प्रिया आज माझी भाग ५२
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शेखरने राहुलला फोन केला.
"हॅलो यार , मी तुला कॉल करणारच होतो.."
"राहुदे तुझे यार बीर...त्या मिहिकाला तू फोन करू शकतोस...पण मला नाही..."
"आता तुम्ही दोघं रिलेशनशिप मध्ये आहात म्हणून म्हटले तिला सांगितले काय किंवा तुला काय एकच झाले ना. तुमच्या दोघांत सर्व ठीक आहे ना..."
"तो एक गंभीर विषय आहे...असे फोनवर सांगता येणार नाही...आणि तू ही मी तुला असे काही बोललो असे तिला सांगू नकोस...तिथे आल्यावर मी तुला सर्व सांगेन. "
"तू ये तर सही...मी आपल्या बाकी सर्व फ्रेंडला सुद्धा बोलावले आहे....आपल्या सम्या ला (समीर) सुद्धा सांगितले . तर तो मला म्हणाला की त्याला यायला जमणार नाही पण तू शेखरला बोलाव...नाशिक म्हटल्यावर शेखर नक्की येईल.
बाय द वे तो असे का म्हणाला ते सांगशील जरा?"
बाय द वे तो असे का म्हणाला ते सांगशील जरा?"
"सर्व सांगेन...पण फोनवर नाही...प्रत्यक्ष भेटल्यावर सांगेन...पण मला सांग तू असे सगळ्यांना का बोलावत आहेस?"
"मी तुम्हाला माझ्या लग्नाला बोलावू शकलो नाही म्हणून म्हटले आमच्या वेडिंग ॲनिवर्सरीला बोलवू...अरे परवा आमची ॲनिवर्सरी आहे. तू आणि मिहिका दोघेही उद्या इथे हजर असले पाहिजे. बाकी फ्रेंड्स वेन्यूलाच येणार आहेत."
"ओके...मी नक्की येईन. "
"हा पण मिहिकाला सुद्धा सोबत घेऊन ये. रागिणी म्हणजे माझी बायकोला तुम्हा दोघांना भेटायची खूप उत्सुकता आहे."
शेखरच्या कपाळावर आठ्या आल्या.
शेखरच्या कपाळावर आठ्या आल्या.
"ओह् के.. सी यू टुमारो. "
*****
मिहिकाबरोबर पूर्ण प्रवास कसा करायचा याचा विचार तो करायला लागला इतक्यात त्याला आठवले की आईची दूरची बहीण नाशिकलाच राहते...आईला सर्व सांगून जर तिला सोबत घेतले तर मिहिका त्याच्यासोबत येण्यास नकार देईल किंवा ती तिच्या पर्सनल कार मधून जाईल.
त्याने आपला हा विचार सुमनताईना सांगितला.
"पण शेखर, एवढ्या मोठ्या नाशिक शहरात तू प्रियाला कसे काय शोधणार?....आणि त्यात ही मिहिका तुझ्याबरोबर असणार ना...प्रियाचा गैरसमज व्हायला नको
आई ते सर्व मी ठीक करेन... आणि मला खात्री वाटतेय की प्रिया नाशिकमध्येच आहे. "
आई ते सर्व मी ठीक करेन... आणि मला खात्री वाटतेय की प्रिया नाशिकमध्येच आहे. "
"तसेच असू दे रे बाबा."
ठरल्याप्रमाणे शेखरने त्याच्यावर त्याची आईही असल्याचे सांगितले आणि मिहिकाच्या सर्व स्वप्नांवर विरजण पडले...संपूर्ण पाच तासाच्या प्रवासात शेखर तिच्याबरोबर असणार या विचाराने ती हरखून गेली होती पण त्याची आई ही सोबत आहे हे समजल्यावर तिने आपल्या पर्सनल कारने जायचे ठरवले.
शेखरचा एक हा डाव बरोबर पडला होता.
*****
शेखरचा एक हा डाव बरोबर पडला होता.
*****
राहुल एका नावाजलेल्या आय टी कंपनीत उच्च पदावर होता. टेक्नॉलॉजीचे शिक्षण सुरू असतानाच त्याला नाशिकच्या कंपनीतून ऑफर आली आणि तेंव्हापासून तो कायमस्वरूपी इथेच स्थायिक झाला. पण त्यामुळे मुंबईत आणि इतरत्र राहणाऱ्या आपल्या मित्रांशी त्याचे संबंध तुटले. त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आपल्या सर्वच मित्रांना एकत्र येण्याचे आवाहन केले त्यातल्या त्यात मिहिका राहुल आणि समीर त्याच्या क्लोज फ्रेंड सर्कल मध्ये असल्यामुळे त्यांना त्याने एक दिवस आधी त्याच्या घरीच बोलावले होते.
शेखर आपल्या आईला मावशीकडे सोडायला गेला त्यामुळे तो दुपारी उशिरा त्याच्याकडे पोहोचला पण मिहिका मात्र त्याच्या काही वेळ आधीच तिथे पोहोचली होती.
शेखरने बंगल्याबाहेर असलेल्या पार्किंग स्लॉट मध्ये आपली कार पार्क केली. राहुल आणि मिहिका लॉन मध्येच होते. त्याला पाहून ते दोघेही पुढे आले.
राहुलने सुहास्य वदनाने त्याचे स्वागत केले.
"शेखर ... ग्लॅड टू सी यू आफ्टर सो मेनी डेज. "
"मी टु. पण ज्यांना भेटायला आलो आहोत त्या आमच्या रागिणी वहिनी कुठे आहेत? "
"ते काही विचारू नकोस...तिची एकदम आवडती मैत्रीण इथे आली आहे....बऱ्याच दिवसांपासून ती तिची वाट पाहत होती...तिची मैत्रीण मुंबईला असल्यामुळे आमच्या लग्नाला येऊ शकली नाही. आणि इतक्या दिवसांनी भेटली आहे म्हणून दोघी मैत्रिणी थोडा क्वालिटी टाइम स्पेंड करीत आहेत. तेवढाच मला आराम.."
राहुल मोठ्याने हसला.
शेखरने हसून त्याच्या पाठीवर थाप मारली.
शेखरने हसून त्याच्या पाठीवर थाप मारली.
"यू आर लकी टू हॅव हर. "
शेखर असे का बोलला हे मात्र राहुलला कळले नाही.पण तरीही फारशी प्रतिक्रिया न देता तो त्या दोघांना आत घेऊन गेला.
खरेतर शेखरला प्रिया मिहिका आणि त्याच्याबाबत राहुलला सर्व सांगायचे होते पण मिहिका समोर तो काहीही बोलू शकत नव्हता.
*****
बंगल्याच्या प्रशस्त हॉलमधून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक बंद खोली होती. त्याच्या समोरची खोली राहुलने उघडली .
"मिहिका, इथे सामान ठेव . ही तुझी रेस्टरूम आणि शेखर तू वर चल तिथे तुझी रूम आहे. "
"राहुल...तुला माझी स्मोकिंगची सवय माहित आहे ना...
आजकाल मी माझ्या रुममध्ये स्मोक करीत नाही..मला बाहेर ओपन एरियात स्मोक करायची सवय आहे. या खालच्या रूममधून बाहेर जायला लगेच सोपे पडेल...आणि दुसरे म्हणजे मला हल्ली फार उशिरापर्यंत झोपही येत नाही...तुझ्या बंगल्याचे लॉन मला आवडले...झोप नाही आली तर तिथे येऊन बसेन..गेल्या सहा महिन्यात तर उशिरा जागणे माझ्या अंगवळणी पडले आहे.
आजकाल मी माझ्या रुममध्ये स्मोक करीत नाही..मला बाहेर ओपन एरियात स्मोक करायची सवय आहे. या खालच्या रूममधून बाहेर जायला लगेच सोपे पडेल...आणि दुसरे म्हणजे मला हल्ली फार उशिरापर्यंत झोपही येत नाही...तुझ्या बंगल्याचे लॉन मला आवडले...झोप नाही आली तर तिथे येऊन बसेन..गेल्या सहा महिन्यात तर उशिरा जागणे माझ्या अंगवळणी पडले आहे.
मिहिका जर तुझी हरकत नसेल तर तू मला ही रूम देशील का?"
"अफ्कोर्स बेबी... बट राहुल मग मलाही शेखरच्या समोरची ही रूम दे ना."
"तिथे ऑलरेडी प्रिया राहते.."
शेखरने चमकून पाहिले.
"ओह्...प्रिया कोण असे म्हणायचे आहे का तुला?.. रागीणीची मैत्रीण.. मघाशी नाही का मी म्हणालो तो..."
शेखर पुन्हा पूर्ववत झाला.
"शेखर, प्रिया नावाच्या कितीतरी मुली असतात...तुझी प्रिया तुला इथे भेटेल इतपत तुझे नशीब कुठले."
तो स्वतःशीच म्हणाला.
तो स्वतःशीच म्हणाला.
"मिहिका तुला वरच्या रुममध्ये राहावे लागेल. "
"राहुल, ही जी कोणी प्रिया आहे ना... तिला तिचे सामान वर शिफ्ट करायला सांगशील का? कारण मला ही रूम हवी आहे."
"ए बाई, माझ्या बायकोची मैत्रीण आहे ती. माझ्या बायकोचा मूड बिघडला तर माझ्या लग्नाची अनिवर्सरी होईल की नाही माहित नाही, पण माझा डिव्होर्स तर नक्की होईल. "
राहुल हसत पणाला.
"राहू दे...मी राहीन वर. "
मिहिकाने नाराजीने नाक मुरडले.
मिहिकाने नाराजीने नाक मुरडले.
"पण राहुल माझ्यासोबत माझा ड्रायव्हर आणि माझा बॉडीगार्ड पण आले आहेत त्यांच्यासाठी काही व्यवस्था होईल का...की त्यासाठी सुद्धा तुझ्या बायकोची परमिशन घ्यावी लागेल. "
मिहिका म्हणाली आणि कपाळावर आठ्या आणीत आपल्या फोनची स्क्रीन स्क्रोल करीत काही महत्त्वाचे मेसेज वाचू लागली.
मिहिका म्हणाली आणि कपाळावर आठ्या आणीत आपल्या फोनची स्क्रीन स्क्रोल करीत काही महत्त्वाचे मेसेज वाचू लागली.
"शेखर...तू कसा हॅण्डल करतोस हिला...तुला ह्यासाठी मानले पाहिजे. "
राहुल त्याच्या कानात कुजबुजला.
राहुल त्याच्या कानात कुजबुजला.
"मिहिका, बंगल्याच्या बॅकसाइडला सर्व्हंटरूम आहेत...तिथे तुझ्या माणसांची सोय होईल. "
"ओके..मग मी त्यांना तसे सांगते. "
तिने आपल्या बॉडीगार्डला फोन लावलाही,
"हॅलो डॅनियल( बॉडीगार्ड)माझे लगेज घेऊन ये आणि दीपकला (ड्रायव्हर) तुमचे लगेज घेऊन सर्व्हंट रुममध्ये जायला सांग."
****
थोडे फ्रेश झाल्यावर ते तिघेही बंगल्याच्या गार्डन मध्ये गप्पा मारीत बसले.
आता इथे आपली कथा आपल्या भाग दोन वर म्हणजे वर्तमान काळात परत आली आहे.
(यानंतर भाग एक , दोन आणि तीन भाग वाचलेत की कथेची लिंक लागेल.)
(यानंतर भाग एक , दोन आणि तीन भाग वाचलेत की कथेची लिंक लागेल.)
*****
"शेखर, अरे असे अचानक काय झाले...इथे असा बाहेर का निघून आलास."
राहुलला पाहताच शेखरने आपली सिगारेट खाली फेकली आणि बुटाने विझविली.
"राहुल..
यू आर एंजल...तुला माहीत नाही तू मला काय दिले आहेस ते?"
यू आर एंजल...तुला माहीत नाही तू मला काय दिले आहेस ते?"
"मी?.. मी काय दिले...अरे आल्यापासून तुम्हाला चहाकॉफी सुद्धा विचारली नाही...आमची कूक संध्याकाळचा मेनू बनवण्यात बिझी आहे आणि चहा कॉफी बनविणारी तिची हेल्पर सुनीता रागिणी बरोबर बाहेर गेलेय त्यामुळे ती आता तुमच्यासाठी चहा बनवत आहे."
राहुल नॉनस्टॉप बोलतच होता.
"चूप
ऐक तरी..अरे तुझ्या बायकोची मैत्रीण..."
शेखर फार उत्साहात काहीतरी बोलत होता पण राहुलच्या मागून मिहिकाला येताना बघून तो थांबला.
ऐक तरी..अरे तुझ्या बायकोची मैत्रीण..."
शेखर फार उत्साहात काहीतरी बोलत होता पण राहुलच्या मागून मिहिकाला येताना बघून तो थांबला.
"काय झालं शेखर तू बोलायचा थांबलास का ? माझ्या बायको.."
शेखरने त्याचे पटकन तोंड दाबले .
शेखरने त्याचे पटकन तोंड दाबले .
"आता काही बोलू नकोस ... मी तुला नंतर सांगतो."
पण तोंड दाबल्यावरही डोळे विस्फारत राहुल बोलतच होता
"आये बाबा... मोजा ..... बायकोच्या मैतीनी बोद्दल "
शेखर राहुलचे तोंड दाबलेल्या अवस्थेत तिच्याकडे पाहत होता मिहिका कन्फ्युज झाली.
"शेखर काय करतोस..त्याचे तोंड सोड."
"काही वेडावाकडा विचार करू नकोस. "
शेखरने त्याच्या तोंडावरच हात काढल्याबरोबर राहुलने आपले वाक्य पूर्ण केले.
शेखरने त्याच्या तोंडावरच हात काढल्याबरोबर राहुलने आपले वाक्य पूर्ण केले.
"नाही करत...तू चल आम्हाला चहा कॉफी काहीतरी दे. ".
"ते तिघेही पुन्हा लॉनमध्ये आपापल्या खुर्च्यांवर येऊन बसले. "
राहुल मात्र शेखरकडे रागारागाने पाहत होता आणि शेखरला हसू येत होते.
राहुल मात्र शेखरकडे रागारागाने पाहत होता आणि शेखरला हसू येत होते.
राहुल नजरेनेच त्याला धमकी देत होता.
***
जेव्हापासून प्रियाने तिला शेखरबाबंत सांगितले होते तेंव्हापासून रागिणी शेखर आणि मिहिका दोघांवर रागावलेलीच होती.
पण कितीही झाले तरी शेखर आणि मिहिका राहुलचे फ्रेंड होते आणि ते त्यांच्या घरी आले होते त्यामुळे अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे रागिणी राहुलच्या बाजूला येऊन बसली.
जेव्हापासून प्रियाने तिला शेखरबाबंत सांगितले होते तेंव्हापासून रागिणी शेखर आणि मिहिका दोघांवर रागावलेलीच होती.
पण कितीही झाले तरी शेखर आणि मिहिका राहुलचे फ्रेंड होते आणि ते त्यांच्या घरी आले होते त्यामुळे अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे रागिणी राहुलच्या बाजूला येऊन बसली.
"वहिनी तुमच्या मैत्रिणीलाही बाहेर बोलवा ना नाहीतर मी समजेन की ती अजूनही माझ्यावर रागावली आहे. "
राहुलने शेखरकडे संशयाने पाहिले....पण पुन्हा त्याने त्याला नजरेने आश्वासन दिले.
"ती अशा छोट्या मोठ्या गोष्टीने रागावत नाही..आणि ती फक्त आपल्याच माणसांवर रागावते. (आपल्याच माणसांवर या शब्दांवर रागिणीने विशेष जोर दिला)
ती का नाही बाहेर येणार...तिला कोणावाचून काही फरक पडत नाही. "
मी तिला आताच कॉल करून बोलावते.
"हॅलो पियू.. बाहेर ये."
प्रिया किचमध्ये होती. संध्याकाळी शेखरला त्याची स्पेशल कॉफी लागते म्हणून ती स्वतः किचनमध्ये गेली आणि तिने कॉफी बनवली.
रागिणीचा फोन आला पण तिला बोलण्याचा मोका न देताच तिने फोन ठेवला होता.
रागिणीचा फोन आला पण तिला बोलण्याचा मोका न देताच तिने फोन ठेवला होता.
ती बेचैन होऊन आपल्या रूममध्ये निघून आली. बाहेर शेखरसमोर जायचे आहे या जाणिवेने प्रियाचे हार्ट फास्ट झाले. आज तब्बल सहा महिन्याने तो दिसला होता. तिने आरशात पाहिले आणि आपले केस आणि चेहरा व्यवस्थित केला...हृदयात अजूनही धडधड होतीच. तिने एक दीर्घ श्वास घेतला.
"प्रिया...इतकी अस्वस्थ कशाला होत आहेस...आता तो तुझा शेखर नाही...पाहिलेस ना त्याच्याबरोबर मिहिका आलेली आहे..नॉर्मल रहा. त्याच्या असण्याने तुला कितीही फरक पडला असेल तरी तो जाणवू देऊ नकोस. "
मनाला घट्ट करून ती बाहेर आली आणि इथे तिथे न पाहता सरळ रागिणीच्या शेजारी जाऊन बसली.
तिच्या मगोमगच सुनीता (हाऊस हेल्प) कॉफीचा ट्रे घेऊन आली.
सुनिताने मिहिकाला कॉफीचा मग दिला. तितक्यात राहुलने तिच्या ट्रेमधला कॉफीचा दुसरा मग उचलला तेव्हा सुनीता त्याला म्हणाली ,
"साहेब हा मग या दुसऱ्या साहेबांसाठी आहे. "
राहुल ने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि दुसरा मग उचलला.
"हे असं का ह्याच्यात काही वेगळ टाकल आहेस का ?"
"हा याच्यात फक्त एक चमचा साखर आहे. "
"सुनीता, तुला कसे माहिती शेखरला एक चमचा साखर पाहिजे. "
ती निरुत्तर होऊन रागिणी आणि प्रियाकडे पाहू लागली .
"अहो मागे तुम्हीच तर सांगितलेत ना शेखर भाऊजीं खूप डायट कॉन्सिअस आहेत . जिमला जातात त्यांचे खाणे पिणे सगळे एका पर्टिक्युलर टाईम वर होते त्याच्यावरून मी अंदाज लावला. "
रागिणी म्हणाली.
रागिणी म्हणाली.
"अच्छा असे का असेल...असेल."
एक चमचा साखरेची कल्पना सुनीताला प्रियानेच दिली असावी याचा अंदाज शेखरने लावला.
कॉफीचा मग तोंडाला लावताच ही कॉफी प्रियाने बनवले आहे हेही त्याला समजले
कॉफीचा मग तोंडाला लावताच ही कॉफी प्रियाने बनवले आहे हेही त्याला समजले
"वहिनी कॉफी कोणी बनवली ?"
"मी बनवली."
रागिणी उत्तरली.
रागिणी उत्तरली.
"तू कधीपासून किचनमध्ये जेवण करायला लागलीस
तुला चहाचे पाणी सुद्धा गरम करता येत नाही. "
राहुल आश्चर्याने म्हणाला .
तुला चहाचे पाणी सुद्धा गरम करता येत नाही. "
राहुल आश्चर्याने म्हणाला .
"मला वाटते कॉफी वहिनींच्या मैत्रिणीने बनविली आहे. हो ना वहिनी."
प्रियाकडे पाहत शेखर म्हणाला.
प्रियाकडे पाहत शेखर म्हणाला.
"तिला काय विचारतोस...नक्कीच प्रियानेच बनविली असणार...ती चहा सुद्धा फर्मास बनवते."
कॉफीचा घोट घेत राहुल म्हणाला.
कॉफीचा घोट घेत राहुल म्हणाला.
शेखरचे लक्ष प्रियावरच होते. पण ती मात्र कधी खाली पाहत होती तर कधी आजूबाजूला असणाऱ्या झाडासुडूपांकडे ...त्याच्याकडे पाहणे ती जाणूनबुजून टाळत होती.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा