प्रिया आज माझी भाग ५०
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
"समीर, अरे प्रिया घर सोडून गेली रे. "
"काय? ... पण काल तू जे इथे माझ्याजवळ बोलत होतास ते तू तिला सांगितले नाहीस का? "
"ते सांगायची संधीच मिळाली नाही. मी रात्रभर हॉस्पिटलमध्येच होतो..सकाळी आलो तेव्हा ती घरी नव्हती. कुठे गेली असेल रे ती...".
शेखरचा कंठ दाटून आला होता.
शेखरचा कंठ दाटून आला होता.
"काम डाऊन शेखर.... तू तिच्या माहेरी कॉल करून विचारलेस का?"
"तिने चिठ्ठीत लिहिले आहे की ती ही शहर सोडून जाणार आहे."
"मग कुठे गेली असेल?
वेट वेट...अश्विन ....त्याला नक्कीच काहीतरी माहीत असेल. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर नाही माझ्याकडे पण मी तरीही प्रयन करतो त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला की तुला कॉल करतो."
वेट वेट...अश्विन ....त्याला नक्कीच काहीतरी माहीत असेल. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर नाही माझ्याकडे पण मी तरीही प्रयन करतो त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला की तुला कॉल करतो."
*****
काही तासाने
समीरने फोन ठेवला. शेखर अजूनही कालच्याच कपड्यांमध्ये हताशपणे बसला होता. त्याला काहीही सुचत नव्हते. सुमन ताई तर रडल्यामुळे बेजार झाल्या होत्या. त्यांची कशी समजूत काढावे हेच त्याला समजत नव्हते.
"शेखर मी तिचे आयुष्य उध्वस्त केलं रे ! तुझ्याशी लग्न लावले नसते ना तर ती सुखात तिथे तिच्या माहेरी राहिली असती. तिच्यावर घर सोडून जाण्याची वेळच आली नसती. मला जर माहिती असते की तू लग्नाच्या रात्री तिला डिव्होर्स देणार आहेस तर मी तिचं लग्न तुझ्याबरोबर लावलं नसतं. माझं चुकलं... या सर्वाला मी जबाबदार आहे. "
"आई , माझ्यावर विश्वास ठेव लग्नाच्या रात्री मी तिला डिव्होर्स पेपर दिले ती माझी सगळ्यात मोठी चूक होती आणि हे काही दिवसातच मला लक्षात आले. तिचा समजूतदारपणा , तिचा स्वभाव हळूहळू मला आवडत गेला आणि तिच्यावर प्रेम कधी बसले ते समजलेच नाही. तिला मनातले सर्व सांगण्यासाठी काल ऑफिसमधून मी लवकर निघालो होतो. पण मिहिकाचा फोन आला आणि मला हॉस्पिटलला जावे लागले.
माझ्यामुळे तिला खूप मनस्ताप झाला ....पण आई ती तिच्या माहेरी सुद्धा खुश नाही गं..तिची मामी तिच्याशी खूप वाईट वागते....मी स्वतः पाहिले आहे ते..म्हणूनच तिने हे शहर सोडायचा निर्णय घेतला असेल. मला तिला सांगायचे होते की तिच्याशी लग्न जरी माझ्या इच्छेविरुद्ध झाले होते तरी आता तिच्यावर माझे खूप प्रेम आहे पण तीन हे सांगायची संधीच मला दिली नाही...मला उशीर झाला. "
शेखरच्या डोळ्यांत अश्रू आले.
शेखरच्या डोळ्यांत अश्रू आले.
मनीषा नुकतीच आली होती. शेखरच्या आणि सुमन ताईंच्या बोलण्यातून ती समजून चुकली की प्रिया वहिनी घर सोडून कायमच्या निघून गेल्या आहेत. तिला पण वाईट वाटले कारण आज पर्यंत तिच्याशी प्रियाइतके चांगले कोणी वागलेच नव्हते. या आधी जिथे जिथे ती कामाला होती तिथे तिथे नेहमी तिला नोकरासारखेच वागवले जायचे. प्रियाच्या बोलण्यात तिला नेहमी आपलेपणा जाणवायचा दिला.
समीरचा फोन आला. शेखरच्या नजरेत आशेचे किरण आले.
"शेखर, त्या अश्विनबाबत मला काहीच माहिती मिळाली नाही रे. त्याला ओळखणाऱ्या माझ्या कॉन्टॅक्ट मधल्या
सर्व लोकांना मी कॉल केला परंतु त्यांना कोणालाच तो कुठे काम करतो किंवा त्याचा फोन नंबर माहित नाही.
सर्व लोकांना मी कॉल केला परंतु त्यांना कोणालाच तो कुठे काम करतो किंवा त्याचा फोन नंबर माहित नाही.
प्रियाची एक बेस्टफ्रेंड होती रागिणी नावाची... पण तिचे लग्न झाले असे समजले पण तिचाही कॉन्टॅक्ट नंबर मिळाला नाही. "
शेखर उदास झाला. एक शेवटचा आशेचा किरणही मावळला होता.
******
दिवसांमागून दिवस जात होते. शेखर थकून भागून घरी येत असे आणि बाल्कनीत बसून उदासपणे आकाशाकडे पाहत बसे.
दिवसांमागून दिवस जात होते. शेखर थकून भागून घरी येत असे आणि बाल्कनीत बसून उदासपणे आकाशाकडे पाहत बसे.
दरम्यानच्या काळात मिहिकाच्या वडिलांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. ती शेखरला काही ना काही निमित्ताने कॉल करायची. पण त्याच्याकडून थंड प्रतिसाद असायचा.
असे सहा महिने निघून गेले.
शेखरला सुट्टी होती. तो बाहेर बाल्कनीत बसला होता. समोर महालक्ष्मीच्या मंदिरातून घंटानाद ऐकू येत होता.
" या मंदिराला बघायला तिला फार आवडायचे. इथे या बाल्कनीत उभे राहून ती आजूबाजूचा परिसर न्याहाळायची आणि सकाळी उठून हा रेडिओ लावायची."
त्याचे रेडिओकडे लक्ष गेले आणि त्याला काहीतरी आठवले.
"हा रेडिओ तिला अश्विनी नावाच्या कुणीतरी दिला होता..... नो...आय वॉज राँग....त्या अश्विननेच हा दिला होता...आता मला समजले..."
त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. त्या रेडिओकडे पाहून त्याला चिड येत होती. त्याने तो रेडिओ उचलला आणि तो आपटणार इतक्यात त्याला आठवले की तिला ह्याच्यावरची गाणी ऐकायला खूप आवडायची. त्याने आपल्या रागाला आवर घातला. तिची आवडती वस्तू त्याच्या हातात होती. त्याने तो रेडिओ पुन्हा होता तसाच तिथे ठेवला आणि सुरू केला.
यशवंत देव रचित सुधीर फडके यांनी गायलेले गीत रेडिओवर वाजू लागले.
त्याच्या आताच्या भावनांशी अगदी समर्पक होते ते.
त्याच्या आताच्या भावनांशी अगदी समर्पक होते ते.
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
नको धुंद वारे, नको चांदण्या या
नको धुंद वारे, नको चांदण्या या
नको पारिजाता धरा भूषवू ही
पदांची तिच्या आज चाहूल नाही
प्रियेविण आरास जाईल वाया
पदांची तिच्या आज चाहूल नाही
प्रियेविण आरास जाईल वाया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
नको धुंद वारे , नको चांदण्या या.
नको धुंद वारे , नको चांदण्या या.
क्रमशः
.सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
.सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा