Login

प्रिया आज माझी भाग ३३

Lovestory
प्रिया आज माझी भाग ३३

डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


मागील भागात :


" शेखर"
तिने झोपेतच त्याला हाक मारली.

"शेखर तुम्ही कुठे आहात...हा माणूस ..हा माणूस...शेखर."ती तळमळत म्हणत होती.

त्याने तिच्या आणि त्याच्यामध्ये असलेलं लोड खाली फेकले आणि तो तिच्या जवळ सरकला.

"शेखर..."

"मी आहे...तू आता शांत हो. " तो म्हणाला आणि त्याने तिच्या पाठीवर हात ठेवला.

एखाद्या लहान बाळासारखी ती त्याच्या कुशीत निजली.


आता पुढे वाचा .


त्याचे कपडे लॉन्ड्रीतून परत आले तेंव्हा ते नक्की नीट धुतले आहे का नाही हे पाहावे म्हणून तिने ते शर्ट नाकासमोर धरले...त्याचा गंध होता त्यात ..,..आताही तिला तसेच वाटले वाटले....त्याचा गंध ती घेत आहे...तिला हवाहवासा वाटणारा गंध....ती हसली....

"नाही...हे धुतलेले नाही....हे घेऊन जा..." ती लॉन्ड्रीवाल्याला म्हणाली....तिने त्याच्या टी शर्ट मध्ये हात घातला होता पण ते काही तिच्याच्याने उचलवत नव्हते....असे का म्हणून तिने आपले डोळे उघडले.... तर तिचा हात चक्क त्याच्या टी शर्ट मध्ये होता...आणि ती त्याच्या कुशीत...वर कहर म्हणजे त्याचे हात तिच्या पाठीवर विराजमान होते.

"बापरे.... काल रात्री आपण चक्क मावशी समजून शेखरच्या कुशीत शिरलो. " ती चक्रावली.

तिने त्याच्या टी शर्ट मधून आपला हात अलगद काढून घेतला.
तो अजूनही झोपलेला आहे याची तिने खात्री केली. तिच्या अंगावरचा त्याचा हात तिने महत्प्रयासाने त्याला कळणार नाही अशा रीतीने बाजूला ठेवला. बेडवरून अलगद बाजूला होत तिने ते लोड आधी होते तसेच रचून ठेवले. तसेच जाता जाता AC चे टेम्परेचर कमी करून त्याच्या अंगावर ब्लँकेट सरकवलें. सुट्टीच्या दिवशी शेखर सकाळी उठल्यावर पहिल्यांदा हेच करतो हे तिला माहीत होते.


तो अजून उठला नाही हे पाहून तिला हायसे वाटले.

काल आपण भावूक झालो त्या क्षणी त्यांनी आधार दिला होता...पण म्हणून काय लगेचच त्यांच्या कुशीत शिरायचे...एकतर लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यांनी अगदी निक्षून ते लोडचे पार्टीशन केले होते... ते जर उठले असते तर त्यांना काय वाटले असते?

त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहून ती साळसूदपणे अंघोळीला निघून गेली. ती बाहेर आली तेंव्हाही तो झोपूनच होता. तिने सुटकेचा निःश्वास टाकला.

म्हणजे आपण त्यांच्या जवळ झोपलो होतो हे त्यांना कळले नाही म्हणायचे.

ती रूममधून बाहेर जाणार इतक्यात आळोखे पिळोखे देऊन तो उठला.

"प्रिया..."

ती थांबली.

"हे माझे टी शर्ट लॉन्ड्रीत दे. माझ्या घामाचा वास येत आहे त्याला. "
तिचे डोळे विस्फारून मोठे झाले.
त्याने टी शर्ट काढले व तिला दिले. तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते.

"आणि ऐक...अजून एक काम आहे...ते तुझी नखे काप...माझ्या छातीवर व्रण उमटले आहेत."

त्याने टॉवेल घेतला आणि तो वॉशरुममध्ये जाणार इतक्यात ती म्हणाली,

"म... म... म..."

तो वळला. ती पूर्ण कधी बोलणार याची तो वाट पाहत होता पण तिची गाडी म वरच अटकली होती. टॉवेल खांद्यावर टाकत तो तिच्या जवळ आला.

"म च्या पुढे काय..."
त्याच्या डोळ्यांत मिश्किल भाव होते ती मात्र लाजेने आणि भीतीने कावरीबावरी झाली होती.

"माझी नखं तुम्हाला कशी लागतील?" हिंमत करून ती म्हणाली पण नजर मात्र दुसरीकडेच होती.

"तुझ्याशिवाय इथे या रुममध्ये दुसरे कोणी आहे का? "

तिच्याकडे उत्तर नव्हते.

त्याने तिचा हात हातात घेतला.

"काल रात्री ही जखम पाहत होतो ना तेंव्हा तुझ्या या नाजूक लांबसडक बोटांकडे आणि या नखांकडे माझे लक्ष गेले....तुझ्याशिवाय हे कोण करू शकत ?

आपल्या उघड्या छातीजवळचे व्रण दाखवत तो म्हणाला आणि तिच्या अजून जवळ गेला.
तिला आठवले आपण झोपेत लॉन्ड्रीत देण्यासाठी टीशर्ट काढत होतो तेव्हा त्यांच्या टीशर्ट मध्ये हात घातला होता...हे देवा मी अजून काही केले तर नाही ना...ती मनोमन देवाचा धावा करू लागली.

"मम मम मी काही नाही केले. ते ते.... मावशी..."

ती भांबावली. त्याच्याशी नजर मिळवायची हिंमत तिला होत नव्हती. काय बोलू तिला सुचत नव्हते. त्याने तिचे दोन्ही खांदे पकडले.


"रिलॅक्स...इट्स ओके . तू काही केले नाहीस....काल झालेच तसे होते... रात्री मी पाहिले तू झोपेत रडत होतीस...म्हणून मीच ते लोडचे पार्टीशन बाजूला केले आणि तुझ्या जवळ आलो... आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह यू कन्फर्ट. नथिंग एल्स. यामागे माझा वाईट विचार नव्हता... ट्रस्ट मी. "

"श sssssss...काही नका बोलू...माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. "
त्याच्या डोळ्यांत डोळे घालत ती म्हणाली. तिचा त्याच्यावर असलेल्या विश्वासाचे त्याला अप्रूप वाटले. तो तिच्याकडे पाहतच राहिला.

*********



क्रमशः

हा भाग लहान आहे पुढचा मोठा लिहायचा प्रयत्न नक्की करेन. कथेत अजून पुढे बरेच काही आहे. वाचत रहा. माझ्या कथा आवडत असतील तर मला फॉलो करायला विसरू नका.


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.