प्रिया आज माझी भाग ३५
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तो रागावून झोपला पण झोप लागेल तर शप्पथ!
या अश्विन नावाचे वादळ मेंदूमध्ये घौडदौड करत होते. प्रियाचे आणि त्याचे ज्या परिस्थितीत लग्न झाले ती थोडी वेगळीच होती. जी मुलगी आयत्यावेळी आपल्याशी लग्न करायला तयार होते तिच्याबाबत पझेसिव्ह राहण्याचा सवालच नव्हता ना...तिचे बाहेर कुठेही प्रेमसंबंध नव्हते किंवा तिच्या मागे असे कुणी नव्हते म्हणून ती माझ्याशी लग्न करायला तयार झाली या भावनेने तो आतापर्यंत बिनधास्त होता.
या अश्विन नावाचे वादळ मेंदूमध्ये घौडदौड करत होते. प्रियाचे आणि त्याचे ज्या परिस्थितीत लग्न झाले ती थोडी वेगळीच होती. जी मुलगी आयत्यावेळी आपल्याशी लग्न करायला तयार होते तिच्याबाबत पझेसिव्ह राहण्याचा सवालच नव्हता ना...तिचे बाहेर कुठेही प्रेमसंबंध नव्हते किंवा तिच्या मागे असे कुणी नव्हते म्हणून ती माझ्याशी लग्न करायला तयार झाली या भावनेने तो आतापर्यंत बिनधास्त होता.
हळू हळू का होईना ती त्याला आवडायला लागली होती. ती त्याला आयुष्यात हवीशी वाटत होते. तिचे आजुबाजूला वावरणे त्याला आवडत होते. मिहिकालाही रागात तो बोलून गेला होता की ती माझी पत्नी आहे तिच्या अगेन्स्ट मी काहीही ऐकून घेणार नाही, पण अजूनपर्यंत कुठल्याही ठाम निर्णयापर्यंत तो आला नव्हता...म्हणजे त्याने कुठल्या बाबतीत विचार केला नव्हता.
नाही म्हटले तरी अजून सहा महिने संपायला दिड महिना बाकी होता. ती लगेच थोडी जाणार आहे. अजून वेळ आहे म्हणून तो गाफील होता. पण आज तिने जेव्हा तिच्या मित्राबद्दल सांगितले तेंव्हापासून तो बैचेन झाला.....म्हणजे तिच्यावर संशयाने नाही तर तिच्यावर त्याचे मन जडत होते त्यामुळे..... तिला गमावण्याच्या भीतीने....त्याने तिच्याकडे पाऊल टाकायला सुरुवात केली होती किंबहुना तो आता मध्यापर्यंत येऊन पोहोचला देखील होता पण ती अजून त्याच्या भावनांच्या बाबतीत अज्ञान आहे हे त्याला कळून चुकले होते.
पण तिला कसे सांगायचे ...कुठून सुरुवात करायची...हे त्याला समजत नव्हते.
तू हवीशी मला.... तू हवीशी मला....
सकाळी ऐकलेले गाणे त्याच्या कानावर रूंजी घालू लागले.
सकाळी ऐकलेले गाणे त्याच्या कानावर रूंजी घालू लागले.
आताही त्याच्या बाजूला ती निश्चिंत होऊन पडली होती....आणि मध्ये ते लोडचे पार्टीशन.
ओह्...किती लोभस दिसतेय... एकदम निरागस....नुकत्याच उमललेल्या फुलासारखी....मी किती वाईट वागलो ...पण तरीही माझ्याशी वागताना तिने आपला चांगुलपणा अजिबात सोडला नाही. माझ्यावर किती विश्वास आहे तिचा.
तिने कुस वळवीत त्याच्याकडे पुढा केला आणि त्याने न राहवून त्याच्या आणि तिच्या मधले लोडचे पार्टीशन हाताने खाली ढकलले. तिच्या हातावर आपला हात ठेवत तो पुटपुटला ,
"माझी बाहुली..... मला तू हवी आहेस .... कायमची...मी तुझ्याशी जसा वागलो त्याबद्दल खूप खूप सॉरी. या पुढे मी तुला कधीच हर्ट करणार नाही. "
त्याने तिच्या हातावर आपले ओठ टेकवले. तिचा हात किंचीत शहारला...आणि ती झोपेतच हसली...एखाद्या लहान बाळासारखी...
ती सकाळी उठली आणि तिने पाहिले की लोडचे पार्टीशन खाली पडले होते....ती ते वर ठेवणार इतक्यात तो बेडवर उठून बसला...
"मीच काढले ते.... मला नकोय आता ते....म्हणजे तूच काल बोललीस ना की तुझा माझ्यावर विश्वास आहे.....आणि त्याशिवाय आता मलाही तुझ्यापासून खूप सेफ वाटतेय..."
तो मिश्किल हसत म्हणाला. यावर काय बोलू ते तिला सुचले नाही... डोळ्यातच हसत आपला टॉवेल आणि कपडे घेऊन ती वॉश रुममध्ये निघून गेली.
******
आज मकरसंक्रांत होती. तिची पहिली संक्रांत म्हणून सुमनताईंनी तिच्यासाठी काळी साडी, त्यावर रेडीमेड ब्लाऊज आणि हलव्याचे दागिने आणले होते. शेखर घरी नव्हता तो ऑफिसमध्येच होता. तो उशीरा येणार हे सांगण्यासाठी त्याने सुमनताईना फोन केला.
"हॅलो आई,"
"शेखर तुला शंभर वर्ष आयुष्य
...अरे सकाळी तू घाईघाईत गेलास त्यामुळे सांगायचेच राहिले...आज संक्रांत आहे ना."
...अरे सकाळी तू घाईघाईत गेलास त्यामुळे सांगायचेच राहिले...आज संक्रांत आहे ना."
"आई, ती तर दरवर्षी येते. "
"हो...पण या वर्षीची संक्रांत जरा वेगळी आहे. तुझ्या बायकोची पहिली संक्रांत आहे ना..ते सांगायला तुला फोन करणार होती इतक्यात तू फोन केलास...आज लवकर घरी ये. "
"आई पण तो तर बायकांचा कार्यक्रम असतो ना."
"हो पण तुझ्या बायकोला नटलेली बघायचे नाही का तुला? ..तू येशील तो पर्यंत कार्यक्रम झालेला असेल. तुमच्या दोघांचे फोटो काढायचे आहेत. "
त्याच्या डोळ्यासमोर पूजेच्या दिवशी सजलेली... हळदकुंकवाने कपाळ भरलेली प्रिया उभी राहिली.. किती सुंदर दिसत होती .
"अरे शेखर ऐकतोस ना..मग येशील ना. "
"हो आई.. येतोच. "
"अरे थांब... ऐक..येताना गजरे घेऊन ये. तिला मोगऱ्याचा गजरा खूप आवडतो. सुधाने सांगितले मला."
"हो आई."
त्याने फोन ठेवला...आणि सर्व कामांना पोस्टपोन करून त्याने घरची वाट धरली.
आजकाल त्याच्या कारमध्ये सुद्धा प्रियाला आवडणारी मराठी गाणी वाजत असत...मागे एकदा सुमनताईना आणि प्रियाला त्याने जेव्हा मंदिरात नेले होते तेव्हा त्याच्या कारमध्ये तिची आवडती गाणी ऐकून तिचे डोळे चमकले होते...कारण या आधी त्याच्या कारमध्ये तिने वेस्टर्न म्युझिक ऐकले होते. त्याच्यातला बदल तिला दिसत जरी होता तरी लग्नाच्या पहिल्या रात्री त्यांच्यात जे काही बोलणे झाले त्यावरून तरी तिला शेखरच्या मनात तिच्या बद्दल काही भावना असतील या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता.
वाटेत येताना त्याने तिच्यासाठी मोगऱ्याचे गजरे घेतले.
शीळ घालतच तो घरी आला. प्रिया आत तयार होत होती मनिषानेच दरवाजा खोलला.
सुधाकरने त्याच्या हातातली लॅपटॉपची बॅग घेतली आणि त्याने काढलेले बूट जागेवर ठेवले.
इकडे आत प्रिया सुमनताईंनी आणलेल्या रेडीमेड ब्लाउजची बटणे लावायसाठी झगडत होती....खाली काळा पेटीकोट वर ब्रा आणि ब्लाउजचे हात चढवून त्याचे हुक बंद करणारी ती...दरवाजा लॉक होता म्हणून त्याने आपल्याकडे असलेल्या चावीने बेडरूमचा दरवाजा खोलला. पण हुक लावण्यात मश्गूल असलेल्या प्रियाला तो आल्याची जराही कल्पना नव्हती. तसेही त्याच्याशिवाय या बेडरूममध्ये कोणीही यायचे नसे. आणि लॉक असल्यामुळे तो प्रश्नच नव्हता. शेखर तर यावेळेस ऑफिसमध्ये ....तो असा अचानक येईल असे तिला वाटले देखील नव्हते.
आता या वेळी कुठे लपू असे तिला झाले... पटकन वळायचे भानही तिला राहिले नाही. तिने घाबरून आपले दोन्ही हात वर क्रॉस घेतले.
"ओह् शीट .. आय ॲम सॉरी..." त्याने हात पुढे केला आणि आपली नजर दुसरीकडे केली.
तिच्या डोळ्यांत पाणी साठले...एक स्त्रीसुलभ भावनेने ती थिजली. जे इतकी वर्ष राखून ठेवले होते ते एका परपुरुषासमोर ....हो ...तो तिच्यासाठी परपुरुषच होता ना...असे उघडे पडले होते...जरी ती अंतर्वस्त्रांबर होती तरी कुठल्याही घरंदाज स्त्री साठी ही शरमेचीच बाब होती ना..
ती अजूनही त्याच जागेवर स्तब्ध उभी होती....चेहरा दुसरीकडे करीत तो पुढे आला आणि त्याने तिचे खांदे धरून तिला वळवले...
"आय ॲम सॉरी प्रिया... वेरी वेरी सॉरी. "
ती पाठमोरी उभी होती तरी ती रडत आहे हे त्याने जाणले.
खाली पडलेली साडी उचलत तो तिच्याजवळ आला आणि ती खोलून त्याने ती तिच्या अंगावर टाकली.
खाली पडलेली साडी उचलत तो तिच्याजवळ आला आणि ती खोलून त्याने ती तिच्या अंगावर टाकली.
आणि तिला स्वतःकडे वळविले.
ती खाली मान घालून उभी होती.. डोळे मात्र झरतच होते.
त्याने आपल्या बोटानी तिचा चेहरा वर केला.
"प्रिया...इथे बघ माझ्याकडे..."
तिची नजर तरीही खालीच होती.
त्याने पुन्हा तिचा चेहरा वर केला.
"तुला माझी शपथ आहे..."
तिने नजर त्याच्याकडे केली.
"हे बघ...तुझा माझ्यावर विश्वास आहे ना...मग समजून घे ना मला...मला नव्हते माहित तू कपडे बदलत होतीस ते...आय एम सॉरी. "
"नाही त्यासाठी नाही रडत..."
"मग का रडतेस...."
तिने पुन्हा मान खाली घातली आणि ती पुन्हा रडू लागली.
ती थरथरत होती.
ती थरथरत होती.
तिने न बोलताच तिला काय बोलायचे आहे ते तो समजला.
त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर आपले ओठ टेकवले.
"रिलॅक्स... काल्म डाऊन."
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
कथा कशी वाटत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा