Login

प्रिया आज माझी भाग ५५

Lovestory
प्रिया आज माझी भाग ५५


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


"शेखर..."

शेखरने तिला असे त्याच्या रुममध्ये जबरदस्ती आणले होते हे तिला अजिबात आवडले नव्हते.

"शु...."

त्याने तिचे तोंड दाबले आणि तिला बेडवर बसवले आणि तो तिच्यासमोर खुर्ची घेऊन बसला.

"तुला इथे पाहिल्यापासून तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होतो...पण तू ऐकून घेत नव्हतीस...मग शेवटी हाच एक उपाय राहिला होता. "

"शेखर...मला काहीही ऐकून घ्यायचे नाही...मी माझ्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे...तुमचे माझे लग्न झाले होते...पण त्याला आता काही अर्थ उरलेला नाही...मी सुद्धा तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करीत आहे पण तुम्ही तरी कुठे ऐकून घेत आहात. "

"प्रिया...तुझा गैरसमज होत आहे ... मिहिका आणि माझ्यात असे काही नाही जे तू समजत आहेस. "

"शेखर प्लीज मला काही एक्सप्लेनेशन देऊ नका. "

"माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही असेच ठरवले आहेस का तू? "

तिने आपला चेहरा वळवला आणि दुसरीकडे पाहिले.

"मी मी जे बोलत आहे ते ऐकून घे पुढे नाही पटले तर तू जाऊ शकतेस."

"शेखर तुम्ही काय सांगणार आहात ? तुमच्यात आणि मिहिकामध्ये जर काही संबंध नसतील तर मग ती आणि तुम्ही इथे एकत्र कसे ?"


"प्रिया... अगं आम्ही दोघेही इथे सेपरेट आलो आहोत. ती तिच्या कारने आली आणि मी माझ्या.
तू घर सोडून गेलीस तेव्हा मी तुला खूप शोधले... समीरला विचारले त्यालाही काही आयडिया नव्हती...नंतर त्याच्याकडून तू नाशिकमध्ये असशील याची माहिती मिळाली अनायसे राहुलने मला आणि मिहिकाला त्याच्या वेडिंग एनिवर्सरी साठी इथे बोलावले.."

तो बोलत hota आणि त्याच्या प्रत्येक शब्दानिशी तिच्या चेहऱ्यावरचे भाव कधी गंभीर, गहिरे, तर कधी हळवे होत होते.

"मी इथे आलो आणि योगायोगाने तू इथे राहुलकडे मला भेटलीस...मी मिहिकाबरोबर आहे त्याचे दुसरे कारण म्हणजे तुला म्हणजे तिच्याकडून धोका आहे... म्हणून मी तिच्यासमोर तू माझी बायको आहेस हे कबूल करण्याचे टाळत आहे.
हे बरे झाले आहे की ती तुझा चेहरा विसरलेय...म्हणून मी तिच्यासमोर तुझ्याशी उघडउघड बोलतही नाही.
आता तरी माझ्यावर विश्वास ठेव . "
त्याने तिचा हात हातात घेतला.

"पण तुमचे तर तिच्यावर प्रेम आहे ना. हे तुम्ही मला लग्नाच्या पहिल्याच रात्री सांगीतले होतं ना आणि मावशी म्हणते प्रेम एकदाच होते... तुमचे पहिले प्रेम मिहिका आहे ना."

तिच्या कापऱ्या आवाजातून ती आतून किती दुखावली होती याची त्याला जाणीव झाली.

"आकर्षण आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कॉलेजमध्ये असताना मी तिच्या ब्युटीशी फॅसिनिटेट झालो होतो. माझे नाव तिच्याशी जोडले तेंव्हा मला ते खूप थ्रिलिंग वाटले होते. आकर्षणाला प्रेम समजून चाललो होतो मी...आणि तू जीवनात आली नसतेस तर प्रेम काय असते ते मला समजलेच नसते...प्रेम म्हणजे त्याग..जो तू माझ्यासाठी केलास . तुझ्या सहवासात मी तुला समजत गेलो....
माझे तुझ्यावर प्रेम आहे...आय लव्ह यू..."

तिचा हात हातात घेत तो म्हणाला.

"आणि ते डिव्होर्स पेपर्स. "

शेखरने आपल्या बॅगेतून ते पेपर बाहेर काढले आणि तिला ते फाडायला सांगितले.

"हे धर.... फाड...तू नाशिकमध्ये जेव्हा कधी भेटशील तेंव्हा ते तुला फाडायला देईन या विचाराने इथे घेऊन आलो होतो."


त्या डिव्होर्स पेपरला पाहिल्यावर तिला पुन्हा ती पहिली रात्र आठवली...आणि त्यानंतर मिहिका तिला जे फोनवर बोलली होती ते आठवले.

"त्याने तुझ्याबरोबर लग्न जरी केले असले तरी माझे आणि त्याचे नवराबायकोसारखे संबंध कधीपासूनचे आहेत. आम्ही एकाच कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलच्या एकाच रुममध्ये राहत होतो...आमच्यात सर्व झालेय. "

तिचे डोळे भरले....ती ताडकन उभी राहिली....
तिने ते पेपर्स त्याच्याकडे दिले.

"शेखर...मला माहित नाही तुम्ही असे मला का मनवत आहात...बहुतेक आईं...( ती थांबली कारण आता तिला पुन्हा खोट्या नात्यात अडकायचे नव्हते ) सुमन मावशीसाठी तुम्ही हे करत आहात ना?...जर त्यासाठी हे सर्व करत असाल ना तर मी स्वतः येऊन त्यांना सांगेन की मी आता माझ्या आयुष्यात खुश आहे...माझे व्यवस्थित चालले आहे...माझ्यामुळे तुम्हाला या खोट्या लग्नात अडकवू नका."

"नाही प्रिया...तू चुकीचे समजत आहेस.."

"उलट आता माझ्या डोळ्यासमोरचे सर्व धुके दूर झाले आहे."

एवढे बोलून ती आपल्या रूममध्ये निघून गेली.


क्रमशः

प्रियाने त्याच्यावर पटकन विश्वास ठेवावा असे तुम्हाला वाटते का?
ती त्याच्यावर असा चटकन विश्वास का ठेवेल?...लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने तिला डिव्होर्स पेपर दिले... त्याचे दुसऱ्या कुणावर प्रेम आहे हे सांगितले...आणि मिहिकाने तर कहरच केला ... तिचे आणि त्याचे लग्नाआधी शारीरिक संबंध आहेत असे तिने सांगितले...मला वाटते प्रियाच्या जागी दुसरे कुणीही असते तरी त्या मुलीनेही चटकन विश्वास ठेवला नसता...शेखरचा रस्ता बिकट आहे..
थोडे त्यालाही तडपू दे....सहजासहजी त्याची प्रिया त्याला भेटली तर कथेची मजाच जाईल ना...बघूया पुढे काय होते ते.


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.