प्रिया आज माझी भाग ३६
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
रिलॅक्स..... खरोखरच तसेच वाटत होते त्याच्या मिठीत . आजपर्यंत सुधामावशीशिवाय तिला कधी कोणीच जवळ घेतले नव्हते. लहानपणी तिच्या आईबाबांनी घेतले असेल पण ते तर आता विस्मृतीत गेले होते. एक वेगळाच धीर विश्वास होता त्याच्या मिठीत...मघाशी तो असा अचानक आला.....तिची लाज हरविल्यामुळे ती रडू लागली....तिच्यासाठी कुणीच नव्हता ना तो... वागतच होता तो तसा...अनोळख्यासारखा...पण आता त्याच्याच मिठीत इतके रिलॅक्स वाटत होते...सगळे जग एका बाजूला आणि त्याची मिठी दुसऱ्या बाजूला असे झाले असते तरीही त्याच्या मिठीचेच पारडे जड झाले असते.
मिहिका आणि तो जवळजवळ दोन वर्ष रिलेशनशिप मध्ये होते....पण अजूनपर्यंत त्याने तिला चुकूनही स्पर्श केला नव्हता...वाचायला थोडे वेगळे वाटते ना...आताच्या दुनियेत असे कुठे असते....पण काही काही मुले असतात अशी...आईच्या संस्कारात वाढलेली...स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू न मानणारी...आणि शेखर त्या गटात मोडणारा होता.
कधी कधी मिहिका त्याच्या अंगलटीस यायची पण तो तिला रोखायचा. ती त्याला आवडायची...तिच्याशी बोलायला त्याला आवडायचे...तिचा सहवास त्याला आवडायचा ...इथपर्यंतच होते सर्वकाही...त्याच्या पुढे कधी तो गेला नाही...आणि तिने जाऊ पाहिले तर प्रत्येकवेळेस त्याने रोखले. सुरुवातीला मिहिका त्याच्यावर रुसायची...इतर मुले आपल्या गर्लफ्रेंड बरोबर वागतात तसे त्याने तिला मिठीत घ्यावे , तिचे चुंबन घ्यावे अशी अपेक्षा ती करायची पण त्याने तिला कधी प्रतिसाद दिला नव्हता. कदाचित या वेगळेपणामुळे तो तिला अधिक आवडायचा.....त्यांच्या कॉलेजमध्ये त्याच्या या साधेपणामुळे किती मुली त्याच्यावर मरायच्या पण तो तिच्याशिवाय कुणाकडे कधी ढुंकूनही पहायचा नाही याचा तिला अभिमान वाटायचा.
याचे कारणच तसे होते. तो दहावीत असताना त्याच्या सख्या मावसबहिणीने आत्महत्या केली होती. पोस्टमार्टममध्ये समजले की तिला दिवस गेले होते. तिचा प्रियकर तिला दगा देऊन यू एसला निघून गेला होता... कायमचा... मरताना देखील तिने तिच्या सुसाइड नोट मध्ये तिचे त्याच्यावर प्रेम आहे हेच लिहिले होते. अदिती नाव होते तिचे....तो तिला अदिदि म्हणायचा...ती बहीण त्याच्या खूप जवळची होती. त्याला सख्खे भावंड कुणीच नव्हते...आणि ती ही आईवडिलांची एकुलती एक होती...रक्षाबंधनाला दरवर्षी ती त्याला राखी बांधायची. तिच्या जाण्याने त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता.
पण आज त्याच्या मिठीत असणारी ती ...कोणी गैर नव्हती
त्याची हक्काची बायको होती.
'तिला असेच मिठीत घेऊन राहु का...कायमचे '
तिच्याबाबतीत त्याने स्वतःला घालून ठेवलेल्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.... कदाचित लग्नात कानावर पडलेल्या सात वचनामुळे किंवा अग्निभोवती फेरे घेताना मंत्रांच्या मंगल उच्चारात साताजन्माच्या आणाभाका घेतल्या गेल्या असतील त्याच्यामुळे असेल...त्या सर्व सर्व गोष्टींपुढे लग्नाच्या पहिल्या रात्री आडवे आलेले त्या घटस्फोटाच्या कागदानी माघार घेतली होती.
हुंदका ओसरल्यावर तिने स्वतःला सावरले आणि भिजलेल्या डोळ्यांनी मान वर करून त्याच्याकडे पाहिले. तिच्या पाठीवर असणारी त्याच्या हातांची पकड अधिक गच्च झाली होती. तिच्या लांबसडक पापण्यांवर अश्रुथेंब अडकले होते...जणू गुलाबाच्या पाकळ्यांवरून निथळणारे दवबिंदू. त्या दवबिंदू ना टिपण्याचा मोह तो कसा नाकारू शकत होता.
त्याच्या नजरेतली ओढ तिला संमोहित करीत होती. त्याने आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणला आणि हळू हळू त्याच्या श्वासांच्या उबेने तिचे सर्वांग मोहरत होते. त्याने आपले ओठ तिच्या पापण्यांवर टेकवले...ही कसली वेगळीच अनुभूती होती...कधीच संपू नये अशी वाटणारी.
ती पापण्या मिटून त्याला समर्पित होत होती. तिने घेतलेला दीर्घ श्वास तिच्या समर्पणाची ग्वाही देत होता. त्याचा श्वास थोडा लांब गेला तेंव्हा तिने डोळे उघडले...त्याचे डोळे निश्चल होऊन तिलाच पाहत होते....जणू पुढे तो जे करणार होता त्याची संमती मागत होते. तिच्या श्वासातील गहिरे उतार चढाव तिचे थरथरणारे कंपित ओठ त्याला स्वतःकडे येण्यासाठी आकृष्ट करीत होते. गहिरे श्वास घेत त्याने आपले ओठ तिच्या ओठांजवळ नेले तसे तिने डोळे मिटले...सुखाचा हा परमोच्च क्षण तिला भरभरून अनुभवायचा होता .....त्याची विवाहिता म्हणून स्वतःला सोपवून द्यायचे होते त्याला.....पूर्णपणे....
ती पापण्या मिटून त्याला समर्पित होत होती. तिने घेतलेला दीर्घ श्वास तिच्या समर्पणाची ग्वाही देत होता. त्याचा श्वास थोडा लांब गेला तेंव्हा तिने डोळे उघडले...त्याचे डोळे निश्चल होऊन तिलाच पाहत होते....जणू पुढे तो जे करणार होता त्याची संमती मागत होते. तिच्या श्वासातील गहिरे उतार चढाव तिचे थरथरणारे कंपित ओठ त्याला स्वतःकडे येण्यासाठी आकृष्ट करीत होते. गहिरे श्वास घेत त्याने आपले ओठ तिच्या ओठांजवळ नेले तसे तिने डोळे मिटले...सुखाचा हा परमोच्च क्षण तिला भरभरून अनुभवायचा होता .....त्याची विवाहिता म्हणून स्वतःला सोपवून द्यायचे होते त्याला.....पूर्णपणे....
क्रमशः
भाग थोडा छोटा आहे पण आजच्यासाठी इतकेच ...नवीन भाग लवकरच पोस्ट करेन
कथा कशी वाटत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.
कथा कशी वाटत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा