प्रिया आज माझी भाग ५३
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
"इतकी पण काही खास नाही... टेस्ट ओके ओके आहे. "
मिहिकाने भुवया ताणल्या आणि नाक मुरडत रिकामा मग टेबलवर ठेवला.
"म्हणून ती ओके ओके कॉफी तू सर्वात पहिला संपवलीस ना... "
राहुल गमतीत म्हणाला तसे शेखरही गालात हसला.
राहुल गमतीत म्हणाला तसे शेखरही गालात हसला.
रागिणीचे लक्ष त्याच्या बोलण्याकडे नव्हतेच ती फक्त उदास झालेल्या आपल्या मैत्रिणीला न्याहाळत होती.
"राहुल कॉफी पिऊन फ्रेश वाटले खरे पण डोके फार दुखतेय रे...तुझ्याकडे एखादी हेडएक ची टॅब्लेट असेल तर दे. नाहीतरी पेन रिलीफ बाम असला तरीही चालेल."
शेखरचे डोके खरेच दुखत जरी असले तरी त्याचे पूर्ण लक्ष प्रियाच्या चेहऱ्याकडे होते.
प्रियाने आता पहिल्यांदाच त्याच्याकडे पाहिले तिच्या नजरेत त्याच्यासाठी काळजी स्पष्ट दिसत होती.
शेखरचे डोके खरेच दुखत जरी असले तरी त्याचे पूर्ण लक्ष प्रियाच्या चेहऱ्याकडे होते.
प्रियाने आता पहिल्यांदाच त्याच्याकडे पाहिले तिच्या नजरेत त्याच्यासाठी काळजी स्पष्ट दिसत होती.
"नाहीतर राहू दे ...थोडे रेस्ट केले तर बरे वाटेल मी माझ्या रुममध्ये जातो. "
शेखर उठून बंगल्यात गेला.
शेखर उठून बंगल्यात गेला.
"ओके एव्हरीवन मी सुद्धा थोडे रेस्ट करते..."
मिहिका सुद्धा त्याच्या पाठोपाठ गेली.
"मग मी सुद्धा माझे थोडे काम करून घेतो. तसेही उद्या करताच येणार नाही..पूर्ण दिवस सेलिब्रेशन मध्ये जाईल."
राहुलही उठून गेला. आता तिथे फक्त प्रिया आणि रागिणी राहिल्या होत्या.
"त्यांचे खरेच डोके दुखत होते गं...माझ्याकडे डोकेदुखीची गोळी आहे आणि बामची बाटली सुद्धा आहे. तू त्यांना देशील का? किंवा जिजूना सांगशील का?"
"जो माणूस तुझी अजिबात पर्वा करीत नाही अशा माणसाची तू कशाला काळजी करीत आहेस?"
"ते करीत नाहीत तरी मी करते ना. किती बारीक झाले आहेत...त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखे तेज सुद्धा दिसत नव्हते. "
"अशी गं कशी तू भोळी भाबडी? तू खूप चांगली आहेस पण समोरचा व्यक्ती त्या लायकीचा.."
"नको रागा, त्यांच्याबद्दल असे बोलू नकोस. "
"बरे बाई नाही बोलत
आता तू सुद्धा थोडे रेस्ट कर...मॉलमधून फिरून माझ्या कमरेचा पार भुगा झालाय...मी सुद्धा आराम करते. "
आता तू सुद्धा थोडे रेस्ट कर...मॉलमधून फिरून माझ्या कमरेचा पार भुगा झालाय...मी सुद्धा आराम करते. "
"रागा,... कोणालातरी सांगून त्यांना बाम दे ना. "
"मॅडम, तुला इतके वाटते तर तूच दे. तुझ्या समोरच त्याचा रूम आहे. "
"पण तिथे तर राहुलची मैत्रीण राहणार होती असे तू सकाळी म्हणाली होतीस ना...म्हणजे ती दोघं एकत्र त्या रुममध्ये आहेत का?"
"नाही...नाही...अजून तरी त्यांची गाडी तेवढी पुढे गेलेली दिसत नाही..
मिहिकाची रूम वर आमच्या रूमच्या शेजारी आहे आणि मिस्टर शेखर परांजपे तुझ्या समोर...राहुल सांगत होता की त्याला सिगारेट प्यायला जावे लागते म्हणून त्याने रूम एक्सचेंज केला...तू तिथे आहेस हे त्याला माहित देखील नव्हते...बघ ना, दैवाने पुन्हा तुम्हा दोघांना एकमेकांसमोर आणून ठेवले. व्हॉट अ को इन्सिडन्स."
"ते अजूनही सिगारेट पितात?...मला वाटले मी त्यांच्या आयुष्यातून निघून गेल्यावर त्यांनी ही सवय सोडली असावी...मीच त्यांचे टेन्शन होते ना.."
"माझ्या सोने, इतका नको विचार करुू. रुममध्ये जाऊन निवांत पड. आणि हा.. त्याचे डोके दुखतेय ही तुझी डोकेदुखी नाही.. समजले!!!! आता चल आत जाऊ. "
रागिणी आणि ती आत आल्या.
रागिणी आपल्या रूममध्ये निघून गेली. प्रिया आपल्या खोलीजवळ आली. समोरचे दार बंद होते. तिने क्षणभर पाहिले आणि ती आपल्या खोलीत गेली, पण तिला काही केल्या चैन पडत नव्हती.
तिने आपल्या मेडिकल बॉक्समधून बाम आणि डोकेदुखीची टॅबलेट काढली आणि ती बाहेर आली पण शेखरच्या रूमचे दार वाजवण्याचे धाडस तिला होत नव्हते.
ती नॉक करणारच होती इतक्यात तिला दरवाजा उघडाच आहे हे लक्षात आले. तिने दार हळूच ढकलले आणि ती आत गेली.
ती पुढे गेली पण रूममध्ये कोणीच नव्हते...ती मागे फिरणार तेवढ्यात कोणीतरी दार लॉक केल्याचे तिला जाणवले...तिने झटकन वळून पाहिले. शेखर होता तो...
त्याच्याशी नजरानजर होताच तिचे डोळे भरले क्षणभर ती दोघंही एकमेकांना पाहतच बसली...पण प्रियाला भान आले तसे ती दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली आणि शेखरने तिला आपल्या मिठीत खेचले.
त्याचे हात तिच्या पाठीवर विसावले...त्याची गच्च मिठी तिच्या मनाविरुद्ध होती पण तरीही तिने विरोध केला नाही..फक्त डोळे मिटून ती तिच्या श्वासांना शांत करू पाहत होती...त्याचे श्वास तिच्या कानांना स्पष्ट जाणवत होते. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याच्या स्पर्शाने ती शहारली आणि तिने डोळे गच्च मिटले...तिच्यासाठी हा अनुभव शब्दांपलीकडचा होता. त्याच्यासाठीच धडधडणारे काळीज आज त्याच्या मिठीत होते.
"तुला माहीत नाही मी तुला कुठे कुठे शोधले...वेडा झालो होतो मी...मला न सांगता माझ्याशी न बोलता अशी कशी निघून गेलीस...माझ्याबद्दल एकदाही विचार केला नाहीस...स्वतःच सर्व निर्णय घेऊन मोकळी झालीस...तुला माहीत नाही मी तुला किती मिस केले..."
"शेखर... बेबी....तुझ्यासाठी मी टॅब्लेट आणली आहे... ओपन द डोर"
मिहिकाने दारावर नॉक केले.
"आय ॲम फाइन नाऊ मला नकोय टॅब्लेट..."
"माझ्या दुखण्यावरचे औषध मिळालेले..."
पुढेच वाक्य तो हळूच बोलला पण ती त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपडू लागली...तसे त्याने तिला अजून घट्ट पकडले...
मिहिका गेली असेल असा अंदाज घे तरीही हळू आवाजात म्हणाली.
मिहिका गेली असेल असा अंदाज घे तरीही हळू आवाजात म्हणाली.
"शेखर, सोडा मला..."
"नाही...आज तुला माझे सर्व ऐकावेच लागेल. "
"आता जे ऐकले ते पुरे. झाले ...."
"तू मिहिकाबद्दल बोलत आहेस ना... तेच तर सांगायचे आहे."
"मला नाही ऐकायचे ...सोडा मला."
ती त्याला हाताने दूर लोटू लागली ...पण त्याच्या ताकदीपुढे तिची ताकद फिकी पडत होती...
"प्रिया...तू माझे ऐकून तरी घे. "
ती त्याच्या मिठीतून बाहेर येण्यासाठी धडपडतच होती. आपले प्रयत्न चालूच ठेवत ती म्हणाली.
"शेखर.. आता मी तुमची बायको नाही....आपला डिव्होर्स झालाय...माझे नाव प्रिया परांजपे नाही..प्रिया करंजकर आहे. आता तुमचा माझा काहीही संबंध नाही...तुम्ही माझे कोणीही नाही आहात...उगाच माझ्यावर हक्क दाखवू नका. संपलय सगळे...."
त्याची मिठी एकदम सैल झाली आणि तो मागे झाला.
तिचे शेवटचे वाक्य त्याच्या जिव्हारी लागले.
तिने चमकून त्याच्याकडे पाहिले तर तिला जाणवले की त्याच्या डोळ्यांत पाणी जमा झाले होते.
तिने चमकून त्याच्याकडे पाहिले तर तिला जाणवले की त्याच्या डोळ्यांत पाणी जमा झाले होते.
"मी जो शेखर पाहतेय तो खरा की आपल्या गर्लफ्रेंड बरोबर आपल्या मित्राच्या घरी आलेला शेखर खरा."
ती संभ्रमात पडली.
ती संभ्रमात पडली.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
