प्रिया आज माझी भाग ४2
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तो हॉस्पिटल मध्ये पोहोचला. ती डॉक्टरांच्या केबिनबाहेर शून्यात नजर टाकून बसली होती. तो हळू हळू तिच्या दिशेने चालू लागला... त्याच्या अस्तित्वाने तिच्या चेतनसंस्था जणू जाग्या झाल्या आणि तो येत असलेल्या दिशेने तिने पाहिले..
त्याला पाहून तिला झालेला आनंद आणि त्याचबरोबर ती सध्या ज्या परिस्थितीतून जात होती त्याचे दुःख.....ती उठून उभी राहिली. त्याच्याकडं एकटक पाहत. तो वेगात चालत तिच्याजवळ आला.
त्याला पाहून तिला झालेला आनंद आणि त्याचबरोबर ती सध्या ज्या परिस्थितीतून जात होती त्याचे दुःख.....ती उठून उभी राहिली. त्याच्याकडं एकटक पाहत. तो वेगात चालत तिच्याजवळ आला.
काही न बोलता त्यानं सरळ तिला मिठीत घेतले तशी ती रडू लागली.
शब्दावाचून कळले सारे
हेलकावे तुझ्या मनाचे
तुझ्या हृदयाच्या आर्त भावना
दर्द गहिरे तुझ्या मनाचे
त्या दोघांना संवादाची गरजच नव्हती..तिच्या हुंदक्यांनी सर्व कथा सांगितली होतों आणि त्याच्या हृदयाने ती ऐकली होती. त्याच्या स्पर्शाने तिला आश्वस्थ केले. त्याने तिच्या डोक्यावर हळुवार थोपटले.
"सर्व ठीक होईल. "
तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले.
हुंदके ओसरले जरी होते तरी डोळे झरतच होते.
हुंदके ओसरले जरी होते तरी डोळे झरतच होते.
"डॉक्टरांनी काय सांगितले. "
तिला मिठीतच घेऊन त्याने विचारले.
तिला मिठीतच घेऊन त्याने विचारले.
तिच्याच्या अश्रुंचा वेग वाढला.
"शेखर... मावशीला हार्ट अटॅक आला आहे . तिचे हार्ट फक्त चाळीस टक्के काम करीत आहे. डॉक्टरांनी अँजिओग्राफी करायला सांगितली आहे. पण तिचे हृदय कमजोर आहे ना त्यामुळे ते करणे सुद्धा रिस्की आहे पण तेवढेच गरजेचे आहे. मला काही सुचत नाही...मावशीला काय झाले तर माझे काय होईल?"
"शु...काहीही होणार नाही.. अगं ECG इको सारखेच असते तर...तू इतके टेन्शन घेऊ नकोस. त्यांनी suggest केले आहे म्हणजे ते करणे गरजेचेच असेल ना. आणि पुढे किती रिस्क आहे हे सांगणे त्यांचे कामच आहे."
त्याने तिची समजूत घातली त्यामुळे ती तयार झाली.
काही तासातच सुधामावशीची अँजिओग्राफी झाली.
डॉक्टरांनी त्यांना सांगितले की मेजर ब्लॉकेजेस असल्यामुळे बायपास हाच एक ऑप्शन होता. पण मावशीचे हार्ट कमजोर असल्यामुळे ती फार मोठी रिस्क होती. त्यासाठी आधी हार्टची कार्यक्षमता वाढवणे गरजेचे होते.
डॉक्टरांनी त्यांना सांगितले की मेजर ब्लॉकेजेस असल्यामुळे बायपास हाच एक ऑप्शन होता. पण मावशीचे हार्ट कमजोर असल्यामुळे ती फार मोठी रिस्क होती. त्यासाठी आधी हार्टची कार्यक्षमता वाढवणे गरजेचे होते.
"खरेतर एक सर्जन म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून मी तुम्हाला एक सजेस्ट करू इच्छितो....माझ्या माहितीत एक नेचरोपथी केंद्र आहे. तिथे साधारण सहा महिने राहावे लागते. आयुर्वेदिक उपचार पद्धती , योगासने इत्यादी गोष्टींमुळे बऱ्याच केसेस मध्ये सुधारणा होताना दिसली आहे. या आधी बरेचसे पेशंट तिथे ट्रीटमेंट घेऊन आले आहेत. त्यानंतर आम्ही त्यांची यशस्वी बायपास सर्जेरी केली आहे.
पण चॉईस तुमची आहे.
तुम्हाला पेशंटची याच अवस्थेत सर्जरी करायची असेल तरी ठीक आहे. आम्ही त्या ही गोष्टीला तयार आहोत."
पण चॉईस तुमची आहे.
तुम्हाला पेशंटची याच अवस्थेत सर्जरी करायची असेल तरी ठीक आहे. आम्ही त्या ही गोष्टीला तयार आहोत."
शेखरने आणि प्रियाने या गोष्टीवर विचार केला ते याबाबतीत मावशीशी बोलले. ती तयार झाली. प्रियालाही ते योग्य वाटले. डॉक्टरांनी सांगितले म्हणून सुद्धा आणि दुसरे म्हणजे तिला माहीत होते की तिच्या मावशीला आता पूर्ण आरामाची गरज आहे त्याशिवाय तिला तणावमुक्त वातावरणाची सुद्धा गरज होती जे मामीच्या स्वभावामुळे घरी शक्य झाले नसते.
शेखरने त्याच शहराच्या आसपास असणारे बेस्ट नेचरोपथी केंद्र शोधले. आणि दुसऱ्याच दिवशी मावशीला घेऊन तो आणि प्रिया तिथे गेले.
'शांतीनिकेतन नेचरोपथी केंद्र'
ते नावाप्रमाणेच होते. शहरापासून दूर... मोकळे वातावरण चहूबाजूला विविध फळांची झाडे ,स्वच्छ परिसर...तिथे विविध आयुर्वेदिक वनस्पतींची झाडे झुडपे होती. प्रत्येक वनस्पतीच्या बाजूला तिचे नाव आणि तिचा औषधी उपयोग असणारा फलक लावला होता. बाजूलाच वॉटर डिस्टिलीशन प्लांट होता. बहुतेक त्या पाण्याचा उपयोग ट्रीटमेंट साठी केला जात असावा असे तिला वाटले. केंद्रापासून जवळूनच एक लहानशी बारा महिने पाणी असणारी नदी वाहते असे त्या केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ते ऐकून मावशीला तर फारच उत्साह वाटला.
"मला वाटते माझे अर्धे दुखणे हे वातावरण पाहूनच निघून गेले."
"हो पण तरीही तुम्हाला सहा महिने इथे राहावं लागणारच.
ते ही कुटुंबापासून अलिप्त राहून. इथे मोबाइल वापरायला मनाई आहे. नाहीतर सकाळी आम्ही इथे उपचार करायचो आणि रोज संध्याकाळी तुमची ही मुलगी (प्रियाकडे पाहत)तुम्हाला तक्रार करायची की माझ्या सासूने असे केले मग तुमचे ब्लडप्रेशर पुन्हा जैसे थे..."
तिथले मॅनेजर दीक्षित सर मस्करीत म्हणाले.

"ते तर शक्यच नाही..तिची सासू माझी बेस्ट फ्रेंड आहे. "
सुधामावशी म्हणाली.
सुधामावशी म्हणाली.
"मग तुमच्या या जावयाने त्रास दिला...किंवा त्याने काही तक्रार केली तर..."
शेखरकडे पाहत ते मिश्कीलपणे म्हणाले.
शेखरकडे पाहत ते मिश्कीलपणे म्हणाले.
"नाही हो.
दोघांचाही एकमेकांवर खूप जीव आहे...ते तर अगदीच अशक्य आहे. "
शेखरने प्रियाकडे पाहिले. मावशी जे म्हणत होती त्याची स्वीकृती तो नजरेने देत होता.
"अच्छा म्हणजे अगदी आदर्श सासर मिळालेय तिला असे दिसतेय... तरीही तुम्हाला मोबाईल मिळणार नाही. गरज लागलीच तर आम्ही तुम्हाला कॉल करूं..पण तशी वेळच येणार नाही. इतक्या त्या या वातावरणात रमून जातील. अहो काही पेशंट इथे अजूनही स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. तुम्हालाही तसेच वाटेल पहा. इथले डॉक्टर एस आर देशपांडे ते काहीं वेळातच इथे येतील आणि तुम्हाला कशा पद्धतीचे उपचार मिळतील हे सांगतील. "

देशपांडे नाव ऐकून प्रियाने चमकून मावशीकडे पाहिले. तिच्याही चेहऱ्यावर चमक होती.
" डॉक्टरांचे पूर्ण नाव काय? "प्रियाने विचारलें
"अच्छा तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती हवी आहे का..... डॉक्टर देशपांडे एम डी आहेत. परदेशात आणि भारतातील अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी नेचरोपथीवर सखोल अभ्यास केला आहे. अमेरिकेतील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ नॅचरल मेडिसीन येथे त्यांनी आपले शिक्षण घेतले आहे. शिवाय देश विदेशात त्यांना लेक्चरसाठीही बोलावण्यात आले आहे. "
"That's good. "
शेखर डॉक्टरांचे स्किल ऐकून प्रभावित झाला.
शेखर डॉक्टरांचे स्किल ऐकून प्रभावित झाला.
"हो...चांगलेच आहे....पण मी मघाशी त्यांचे पूर्ण नाव विचारले."
"श्रीराम राजेश देशपांडे."
"म.. मला इथे राहायचे नाही. "
सुधामावशी खुर्चीवरून उठली.
सुधामावशी खुर्चीवरून उठली.
त्यांच्यात अचानक झालेला बदल पाहून प्रिया सोडून तिथं उपस्थित असणारे सर्वच त्यांच्याकडे पाहू लागले.
"मावशी काय झाले?"
"नाही..मला इथे राहायचे नाही...प्रिया चल...आपण घरी जाऊया. "
"अहो मॅडम... डॉक्टर येतच असतील...एकदा त्यांच्याशी बोला मग ठरवा. "
मावशीला तिथे एक क्षणही थांबायचे नव्हते. ती उठली आणि केबिनच्या बाहेर जाण्यासाठी ती दरवाजाजवळ आली मात्र तिची पाऊले तिथेच थबकली.
डॉक्टर फोनवर बोलत येत होते. त्यांचे सुधामावशीकडे लक्ष गेले आणिं त्यांचीही पाऊले थांबली.
मावशीने त्यांना पहायचे टाळले आणि त्यांच्या बाजूने ती पुढे जाऊ लागली...तिच्यामागे प्रिया होती.
"सुधा...."
डॉक्टरांनी हाक मारली तशी मावशी जागेवरच थांबली.
"सुधा..."
ते तिच्याजवळ गेले.
"मी श्रीराम...कुमुद आजीकडे यायचो... आठवतेय?"
तेवढी एकच गोष्ट तर विसरता येत नाही ना...
मावशी मनात म्हणाली.
मावशी मनात म्हणाली.
शेखर प्रियाजवळ आला...त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.
"आपण आत बसून बोलूया का? प्लीज."डॉक्टरांनी विनंती केली.
त्यांनी बाजूला होत केबिनमध्ये जाण्यासाठी सुधाला वाट करून दिली.
प्रियाने मावशीला आत जाण्यासाठी विनवले. क्षणभर विचार करून ती आत निघून गेली आणि त्यामागे डॉक्टरही गेले.
"प्रिया चल आपणही त्यांच्यासोबत जाऊया....."
"नाही शेखर...ते नुसते डॉक्टर नाहीत...मावशीचे पहिले आणि शेवटचे प्रेम आहे ते... चला तिथे बसूया..मी तुम्हाला सर्व सांगते. "
ती दोघं पेरूच्या झाडाखाली ठेवलेल्या बाकड्यावर जाऊन बसले. प्रियाने शेखरला मावशीची अव्यक्त प्रेमकहाणी सांगितली.
"अच्छा...म्हणून त्यांनी लग्न केले नाही तर."
"हो. प्रेम एकदाच होते ना. "
प्रिया खिन्न होऊन म्हणाली.
प्रिया खिन्न होऊन म्हणाली.
एक कर्मचारी तेथे आला.
"आपण प्रिया मॅडम ना?"
"हो."
"डॉक्टर साहेबांनी आपल्याला बोलावलेय. "
"शेखर मी आलेच. "
प्रिया डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. मावशी रुमालात तोंड खुपसून रडत होती.
आणि डॉक्टर हतबलपणे त्यांनाच पाहत होते. त्यांच्याही डोक्यांत अश्रू दाटलेले होते. प्रियाला पाहताच त्यांनी स्वतःला सावरले व प्रियाला बसायला सांगितले. त्यांनी आपल्या समोरील पाण्याचं ग्लास मावशी समोर धरले.

"सुधा...पाणी पी..तुला बरे वाटेल. "
प्रियाने आपल्या मावशीच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला पाणी पाजले.
"मावशी बरे वाटत नाही का."
"तिला थोडा वेळ घेऊ दे. तिला जे काही समजले आहे त्यातून तिला सावरू दे."
श्रीराम म्हणाले.
श्रीराम म्हणाले.
"डॉक्टर नक्की काय झाले?"
"नक्की कुठून सुरुवात करू तेच समजत नाही. "
"तिला माझी कहाणी ठाऊक आहे..."
डोळे पुसत हलके हसत सुधामावशी म्हणाली. तिला हसलेले पाहून प्रियालाही आनंद झाला.
डोळे पुसत हलके हसत सुधामावशी म्हणाली. तिला हसलेले पाहून प्रियालाही आनंद झाला.
"अच्छा तर तुला सर्व माहीत आहे तर...पण तुला तर फक्त तिचे version माहित असेल ना.. मग आता माझ्याबद्दल सांगतो. पण त्याआधी जावयांना सुद्धा आत बोलाव...त्यांनाही सर्व समजले पाहिजे."
तिने शेखरला फोन लावला. काही सेकंदात तो तिथे आला आणि प्रियशेजारी बसला.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा