प्रिया आज माझी भाग ३७
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
पण पुढच्याच क्षणी त्याला आपण मर्यादा ओलांडत असल्याची जाणीव झाली. ती त्याची पत्नी होती...अग्निभोवती त्याने तिच्यासोबत फेरे घेतले होते हे सर्व बरोबर होते, पण त्याचे आणि तिचे नाते पुढे नेण्याआधी त्याला तिच्यासाठी त्याला वाटणाऱ्या आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. ती या क्षणासाठी नाही तर आयुष्यभरासाठी हवी होती त्याला. आता या क्षणी तिला भावनिक आधाराची गरज होती ..जी त्याने दिली होती. पण त्यात त्याने स्वतःचा शारीरिक स्वार्थ साध्य केला असता तर तिच्या मनात त्याच्याबद्दल चुकीची भूमिका वटली असती.
त्याला स्वतःला तिच्यावर उगीच लादायचे नव्हते. आपण कुठल्याही प्रकारे तिचा फायदा घेतोय असे तिला वाटून द्यायचे नव्हते.
आयुष्यात तिच्याबरोबर पुढे जाण्याआधी ते घटस्फोटाचे पेपर तिच्या डोळ्यासमोर फाडून टाकायचे होते....आणि तिला ठामपणे सांगायचे होते की तू माझी आहेस ...आणि मी तुझा आहे.
तो थांबला.
तिच्या पाठीवरची त्याची पकड ढिली झाली तसे तिने डोळे उघडले...त्याने तिच्या पाठीवरचे हात काढले आणि तो दोन पाऊले मागे सरकला.
तिच्या पाठीवरची त्याची पकड ढिली झाली तसे तिने डोळे उघडले...त्याने तिच्या पाठीवरचे हात काढले आणि तो दोन पाऊले मागे सरकला.
"मी मी...बाहेर जातो...तू तयार हो."
तो बाहेर निघून गेला. ती मात्र अजूनही त्याच जागेवर स्तब्ध उभी होती...
'आपल्या हृदयाचा ठाव घेऊन ते असे मधूनच का निघून गेले....त्यांना मिहिकाची आठवण आली का?..'
ती स्वतःवरच हसली. तिला कीव आली स्वतःची.
'किती वेडी आहेस तू ....त्यांच्याबरोबर स्वतःला वहावत नेलेस...आधीच ते समजतात की तू उपटसुंभ आहेस .... उपटसुंभासारखी आयत्यावेळेस दुसऱ्याच्या जागी लग्नाला उभी राहिलीस आणि आता पुन्हा जे सुख मिहिकाच्या नशिबात आहे ते घेण्यासाठी त्यांच्याबरोबर स्वतःला वाहवत नेलेस.
तिचे दुसरे मन म्हणत होते,
पण माझे ठीक आहे..त्यांनी आपला संयम कसा सांडला...जर असे दूर सारायचे होते तर ते का माझ्याजवळ आले?...काही क्षणांसाठी सुखाच्या आशा पल्लवित केल्यावर मग असा मनाचा कुस्कर करून का गेले?
प्रिया आता बस झाले...लवकर हालचाल कर...तुझा इथला मुक्काम संपायची वाट पाहत बसू नकोस..कसलीच वेडी आशा मनात बाळगू नकोस . तुला त्रास होईल...आणि त्यांनाही तुझ्यात अडकवू नकोस...'
*******
ती तयार होऊन बाहेर आली. काळी साडी त्यावर हलव्याचे पांढरेशुभ्र दागिने , चेहऱ्याला साजेसा असा मेकअप नेहमीप्रमाणेच गोजिरी दिसत होती ती...पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी सारखे चैतन्य नव्हते.
"प्रिया...अगं शेखर आला होता ना....रुममध्ये नाही का तो? त्याला येताना गजरा आणायला सांगितला होता. आता काही वेळात बायका येतील. गजऱ्याशिवाय शृंगार अपुरा ठरतो. त्याला बोलव पाहू. "
"साहेब मगाशीच खाली गेले. "
सुधाकर म्हणाला.
सुधाकर म्हणाला.
सुमनताईंनी त्याला फोन लावला.
"अरे शेखर आता या वेळी खाली कशाला गेलास ...तुला गजरा आणायला सांगितले होते तो आणलास ना?"
सिगारेटच्या धुरात हरवलेल्या शेखरला आईचा फोन आल्यावर खिशातील गजऱ्याची आठवण झाली.
तिला कसे फेस करायचे याचे दडपण जितके तिला होते तितकेच त्यालाही होतेच.
तो घरी आला तेंव्हा ती सुमनताई शेजारी सोफ्यावर तयार होऊन बसली होती. त्याने ज्याक्षणी पाऊल ठेवली त्याक्षणी तिची चलबिचल झाली. सुमनताईच्या चाणाक्ष नजरेने ते हेरले.
घरी येईपर्यंत तिला कसे फेस करावे याचा प्रश्न त्याला सतावत होता पण वर आल्यावर पाहतो तर मॅडम स्वतःच नजर चोरून बसल्या होत्या. त्याचे काम सोपे झाले...त्याचीं नजर तिच्या सौंदर्य न्याहाळण्यात गुंतली ...दिसतच होती ती तशी. नाकात मोत्यांची नथ, कपाळावर चंद्रकोर आणि ओठावर लालचुटुक लिपस्टिक ...त्याची...फक्त त्याची बायको.
"शेखर... अरे तुझीच आहे ती .... मग निवांत न्याहाळ तिला...आता आधी तो गजरा तिच्या केसात माळ. "
तो ओशाळला. बाजूलाच उभी असलेली मनिषा सुधाकरकडे पाहून खुदकन हसली. सुधाकरला शेखरच्या रागाचा सामना करायचा नव्हता म्हणून तो तिथून निसटून बाल्कनीत गेला आणि तिथे उगीचच झाडांना गोंजारू लागला.
"आई...काहीही काय बोलतेस....".
"अरे मग बघतच होतास असा...हो ना गं मनिषा.."
"मावशी....आज वहिनी दिसतच आहेत तशा..अगदी बघत राहण्यासारख्या.... बिचारे साहेब तरी काय करतील"
तोंडावर हात ठेवून फिदीफिदी हसत मनिषा म्हणाली.
तोंडावर हात ठेवून फिदीफिदी हसत मनिषा म्हणाली.
"मनिषा...आईची साथ मिळाल्यावर तू जरा जास्तच बोलायला लागलीस असे नाही वाटत."
नेहमी चिडकी प्रतिक्रिया देणाऱ्या शेखर कडून मनिषाला इतक्या मवाळ प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. ती चकित झाली.
" मावशी, खरोखरच वहिनीनी जादूच केली आहे म्हणायची."
प्रियाची नजर मात्र पायातल्या जोडव्यांवर स्थिरावली होती.
त्याच्याशी नजर मिळविण्याचे धाडस काही तिने केले नाही...डोक्यात मघाशी त्याच्याबरोबर घालवलेल्या क्षणांची आठवण फेर धरून नाचत होती आणि ते आठवून मन अजूनच शरमेने पाणी पाणी होत होते.
त्याच्याशी नजर मिळविण्याचे धाडस काही तिने केले नाही...डोक्यात मघाशी त्याच्याबरोबर घालवलेल्या क्षणांची आठवण फेर धरून नाचत होती आणि ते आठवून मन अजूनच शरमेने पाणी पाणी होत होते.
"शेखर...आता ये आणि तिला गजरा घाल. तोपर्यंत मी वाण आणि इतर सामान बाहेर आणून ठेवते.
सुधाकर, ये जरा मला मदत कर. "
सुधाकर, ये जरा मला मदत कर. "
सुमनताई आणि सुधाकर आत किचनमध्ये निघून गेले.
शेखरने आपल्या खिशातला गजरा काढला आणि हळू हळू पाऊले टाकीत तो तिच्या दिशेने येऊ लागला. ती झुकलेल्या नजरेने तिच्या दिशेने येणारी त्याची पाऊले पाहत होती. आता कुठल्याही क्षणी तो जवळ येईल आणि.....
विचार करून तिच्या हृदयाची धडधड वाढली....तिच्या केसात कोणाचेतरी हात स्थिरावले ...तिने डोळे गच्च मिटले...गजरा लावताना लावलेली पिन तिच्या डोक्यात खुपली तसे तिने डोळे उघडले...तर तो समोर उभा होता... त्याला कुणाचा तरी फोन आला होता...त्यावर बोलत बोलत तो आत बेडरूममध्ये गेला.
विचार करून तिच्या हृदयाची धडधड वाढली....तिच्या केसात कोणाचेतरी हात स्थिरावले ...तिने डोळे गच्च मिटले...गजरा लावताना लावलेली पिन तिच्या डोक्यात खुपली तसे तिने डोळे उघडले...तर तो समोर उभा होता... त्याला कुणाचा तरी फोन आला होता...त्यावर बोलत बोलत तो आत बेडरूममध्ये गेला.
हे इथे मग मागे कोण?
तिने वळून पाहिले....मागे मनिषा उभी होती. तिला गजरा लावायला तो येतच होता इतक्यात त्याच्या फोनवर कोणाचा तरी महत्त्वाचा कॉल आला तसा त्याने गजरा मागे उभ्या असलेल्या मनिषाकडे दिला आणि तो तिथून निघून गेला...
तिने वळून पाहिले....मागे मनिषा उभी होती. तिला गजरा लावायला तो येतच होता इतक्यात त्याच्या फोनवर कोणाचा तरी महत्त्वाचा कॉल आला तसा त्याने गजरा मागे उभ्या असलेल्या मनिषाकडे दिला आणि तो तिथून निघून गेला...
तिचा हिरमोड झाला... मघासपर्यंत तो गजरा लावणार म्हणून ती संकोचली होती पण आता त्याने तो नाही माळला म्हणून ती हिरमुसली.
खरंच ते म्हणतात ना एकवेळ गुलबकावलीच्या फुलाचा शोध लागेल पण बायकांच्या मनाचा थांगपत्ता
कुणालाच लागणार नाही.
खरंच ते म्हणतात ना एकवेळ गुलबकावलीच्या फुलाचा शोध लागेल पण बायकांच्या मनाचा थांगपत्ता
कुणालाच लागणार नाही.
क्रमशः
कथा कशी वाटत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. माझे लिखाण आवडत असल्यास मला फॉलो करायला विसरू नका.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा