प्रिया आज माझी भाग ४३
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
श्रीराम देशपांडे सांगू लागले.
मी दहावी पास झालो. पुण्यातल्या प्रतिष्ठित अशा फर्ग्युसन कॉलेज मध्ये माझे ऍडमिशन झाले. माझ्या घरापासून काही अंतर चालत गेल्यावर पुढे मुख्य रस्ता यायचा. बाबा मला त्यांच्या स्कूटरने मुख्य रस्त्यापर्यंत सोडायचे आणि तिथून मी स्टेट ट्रान्सपोर्टची बस पकडून कॉलेज गाठायचो.
एके दिवशी बाबांची स्कूटर बंद पडली. मी पायी जायचे ठरविले. काही अंतर चालून पुढे आलो आणि माझ्या अंगावर पाण्याचे तुषार पडले... हे पाण्याचे शिंतोडे एका घराच्या कुंपणामधून बाहेर येत होते..कोणी तरी कुंपणालगत लावलेल्या झुडूपांवर शिंपण करीत होते. कुतुहलाने मी आत डोकावून पाहिले.
साधारण माझ्याच वयाची एक सुंदर तरुणी झुडूपांवर पाण्याची शिंपण करीत होती... उजळ रंग...सुंदर बांधा केसांचा वर बांधलेला बन...त्यातून काही बाहेर आलेले भुरभुरणारे केस... एकदम साधी ...मी मंत्रमुग्ध झालो.
कॉलेजमध्ये गेल्यावर देखील तीच डोळ्यांसमोरून येत होती. मला कॉलेज सुटण्याचे वेध लागले होते...पुन्हा तिच्या घरासमोरून जायचे होते...तिला बघण्यासाठी...पण येताना ती दिसली नाही.
कॉलेजमध्ये गेल्यावर देखील तीच डोळ्यांसमोरून येत होती. मला कॉलेज सुटण्याचे वेध लागले होते...पुन्हा तिच्या घरासमोरून जायचे होते...तिला बघण्यासाठी...पण येताना ती दिसली नाही.
मग माझा नित्यक्रम झाला...रोज सकाळी त्याच वेळेस घराबाहेर पडायचे...तिची वेळ गाठण्यासाठी...ती असायची...मी तिथेच घुटमळायचो. कधी बुटाची नॉट ठीक करायचो. कधी कपड्यावर न लागलेली धूळ झाडायचो. कधी कधी तिचे लक्ष जायचे. मी मात्र दुर्लक्ष करून पुढे जायचो. चोरी पकडली जायची भिती होती.
एक दिवस असाच मी तिच्याकडे पाहत पाहत पुढे जात होतो. तितक्यात माझ्या समोर एक आजी आल्या. माझे लक्ष नव्हते आणि नेमका माझा धक्का त्या आजींना लागणारच होता इतक्यात मी मागे झालो पण त्या आजी मात्र धडपडून पडल्या आणि त्यांच्या परडीतली सर्व फुले धुळीत मिळाली. मला फार वाईट वाटले. माझ्यामुळे त्यांची मेहनत वाया गेली होती. मी त्यांना उठायला मदत केली .
संध्याकाळी आमच्या अंगणातल्या जास्वंदाच्या कळ्या घेतल्या आणि त्याना द्यावे म्हणून आत जाणारच होतो तितक्यात ती दिसली. लहान मुलांना श्लोक शिकवत होती. आजी तिथेच होती. मी बाहेरूनच कळ्या दिल्या मला पाहून आजीने आत बोलावले. पण त्या दिवशी मी गेलो नाही. पण त्यांनंतर मात्र दिवेलागणीच्या वेळेस तिथे नेमाने जाऊ लागलो. तिला पाहण्यासाठी....आमचे बोलणे असे व्हायचे नाही..चेहऱ्याने ओळख झाली होती. पण ती जरा लाजाळूच होती. फक्त लांबून स्माईल द्यायची.
संध्याकाळी आमच्या अंगणातल्या जास्वंदाच्या कळ्या घेतल्या आणि त्याना द्यावे म्हणून आत जाणारच होतो तितक्यात ती दिसली. लहान मुलांना श्लोक शिकवत होती. आजी तिथेच होती. मी बाहेरूनच कळ्या दिल्या मला पाहून आजीने आत बोलावले. पण त्या दिवशी मी गेलो नाही. पण त्यांनंतर मात्र दिवेलागणीच्या वेळेस तिथे नेमाने जाऊ लागलो. तिला पाहण्यासाठी....आमचे बोलणे असे व्हायचे नाही..चेहऱ्याने ओळख झाली होती. पण ती जरा लाजाळूच होती. फक्त लांबून स्माईल द्यायची.
त्यानंतर काही दिवसांनी माझ्या बहिणीचे लग्न होते. ती यावे असे खूप वाटत होते. मी सकाळपासून तिचीच वाट पाहत होतो. माझे डोळे मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ लागलेले होते. आणि ती आली. कुमुदआजी आणि तिच्या लहान बहिणीसोबत. या ही खेपेस तिच्याशी बोलावेसे वाटले पण तेवढे धाडसच झाले नाही. त्या दिवशी मी खूप खुश होतो...पण माझा हा आनंद तेवढ्यापुरताच होता. त्यानंतर ती कधीच दिसली नाही.
सकाळी ठरलेल्या वेळेला मी तिच्या घरासमोरून जायचो. पण सडा रांगोळी आधीच घातलेली दिसायची. कुमुद आजींकडेही तिने येणे सोडले होते. मी खूप बेचैन झालो...असे का..काहीच कळत नव्हते. त्यानंतर माझी परीक्षा झाली...मी बोर्डात अकरावा आलो...मला पुण्यातच एका मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळाले पण ते घरापासून लांब असल्यामुळे मला हॉस्टेलवरच रहावे लागायचे. शनिवार रविवार घरी यायचो...सकाळी तिच्या घरासमोरून उगाचच चक्कर मारायचो...पण ती दिसायची नाही.
माझे शिक्षण पूर्ण झाले..पण तिच्या शिवाय इतर कुणाचा विचार मनात कधीही आला नाही. प्रॅक्टीस साठी मी मुंबईला गेलो. तिथे साधारण सात वर्ष राहिलो. कामात व्यस्त असायचो म्हणून माझे आईबाबाच मला भेटायला यायचे. लग्नाचा विषय काढायचे. पण माझ्या मनात तीच होती...बाबांना सांगावेसे वाटायचे पण म्हटले तिच्या मनात काय आहे हे तरी जाणून घेतले पाहिजे असे वाटले ....खरेतर उशीर झाला होता...एव्हाना तिचे लग्नही झाले असेल असे एक मन म्हणत होते...पण तरीही वाटले एकदा नशीब आजमावे ...म्हणून तिला भेटण्यासाठी मनातले सर्व सांगण्यासाठी पुन्हा पुण्याला गेलो. तिचे घर बंद होते म्हणून कुमुद आजीकडे गेलो त्यांच्याजवळ तिची चौकशी केली.
"आजी, तुमच्याकडे जी श्लोक पठणाला यायची ती ...तुमच्या बाजूलाच राहायची...ती आता कुठे आहे... त्यांचें घर बंद आहे."
"कोणाबद्दल बोलतोस तू?..त्यांची एकूण तीन मुले... अनु सुधा आणि एक लहान मुलगाही आहे त्यांना.
मला हल्ली स्मृतिभ्रंश जास्तच होतो.. नेमके नाव आठवत नाही. "
मला हल्ली स्मृतिभ्रंश जास्तच होतो.. नेमके नाव आठवत नाही. "
"सर्वात मोठी कोण?"
"मोठी अनु...आणि धाकटी सुधा.
"अनु आता इथे नसते...तिचे लग्न झाले. प्रेमविवाह केला तिने."
माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे लग्न झाले इथपर्यंत ठीक होते...पण प्रेमविवाह केला हे वाक्य हृदयावर घाव घालणारे होते. मी आल्यापावली मागे गेलो...तिथे क्षणभरही थांबलो नाही... सरळ मुंबई गाठली...त्यानंतर मी स्वतःला माझ्या डॉक्टरी पेशात झोकून घेतले. काही काळानंतर वडील वारले. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुन्हा पुण्यात गेलो. आईने पुन्हा लग्नाचा विषय काढला.
"श्रीरामा...तुझ्या बाबांची शेवटची इच्छा आता तरी पूर्ण कर. लग्न कर बाबा. "
मी पन्नाशी गाठली होती.
मी पन्नाशी गाठली होती.
"आई, लग्न वैगरे गोष्टी आता थोडीच करायच्या असतात."
"मग जेव्हा करायच्या होत्या तेव्हा का नाही केलेस?"
"जिच्यावर प्रेम केले तिने प्रेमविवाह केला..."
"तू कोणाबद्दल बोलतोस..."
"पुढे कुमुदआजीच्या शेजारी जिचे घर आहे ना...तिच्याबद्दल अनुबद्दल..."
"ती का...तिचे आणि तिच्या पतीचे एक्सीडेंट झाले असे ऐकले. सोलापुरात त्यांचे घर आहे...तिथे आपले नातेवाईक राहतात ना...त्यांनी सांगितले..तिच्या लहान मुलीला तिची मोठी बहीण सुधा सांभाळते असे ऐकलेय. सुधाने तर अजून लग्नही केले नाही. "
"आई तू काय म्हणालीस?"
मला तर धक्काच बसला होता.
मला तर धक्काच बसला होता.
"तिचे एक्सीडेंट झाले... श्रीरामा आता झाले ते झाले.. नको विचार करुस..."
"आई त्यानंतर तू काय म्हणालीस?"
"अरे तिच्या मोठ्या बहिणीकडे सुधाकडे तिची मुलगी असते असे म्हटले".
"म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव सुधा होते..."
"हो. मोठी सुधा आणि धाकटी अनुजा."
"ओह् गॉड आई...इतकी वर्ष मी कुठल्या भ्रमात होतो...आई ती अजूनही अविवाहित आहे कदाचित माझ्या साठीच...तरी मला वाटायचे की तिचेही माझ्यावर प्रेम आहे... ते खरं होते."
त्यानंतर मी सोलापुरात त्यांच्या घरच्या पत्त्यावर गेलो पण तिथेही त्यांचे घर बंद असल्याचे कळले आणि ते सर्व मुंबईला आहेत असे समजले. त्यांच्या शेजाऱ्यांकडे त्यांचा मुंबईचा पत्ता मागितला पण त्यांच्याकडे नव्हता.
आता एवढ्या मोठ्या मुंबईत कसा शोधणार होतो मी...तरीही पुण्यातील ...आमच्या कॉलनीतील कोणीही भेटला की चौकशी करायचो.
पण शेवटी आज नियतीने आमची भेट घडवून आणलीच. "
श्रीराम देशपांडेंच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू होते.
"माझे पहिले आणि शेवटचे प्रेम मला अखेरीस मिळाले. सुधाने जर गैरसमज करून घेतला नसता तर आमची भेट आधीच झाली असती. "
"हो आणि कुमुद आजींनी नावात गल्लत केली नसती तर वेगळीच कहाणी झाली असती. "प्रिया म्हणाली.
"बहुतेक आमच्या नशिबात आताच भेटायचे होते."श्रीराम म्हणाले.
"मग तुमच्या मामेबहिणीचे तुमच्याबरोबर लग्न ठरले होते त्याचे काय? त्यामुळेच तर मला वाटले ना की तुम्ही तिच्याशी लग्न करणार आहात." सुधा म्हणाली.
"अगं, आम्ही लहान होतो त्यावेळेस. आई आणि मामांनी ठरविले होते. मला या बाबत माहीत नव्हते...जेव्हा मामांची मुलगी नीलाने पळून जाऊन लग्न केले तेव्हा घरात जी काही आरडाओरड आणि रडारड झाली तेंव्हा मला ही गोष्ट समजली. "
"डॉक्टर...पण तुम्ही सुरुवातीलाच चुकी केलीत . तुमचे प्रेम असताना मावशींना विश्वासात न घेता मुंबईला निघून गेलात." शेखर म्हणाला.
"हो चुकले माझे. मेडिकलचे शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या सुधाला विचारायला हवे होते...पण असो...तेंव्हा जी चूक केली ती आता करणार नाही.
आता मुली आणि जावयासमोरच विचारतो.
आता मुली आणि जावयासमोरच विचारतो.
सुधा...विल यू मॅरी मी?"
"आता या वयात? आपले वय ..."
"मावशी...प्रेमाला वयाचे बंधन नसते...
डॉक्टर काका शुभस्य शीघ्रम....आता वेळ घालवू नका... प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद मिळायचा योग नशीबवान व्यक्तींच्या भाग्यात असतो..आणि तुम्ही दोघं त्यापैकी एक आहात. "
प्रिया म्हणाली.
डॉक्टर काका शुभस्य शीघ्रम....आता वेळ घालवू नका... प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद मिळायचा योग नशीबवान व्यक्तींच्या भाग्यात असतो..आणि तुम्ही दोघं त्यापैकी एक आहात. "
प्रिया म्हणाली.
"हो प्रिया बरोबर बोलत आहे.
मला वाटते आज आता ताबडतोब तुम्ही दोघांनी विवाह बंधनात अडकले पाहिजेत" शेखर म्हणाला.
मला वाटते आज आता ताबडतोब तुम्ही दोघांनी विवाह बंधनात अडकले पाहिजेत" शेखर म्हणाला.
"हो." प्रिया म्हणाली..
"नको...प्रिया , अगं तुझी मामी काय म्हणेल?"
"मावशी...कोण काय म्हणेल याचा विचार आता तरी करू नकोस...
श्रीराम काका, ही अशीच आढेवेढे घेईल.
तुम्ही लग्नाची तयारी करा..मंदिरात किंवा एखाद्या छोट्या मंडपात.
जितके होईल तितके लवकर. "
तुम्ही लग्नाची तयारी करा..मंदिरात किंवा एखाद्या छोट्या मंडपात.
जितके होईल तितके लवकर. "
प्रिया खूप खुश होती...आपल्या मावशीच्या आयुष्याचा उत्तरार्ध् तिच्या मनासारखा असेल याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर होते.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
श्रीराम सुधाची प्रेमकहाणी आवडली का?
थोडे उशिरा भेटले म्हणून माझ्यासारखे तुमचेही मन हळहळले का?
खऱ्या आयुष्यात अशा कितीतरी प्रेमकहाण्या अधुऱ्याच राहतात. कितीतरी सुधा श्रीरामाच्या स्वीकृतीची वाट पाहत आयुष्य एकट्याने जगतात आणि कितीतरी श्रीराम तिचे आपल्यावर प्रेम असेल का नाही या विवंचनेत तिला आपल्या भावना सांगतच नाहीत.
आजचा भाग त्या सर्व श्रीराम आणि सुधाना समर्पित
थोडे उशिरा भेटले म्हणून माझ्यासारखे तुमचेही मन हळहळले का?
खऱ्या आयुष्यात अशा कितीतरी प्रेमकहाण्या अधुऱ्याच राहतात. कितीतरी सुधा श्रीरामाच्या स्वीकृतीची वाट पाहत आयुष्य एकट्याने जगतात आणि कितीतरी श्रीराम तिचे आपल्यावर प्रेम असेल का नाही या विवंचनेत तिला आपल्या भावना सांगतच नाहीत.
आजचा भाग त्या सर्व श्रीराम आणि सुधाना समर्पित
