प्रिया आज माझी भाग ३४
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शेखरच्या ऑफिसमध्ये
तो कामात बिझी होता आणि त्याच्या मोबाईलवर मिहिकाचा कॉल आला. फोन व्हायब्रेटिंग मोड वर होता. त्याने इग्नोर केला पण पुन्हा तिचा कॉल आला. या खेपेसही त्याने दुर्लक्ष गेले. पण पुन्हा तिने तिसऱ्यांदा कॉल केला. त्याने चिडून फोन उचलला.
"मिहिका...मी बिझी आहे. "
"शेखर प्लीज फोन ठेवू नकोस. माझं ऐकून तरी घे. "
"काय ऐकून घेऊ? काल प्रिया माझ्याखातर पार्टीला आली होती. तिला यायचे नव्हते तरी मी जबरदस्तीने तिथे घेऊन आलो . तिथे तिचा इतका अपमान झाला....तुझे गेस्ट असे असतात का?"
"शेखर...ते पप्पांचे बेस्ट फ्रेंड आहेत...मला वाटते तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे...तिने तुला काहीतरी चुकीचे सांगितले. "
"मी स्वतः पाहिले...आता तुला यावर काय बोलायचे आहे?"
"अरे... ते ड्रंक होते, मे बी म्हणून त्यांना समजले नसेल..नाहीतर अशा गावंढळ मुलीकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नसते .... बेबी मला तुझी दया येते तू कसा तिच्यासोबत दिवस काढतोस."
"तिच्या अगेन्स्ट मी काहीही ऐकून घेणार नाही... शी इज माय वाइफ. "
"या...फॉर सिक्स मन्थस्. "
"नाही....कायमची. आमचे अग्नीच्या साक्षीने लग्न झाले आहे."
"आर यू किड्डिंग... काहीही... बेबी मला वाटते तू सध्या स्ट्रेस मध्ये आहेस म्हणून काहीही बोलत आहेस ... मी तुला नंतर कॉल करते. "
तिने फोन ठेवला...शेखरला पुढे काय बोलायचे होते हे तिला ऐकूनच घ्यायचे नव्हते.
*********
आजकाल शेखर ऑफिस मधून लवकर घरी येत होता शेखरच्या आईला मात्र त्याच्या मनपरिवर्तनाची जाणीव होत होते पण प्रियाला वाटत होते की तो अजूनही मिहिकामध्येच गुंतलेला आहे.
रात्रीचे दहा वाजले होते.
तो त्याच्या रूममध्ये बेडवर बसून लॅपटॉपवर आपले काम करण्यात गुंतला होता. प्रिया तिथे आली.
हल्ली तो तिच्याशी मोकळेपणाने बोलत असे. तो घरात असताना तिचे त्याच्याजवळ वावरणे त्याला आवडायचे. काम करताना तो मधूनच तिच्या नाजूक हालचाली टिपायचा. ती कधी फोनवर रिल्स बघता बघता स्वतःशीच हसायची तर कधी त्याचे वॉर्डरोब लावताना तिच्या आवडीचे एखादे गाणे मंद आवाजात गुणगुणत असायची. आताही ती वॉर्डरोबमध्ये त्याचे कपडे लावत होती. आणि तो मधूनच तिच्याकडे पाहत होता.....अचानक त्याचवेळी तिचे त्याच्याकडे लक्ष गेले....तो चलबिचल झाला आणि त्याच्या अशा पाहण्याने तिच्याही हृदयात चुळबूळ झाली.
तो त्याच्या रूममध्ये बेडवर बसून लॅपटॉपवर आपले काम करण्यात गुंतला होता. प्रिया तिथे आली.
हल्ली तो तिच्याशी मोकळेपणाने बोलत असे. तो घरात असताना तिचे त्याच्याजवळ वावरणे त्याला आवडायचे. काम करताना तो मधूनच तिच्या नाजूक हालचाली टिपायचा. ती कधी फोनवर रिल्स बघता बघता स्वतःशीच हसायची तर कधी त्याचे वॉर्डरोब लावताना तिच्या आवडीचे एखादे गाणे मंद आवाजात गुणगुणत असायची. आताही ती वॉर्डरोबमध्ये त्याचे कपडे लावत होती. आणि तो मधूनच तिच्याकडे पाहत होता.....अचानक त्याचवेळी तिचे त्याच्याकडे लक्ष गेले....तो चलबिचल झाला आणि त्याच्या अशा पाहण्याने तिच्याही हृदयात चुळबूळ झाली.
त्याने आपली नजर फेरली आणि तो पुन्हा आपल्या कामात गुंतला.
खुपवेळ वाकून काम केल्यामुळे त्याची मान दुखायला लागली होती. मान काहीशी मागे करून त्याने आपल्या हाताने मानेला आधार दिला. मानेत क्रॅम्प्स आल्यामुळे त्याने डोळे गच्च मिटले.
"इतकावेळ असे वाकून काम केलेत तर मान दुखणारच ना... दोन तास झाले तुम्ही काम करत आहात. मी आल्यापासून पाहतेय." ती जणू हक्कानेच बोलत होती.
"कोणाला ? मला? " त्याच्या डोळ्यांत मिश्किल भाव होते
ती लाजली.
"लाजाळूचे झाड" तिच्याकडे एकटक पाहत तो पुटपुटला.
"काय...काही म्हणालात का.?"
"हां...ते बामाची बाटली कुठे आहे... मान आणि डोके जाम दुखतेय. "
त्याने असे बोलायची खोटी तिने कपाटावरचा औषधांचा डबा काढला.
"मी लावू का?"
" हून. "
त्याने आपला लॅपटॉप साइडटेबलवर ठेवला व तो बेडवर डोळे बंद करून पडला. ती बेडवर त्याच्या बाजूला येऊन बसली आणि हातावर थोडा बाम घेऊन तिने त्याच्या डोक्यावर चोळला. तिची नाजूक बोटे त्याच्या कपाळावरून फिरत होती. त्याला खूप रिलॅक्स वाटत होते. पूर्ण दिवसभराचा ताण निघून गेला होता.
"प्रिया...तुझ्या बोटांमध्ये जादू आहे. "
डोळे मिटूनच तो म्हणाला.
"मावशीसुद्धा हेच म्हणते.. मी जिथे आधी काम करायची ना तिथे एक कलीग आहे... अश्विन... तो ही कायम हेच म्हणायचा. "
त्याने खाडकन डोळे उघडले. त्याच्या कपाळावर आठ्या आल्या.
"तुला अश्विनी म्हणायचे आहे का?"
"नाही...अश्विनच आहे त्याचे नाव...आम्ही दोघेही एकाच कॉलेजमध्ये होतो..त्याच्यामुळेच मला तिथे जॉब लागला होता."
"मग आता?"
"आता नाही ना जाऊ शकत....म्हणजे रिप्लेसमेनेट म्हणून करत होते ...तसा जॉब टेम्पोररीच होता. "
"मला म्हणायचे आहे की आताही तू टच मध्ये आहेस का?"
"नाही तिथलं फारसे माझ्या ओळखीचे नाही..."
'मठ्ठ आहे का ही! मी काय विचारतोय आणि ही काय सांगतेय. या सुंदर मुली अशाच असतात का...दुसऱ्यांदा अनुभव आलाय मला.'
तो आतल्या आत चरफडत होता.
तो आतल्या आत चरफडत होता.
"मी तुझ्या जॉबच्या इतर लोकांबद्दल म्हणत नाही."
"मग?"
"तो... घोडा... आय मीन अश्विन आहे ना....त्याच्याबद्दल म्हणतोय. " तो दातावर दात घासत बोलला.
"हो... मला नवीन जॉब शोधायला तोच मदत करतोय."
ती निरागसपणे बोलतच गेली. त्याने तिच्या जीवनाच्या ठेवणीतला सर्वात आवडता कप्पा उघडला होता. अश्विनला तिच्या आयुष्यात खूप विशेष स्थान होते....त्याबद्दल आपल्याला पुढे कळेलच. तूर्तास आपण या अश्विन मुळे शेखरच्या मनात उडालेले वादळ पाहुया.
'आहे कोण हा घोडा....आणि ही त्याच्याविषयी इतक्या आस्थेने का बोलतेय? तिच्यासाठी जॉब शोधतोय... '
त्याला एकामागून एक हादरे बसत होते.
तो उठून बसला.
"त्याच्याही डोक्यावर बाम लावला होता का?" त्याचे डोळे बारीक झाले होते आणि डोक्यावरची शीर तडतड उडत होती.
"नाही..." ती पटकन म्हणाली.
'ओह् गॉड... नशीब...'
"मग तुझ्या बोटात जादू आहे असे तो कधी म्हणाला?"
"माझ्याकडे एखादे डेटा फिडिंगचे काम आले की मी पटकन करायचेना... तेंव्हा तो म्हणायचा...तसा तो ही मला मदत करायचा...खूप चांगला आहे तो.
"तुम्ही असे उठून का बसलात?...तुमची मान सुद्धा दुखत आहे ना.....तिथेही बाम लावते. "
तिने बामची बाटली खोलली.
तिने बामची बाटली खोलली.
"त्याची काही गरज नाही...."
त्याच्या आवाजाचा टोणच बदलला होता.
त्याच्या आवाजाचा टोणच बदलला होता.
तो तिच्याकडे पाठ करून झोपला पण आतमध्ये ज्वाला उसळल्या होत्या .
"काय झाले.. काय चुकले का?माझी नखं लागली का?
पण ती तर मी आज सकाळीच काढून टाकली होती. "
पण ती तर मी आज सकाळीच काढून टाकली होती. "
'बहुतेक थकव्यामुळे झोप आली असेल.'
तिने स्वतःचीच समजूत काढली आणि नेहमीप्रमाणे दोघांमध्ये लोडचे पार्टीशन केले.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा