प्रिया आज माझी भाग ४६
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
रात्री उशिरापर्यंत तिला झोपच येत नव्हती. ती सारखी कुस बदलत होती...मध्येच कधीतरी डोळा लागला...पण कुठल्यातरी अनामिक भीतीने तिची झोप उडाली.
एकटेपणाची भीती वाटत होती तिला...पुढे काय करू? कुठे जाऊ? माझे स्वतःचे भागेल आणि घरभाडे चुकते करता येईल इतपत मिळकत असणारी नोकरी कुठे मिळेल? मुंबईत तर शक्यच नाही. पण बाहेर जाऊन शोधू तरी कसे? कोणी ओळखीचे देखील नाही....इतक्यात तिला आठवले तिची आणि अश्विनची मैत्रीण रागिणी...जी सध्या नाशिकला असते. तिची आठवण येताच ती बेडवर उठून बसली....पण तिचा हात ...तिचा हात तर शेखरने धरून ठेवला होता आणि तो गाढ झोपला होता...तिच्याकडे तोंड करून ... लोडचे पार्टीशन नेहमीप्रमाणेच खाली सरकले होते.
त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित आले.
त्याच्या हाताखालचा हात न काढता ती त्याच्याकडे कुस करून पडली. त्याच्याकडे पाहत ती विचार करू लागली,
त्याच्या हाताखालचा हात न काढता ती त्याच्याकडे कुस करून पडली. त्याच्याकडे पाहत ती विचार करू लागली,
"तुमच्याकडे पाहून तुमचे माझ्यावर प्रेम नाही असे अजिबात वाटत नाही...पण मिहिका आज जे काही बोलली त्याकडे दुर्लक्ष तरी कसे करू?...तुमचे पहिले प्रेम आहे ती...आणि पहिले प्रेम खूप अनमोल असते ...ते ज्याला मिळेल तो या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती असतो...त्यात माझा समावेश नाही...कारण माझे पहिले प्रेम तुम्ही आहात आणि तुमचे मिहिका...मला तुमच्या पहिल्या प्रेमाला तुमच्यापासून नाही तोडायचे आहे...तुम्हाला तुमचे प्रेम भेटले पाहिजे...मला तुम्हाला सुखी पहायचे आहे...."
त्याच्याकडे पाहत पाहत ती झोपी गेली.
सकाळी तो उठला ती मात्र अजूनही झोपलेलीच होती. तिच्याकडे पाहून तिला तसे पाहत त्यालाही तसेच झोपून राहण्याचा मोह झाला पण त्याचा नाईलाज होता कारण आज त्याच्या फिनलंडच्या ऑफिसमधून तिथले प्रोग्रामिंग हेड इथे येणार होते आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे ट्रेनिंग होणार होते.
त्याने तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकवले...आणि तिच्या कपाळावर आलेले केस मागे सरकवले.
"Good morning." तो पुटपुटला आणि आपलां टॉवेल घेऊन वॉशरुममध्ये गेला.
तो अंघोळ करून बाहेर आला तरी ती झोपलेलीच होती.
एवढ्याशा डोक्यात काय विचार घेऊन असते काय माहित.....
तो हसला. त्याने आपला टाय काढण्यासाठी वार्डरोबचा ड्रॉवर उघडला आणि कोटला सूट होईल अशा रंगाचा टाय काढला...रोज त्याच्यासाठी ती करायची....तिच्याकडे पाहून तो पुन्हा हसला.
तो हसला. त्याने आपला टाय काढण्यासाठी वार्डरोबचा ड्रॉवर उघडला आणि कोटला सूट होईल अशा रंगाचा टाय काढला...रोज त्याच्यासाठी ती करायची....तिच्याकडे पाहून तो पुन्हा हसला.
एवढूशी बाहुली... अंथरुणात दिसत सुद्धा नाही.
तो ड्रॉवर बंद करायला जाणार इतक्यात त्याची नजर टायच्या खाली असलेल्या पेपरवर गेली.
त्याने ते पेपर बाहेर काढले आणि खोलून पाहिले
"ओह् गॉड...हे मी कसे विसरू शकतो.. हे मी आज बघितले म्हणून मी इतका शॉक झालो...रोज माझे टाय तर हिच काढायची न.....तिला तर क्षणोक्षणी हेच वाटत असेल ना की मी तिला डिव्होर्स देणार आहे...
शेखर...शेखर...तू ही गोष्ट कशी विसरलास..."
तो ते पेपर फाडणारच होता इतक्यात त्याच्या मनात विचार आला की संध्याकाळी ती जेव्हा समोर येईल तेव्हा तिच्या समोरच हे पेपर फाडून तिला सांगूया की माझे तिच्यावर प्रेम आहे...त्याने ते पेपर पुन्हा होते तिथे ठेवले आणि शीळ घालत तो तयार होऊ लागला.
त्याला काय माहित त्याची हीच चुक त्याला महागात पडणार होती.
****
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा