Login

प्रिया आज माझी भाग ५६

Lovestory
प्रिया आज माझी भाग ५६

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


नाशिकपासून दीडशे किलोमीटर लांब असलेल्या एका रिसॉर्टवर राहुल आणि रागिणीची वेडिंग अँनिवर्सरी सेलिब्रेट करण्यात येणार होती. संध्याकाळी सहा वाजताचे आमंत्रण देण्यात आले होते. सकाळी बंगल्यावरून नाश्ता करून झाल्यावर लगेचच निघायचे ठरले होते.

प्रिया तयार होऊन बाहेर आली. शेखर राहुल आणि रागिणी नाश्त्यासाठी तिची वाट पाहत बसले होते...तिचे डोळे लालसर दिसत होते...ती रात्रभर झोपली नसावी हे शेखरने ओळखले. त्यालाही तरी कुठे झोप लागली होती...पूर्ण रात्र प्रियाला कसे समजावू हाच विचार तो करत होता.

तिने कॉटनचा, पूर्ण बाह्यांचा फिकट गुलाबी रंगाचा साधासा अनारकली घातला होता पण त्यातही ती खूप सुंदर दिसत होती. कालप्रमाणेच शेखर त्याच्या बाजूला मिहिका तिच्या बाजूला राहुल आणि राहुलच्या बाजूला रागिणी असेते सर्व गोलाकार डायनिंग टेबलभोवती बसले होते, त्यामुळे शेखर अगदी तिच्या समोरच आला होता.

"हा अजून आला कसा नाही?"
रागिणी प्रियाला म्हणाली.

"कोण येणार होते?"
राहुलने विचारले.

"मी.... अश्विन... शैतान का नाम लियू और शैतान
हाजिर..असे म्हणू नका हा जिजु."
बंगल्याच्या प्रवेशद्वारातून एक युवक आत येत म्हणाला.

शेखर त्याला पाहतच राहिला.
त्याला अजूनपर्यंत वाटत होते की अश्विन नावाचा मुलगा...कुणीतरी लेचापेचा असेल पण त्याच्या समोर...एक उंच गोरा गोमटा... हँडसम क्लीन शेव, सिल्की केस रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला तरुण उभा होता. निळ्या टी शर्ट आणि गर्द निळ्या जिन्समध्ये तो अधिक देखणा दिसत होता.

"व्हू इज ही?"
मिहिकाही त्याच्याकडे पाहत राहिली.

"हा माझा आणि प्रियाचा स्कूल आणि कॉलेज फ्रेंड आहे.. अश्विन देशमुख. "
रागिणी म्हणाली.

"हाय..."

त्याने मिहिका आणि शेखरकडे पाहून अभिवादन केले त्यांनीही हसून रिप्लाय दिला. अश्र्विनने आपल्या हातात आणलेला बुके राहुल आणि रागिणीला दिला.

"Happy anniversary..."

"Thank you. "

"जीजू... त्यातले ट्युलिप खास तुमच्यासाठी आहे... थँक्यू य फॉर टॉलरेटिंग अवर रागा... कारण तिला हॅण्डल करताना मला आणि पीयूला किती नाकीनऊ यायचे ते आम्हालाच माहित आहे...हो ना पियू. "

"हो..." प्रिया हसून म्हणाली.

त्याने पियू म्हणताच क्षणी शेखरच्या कपाळावर आठ्या आल्या. अश्विनला पाहून प्रियाचा चेहरा चेहरा खुलला होता.
आणि हे सर्व शेखरला सहन होत नव्हते.

"अरे अश्विन...तू बस आधी...तुझ्या गप्पा सुरू झाल्या की त्या संपणार नाहीत... आणि आम्हाला आमची ॲनिवर्सरी इथेच मनावायला लागेल... तेंव्हा पुढच्या गप्पा नंतर मार. आधी नाश्ता कर."

"नाश्ता तर मी करणारच आहे पण त्याआधी पियूला काहीतरी द्यायचे आहे...

पियू... तुझ्यासाठी ही अनंताची फुले. "

त्याने हिरव्या पानांत बांधलेली फुले मोकळी करून तिच्यासमोर केली तसे तिने आपल्या हातातला चमचा बाजूला ठेवला आणि ती फुले घेउन त्याचा सुगंध नाकात भरून घेतला.

"थँक्यू आशू... तू अजून विसरला नाहीस. "

"कसा विसरेन... अगं...रागिणीला द्यायला बुके जिथून घेतला तिथे मागेच अनंताचे झाड होते...त्या झाडाच्या मालकाला विचारून थोडी तोडून आणली."

" फुलांची नेमकी काय भानगड आहे आम्हाला कळेल का ?"
राहुलने विचारले.

"आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा कॉलेजच्या बाहेरील एका बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये अनंताचे झाड होते....प्रियाला अनंताची फुले खूप आवडायची...तिथे पडलेली फुले सुद्धा ती गोळा करायची...मग मी तिला नेहमी बाहेर आलेल्या फांद्यांवरची फुले काढून द्यायचो. "
प्रियाशेजाच्या खुर्चीवर बसत तो म्हणाला.

"ह्याला प्रियाबद्दल इतके सगळे माहित आहे. "
शेखरला अश्विनचा हेवा वाटला पण त्याचबरोबर त्याचे तिच्याबरोबर हसून बोलणे , तिच्या बाजूला बसणे हे त्याला अजिबात आवडत नव्हते. त्याला नाश्त्याला सँडविच आवडते म्हणून राहुलने आपल्या कूकला इडली आणि उपम्या बरोबर सँडविचही बनवायला सांगितले होते ते... पण समोर आवडता नाश्ता असून सुद्धा त्याला तो गोड लागत नव्हता.

तो सँडविचचे तुकडे चिवडीत होता...प्रियाने शेखरकडे चोरटी नजर टाकली.

तो अश्विनकडे खुन्नसने पाहत होता.
आणि अश्विन मात्र प्रियाशी बोलण्यात बिझी होता.

"रागा...तुम्हाला निघायला अजून किती उशीर आहे?"
अश्र्विनने विचारले.

"तासाभरात आम्ही निघू. "

"बरे मग मी पियूला घेऊन जरा बाहेर जातो...मला कुणासाठीतरी गिफ्ट घ्यायचे आहे. पियूची चॉईस चांगली आहे. हो ना पियू?"

प्रिया हसली.

"हो. तिची चॉईस चांगलीच आहे...म्हणूनतर तू कितीही प्रयत्न केलेस तरी तिचे माझ्यावरच प्रेम असणार आहे. "
शेखर मनात चरफडत होता."

शेखर नाश्ता अर्धवटच सोडून उठला.

"काय झाले शेखर भावोजी? सँडविच नाही आवडले का?
काही दुसरे बनवायला सांगू का?"
रागिणीने विचारले.

"आय थिंक त्याला टेस्ट आवडली नसावी...मलासुद्धा एवढे काही आवडले नाही....".
आपल्या पुढ्यातल्या सँडविचकडे कसेतरी तोंड करून पाहत मिहिका म्हणाली व तिने ऑरेंज ज्यूसचा ग्लास तोंडाला लावला.

"नाही...तसे काही नाही.मला भूक नाही. "


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.