रियाला तिला ओळखायला वेळ लागला नाही. खरंच किती सुंदर आहे ही !
क्रमशः
पुढील भाग लवकरच येईल. तुम्हाला जास्त प्रतीक्षा करायला लावणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा